सामाजिक
ग्राहक पंचायतीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी “नितीन मिंढे”
रांजणी दि(प्रतिनिधी ) ) आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील नितीन मारुती मिंडे यांची ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यातआली
नुकत्याच झालेल्या वडगाव मावळ येथील ग्राहक पंचायत या संस्थेच्या विशेष बैठकीत महाराष्ट्राचे संघटन मंत्री सर्जेराव जाधव यांनी मिंढे यांच्या निवडीची घोषणा केली यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ विजय लाड,सहसंघटिका मेधा कुलकर्णी, सचिव अरुण वाघमारे, सहसचिव एस एन पाटील कोषअध्यक्ष सुनीता राजे घाटगे, कार्यकारणी सदस्य हेमंत मराठे, पुणे विभाग अध्यक्ष अशोक अग्रवाल आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते..
दरम्यान या वेळी बोलताना राज्य कार्यकारणी अध्यक्ष सर्जेराव जाधव म्हणाले की, भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांचे मंचर ता. आंबेगाव येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सन 2000 सालच्या दरम्यान ग्राहक पंचायत आयोजित विद्यार्थी ग्राहक प्रशिक्षण अभ्यासक्रमा दरम्यान बिंदू माधव जोशी यांचे विचार ऐकून त्यातून प्रेरणा घेत मिंढे यांनी सुमारे 12 वर्ष बिंदू माधव जोशी यांचे सोबत ग्राहक पंचायत मध्ये गाव संघटक पदापासून कामाला सुरुवात केली होती,
त्याचप्रमाणे मिंढे यांनी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ग्राहक चळवळीची व्याख्याने देऊन मार्गदर्शन केले आहे,तसेच अनेक गावांमध्ये ग्राहक मार्गदर्शन मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले असून त्यांचा विज या विषयांमध्ये गाढा अभ्यास आहे, ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून त्यांना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरही कामाचा अनुभव आहे, त्यांच्या या निवडीबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ विजय लाड यांनी विशेष अभिनंदन केले आहे.