सामाजिक
काळाच्या ओघात सध्याच्या पत्रकारितेचा दर्जा घसरतोय का?
मंचर दि (प्रतिनिधी ) भारतामध्ये पत्रकारिता हा घटनेचा चौथा स्तंभ समजला जातो. निपक्षपाती निर्भीड पत्रकारीतेतून अनेक समाजसेवाकांनी या देशात असलेली जाती पातीची अंधश्रद्धा घातक रुडी परंपरा वर आपल्या लेखणीतून वार करत समज जागृती केली. समजातील विघातक गोष्टीना आळा घालण्याचे काम वृत्तपत्रानी केले
दरम्यान बाळशास्त्री जांभेकर यांनी ६जानेवारी१८३२ यांनी मराठी वृतपत्र दर्पणची स्थापना केली त्यांनतर १८८१मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी वृत्त पत्र सुरु केले तर त्यानंतर मराठा वृत्तपत्र हि त्यांनी सुरु केले या वृत्तपत्रातून समाज्याला नवी दिशा देण्याचे कार्य या समाज सेवाकांनी केले. काळाच्या ओघामध्ये पत्रकारिता क्षेत्रात मोठे अमुलाग्र बदल झाले पुढे या वृतपत्राची जागा इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली आतातर यूट्यूब वर विविध चॅनेल निर्माण होऊन पत्रकारिता क्षेत्रात मोठी उत्क्रांती झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दरम्यान काळाच्या ओघात प्रचंड प्रमाणावर बदललेली पत्रकारिता,आज खरचंच निपक्षपाती, निर्भीड व सक्षम राहिली आहे का? हा प्रश्न पडतो. आजच्या काळात युट्युब व पोर्टल च्या माध्यमातून सुरु झालेले लाखो चॅनेल खरचं सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देतात का? या फ्रीलान्स पत्रकारांकडून समाज हिताची व समाज्याला योग्य दिशा देण्याचे काम होते का? याचा विचार होणे आवश्यक आहे.
आजच्या काळात युट्युब व पोर्टल च्या माध्यमातून आलेले विविध तथाकथित पत्रकार ज्यांना पत्रकारीतेचा काही गंध नसताना अथवा आपण जे लिहितो त्याबाबतचे योग्य ज्ञान देखील नसताना कोणतीही पत्रकारितेची पदवी नसताना. केवळ जाहिराती साठी पत्रकारिता करीत असल्याचे दिसून येते.तसेच निर्भड व निपक्षपाती पत्रकारिता विसरून कुणाचे तरी लांगुल चांलण करणारी पित्तपत्रकारीतेने जन्म घेतला आहे असे दिसते.
आज समाज्यामध्ये कोणतेही प्रशिक्षण अथवा शिक्षण नसलेले युट्युबर व पोर्टल पत्रकार दिसत आहेत.आजही महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण याकडे लक्ष न देता हे पत्रकार एखाद्या साखर कारखान्यात अथवा संस्थेच्या कार्यक्रमामध्ये पारितोषक वितरण करीत पुढार्यांची मर्जी सांभाळत असल्याचे दिसते तर काही पत्रकार जाहिरातीच्या नावाखाली उत्पन्न मिळविण्यासाठी तर अनेक जण राजकीय क्षेत्रातील कथाकथित पुढारी अथवा स्वघोषित समाजसेवक व जनसेवकांनी जाहिरात करण्याच्या दूषित हेतूने आयोजित पत्रकार परिषदांमध्ये केवळ रुचकर जेवण मिळेल यासाठी पत्रकारिता करीत असल्याचे दिसते यामुळे पत्रकारिते सारख्या पवित्र क्षेत्राचा लिलाव होतो आहे कि काय? असा प्रश्न अनेकांना मुखातून ऐकावयास मिळतो
खरंतर पत्रकारितेच्या नावाखाली सुरु असलेल्या या भेसूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्याची खरंच गरज असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच युट्युब चॅनेल पोर्टल तसेच कोणतेही इलेक्ट्रिनिक मीडिया अथवा वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या व्यक्तीकडे शिक्षण तसेच पत्रकारितेची पदवी असणे आवश्यक आहे. जसे शेतामध्ये पिकासोबत अनावश्यक तन उगवते व त्याला थोपविण्यासाठी तणनाशक शेतात फवारले जाते त्याच प्रमाणे पत्रकारिता करणाऱ्या इसमाकडे योग्य शिक्षण व पत्रकारीतेची पदवी बंधन कारक केल्यास या वरही चांगल्यापैकी बंधने येऊन पत्रकारिता क्षेत्र सक्षम होईल यात शंका नाही अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून ऐकावयास मिळते.