सामाजिक
पत्रकार मोसीन काठेवाडी यांनी वाचविले हेरॉन पक्षाचे प्राण….
घोडेगाव दि (प्रतिनिधी ) भूतदया म्हणजेच प्राणीमात्र यांना जीव लावणे यांचे संगोपन करणे निसर्गाच्या सानिध्यात आनंदाने राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. निसर्गातील सर्व प्राणीमात्रावर प्रेम करणे त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे.यासाठी कोणतीही जात धर्म पंथ नव्हेतर आपण या निसर्गाची लेकरे आहोत.सर्वांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे या कर्तव्याची जाण राखत घोडेगाव येथील युवकांने हेरॉन जातीच्या बागळ्यांचे प्राण वाचवून एक नवा संदेश सर्वांपुढे ठेवला आहे.
भारतीय तलावातील हेरॉन हा बगळ्याच्या प्रजातीचा पक्षी आहे. मराठीमध्ये त्याला ढोकरी तसेच पॅडीबर्ड असेही म्हणतात. हा पक्षी मुख्यतः तलाव, दलदलीच्या ठिकाणी व खाड्या आणि शेती प्रदेशात आढळतो. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव बसस्थानका जवळ रस्त्याच्या कडेला वेदनेने विव्हळत असलेल्या जखमी हेरॉन ला पक्षी प्रेमी तथा आंबेगाव तालुक्यातील पत्रकार मोसीन काठेवाडी यांनी पाहिले. त्यांनी या ढोकरी पक्षाला वन विभागाकडे सुपूर्द करून जीवदान दिले आहे.
दरम्यान सदर घटनेची माहिती मोसीन काठेवाडी यांनी तातडीने दूरध्वनीद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांना दिली. त्यानंतर घोडेगाव वनविभागाच्या वतीने डॉ आतुल चिखले यांच्या रुग्णालयात उपचारासाठी ढोकरी पक्षाला दाखल करण्यात आले. स्वतः पुणे येथे वनविभागाच्या महत्वाच्या मिटिंगला असताना सुद्धा समय सूचकता दाखवून घोडेगाव वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी त्यांचे कर्मचारी यांना तातडीच्या सूचना देऊन सदर पक्षीच्या पिल्लाला रेस्क्यु करून उपचार करण्यासाठी वन विभागाची टीम पाठवली
दरम्यान वनरक्षक सुर्यकांत कदम, अशोक मते, अनिल शिंदे यांनी वनपरिक्षेत्र आधिकारी लिमकर यांच्या मार्गदर्शनखाली पूर्व तपासणी करून डॉ. चिखले यांच्या रुग्णालयात सुरक्षित उपचारासाठी पाठवले.त्याच्या उपचार झाल्यानंतर त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.