सामाजिक

निश्चय शक्तीच्या जोरावर लाखो शेतकरी व शेकडो बेरोजगार युवकांना आर्थिक स्थर्य देणारा सर्वसामान्यांचा ….. “श्रीमंत योगी”

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी )- {वाढदिवस विशेष }

निश्चयाचा महामेरू, बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, “श्रीमंत योगी”

हे वाक्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना उद्देशून बोलले जाते. कारण संपूर्ण हिंदुस्थानात असलेली मुगल साम्राज्याची जुलमी सत्ता उलथुन टाकत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व हिंदुस्थानातील जनतेला रयतेच राज्य दिले. एक निश्चित ध्येय साध्य करण्याची इच्छा व  त्यासाठी त्यांनी केलेला त्याग,यामुळे राजे, बहुतांचा आधार बनले, सर्वकाही असूनही जनहितासाठी सर्वसुखांचा त्याग करत, बहूजणांचे कल्याण करण्यासाठी अहोरात्र झगडून,एक सक्षम स्थिती त्यांनी निर्माण केली त्यामुळे जनतेचे त्यांना श्रीमंत योगी म्हटले.


 आजच्या स्वातंत्र्य भारतात विविध क्षेत्रात अनेकांनी आपल्या निश्चित ध्येयाच्या जोरावर एक स्थान प्राप्त केले आहे. त्यातून समाज हित राष्ट्र उंन्नती साधाण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या कल्पनेतून साकरलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून सर्वांच्या आर्थिक उन्नतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो शेतकरी व हजारो युवकांना रोजगार निर्माण करून देत.त्यांचा आधार बनून या शेकडो कुटुंबाना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी स्थिती निर्माण केली अशा या उद्योजकास हि श्रीमंत योगी म्हणणे वावगे ठरणार नाही.

(पराग समूहात काम करणाऱ्या महिलांना विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रो्त्साहन )

भारत देशामध्ये दुधाची उत्क्रांती झाली व दुधाचे उत्पादन वाढले परंतू त्यावेळी खऱ्या अर्थाने दुधाची साठवणूक करून शहरी बाजार पेठेत दूध पोचविण्याबाबत शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत होती त्यामुळे  बळीराज्याने उत्पादीत केलेले दूध शासन स्वीकारण्यास सक्षम नसल्याने  १९९१ च्या काळात दुधाला  खडा पद्धत सुरु झाली. या कारणाने शेतकऱ्याने उत्पादीत केलेले लाखो लिटर दूध शेतकऱ्यांना रस्त्यावर अथवा ओढ्या नाळ्यांत फेकून द्यावे लागतं होते अशा वेळी  अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या प्रामानिक हेतूने प्रवाहित होत.बळीराज्याने उत्पादीत केलेल्या दुधाला  योग्य भाव मिळून शेताकऱ्यांचे अर्थिक उत्पन्न वाढवे  यासाठी  देवेंद्र शाह यांनी डेअरी व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय करून पराग दूध प्रकल्पाची निर्मिती केली व यातीन पुणे नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे खडा असलेल्या दिवसांचे दूध विकत घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला हातभार लावला. या तून अनेक विविध अडिअडचणीवर मात करीत पराग उद्योग समूहाचे एका मोठ्या दूध प्रकल्पा मध्ये रूपांतर झाले.


दरम्यान “देवेंद्र शाह” यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर व्यवसाय वृद्धिंकाळात निर्माण होणाऱ्या अनंत अडचणीवर मात करीत डेअरी उद्योग क्षेत्रात  “गगन भरारी” घेतली. तर जगाच्या बाजारपेठेत भारतीय डेअरी उद्योगाला नवी दिशा देत एक सन्मान जनक स्थान मिळवून दिले, व त्यातून भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक  उत्कर्षांचे दिवस आणले.जीवनात एखाद्या ध्येयाने प्रेरित  होऊन अहोरात्र काम करीत, प्रयत्नाची पराकष्ठा करणारे देवेंद्र शाह हे “निश्चियाचे महामेरू” ठरतात. 

आज जगाच्या बाजारपेठेमध्ये पराग उद्योग समूहाने आपला दाबदबा निर्माण केला असून गोवर्धन घी, गो चीझ, प्राईड ऑफ काऊ नावाने उत्कृष्ट दर्जाचे दुग्ध जन्य पदार्थ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले या दुग्धजन्य पदार्थाना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आज जगाच्या बाजार पेठेत पराग मिल्क फूड्स च्या उत्पादनांनी मोठा ग्राहक जमा केला आहे. महाराष्ट्र गुजरात सह देशाच्या अनेक राज्यात गोवर्धन घी  या सोबत आवतार, टॉपअप, गो चीझ, या नावाने असलेल्या दुग्धजन्य पदार्थाना  प्रचंड प्रमाणावर ग्राहकांकडून मागणी आहे. १९९१ च्या सुमारास सुरु झालेल्या गोवर्धन प्रकल्पा ने जगाच्या बाजारपेठेत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. सुरवातीच्या काळात विविध अडीअडचणी वर मात करत गोवर्धन प्रकल्पचे सर्वोसर्वा देवेंद्र शाह यांनी एक नवा इतिहास निर्माण केला आहे.


भारतीय डेअरी उद्योगात आपल्या कंपनीचे नाव सर्वोत्कृष्ठ स्थानावर नेण्याचा निश्चय करण्याच्या या “निश्चयाच्या  महामेरूने” लाखो शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या दुधाला भाव देत आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला.त्याचबरोबर आपल्या व्यवसायास एक उत्कृष्ठ उंची निर्माण करून  देत यातून शेतकऱ्या सह युवकांना नोकरी व व्यवसाय निर्माण करून देऊन राज्यातील नव्हेतर देशात शेकडो कुटुंबाना आर्थिक आधार दिला आहे.त्यामुळे आज लाखो शेतकरी व शेकडो युवक आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत.

दरम्यान सर्वांचे कल्याण होवो, भले होवो, या उद्देशाने  अहोरात्र झगडणारे तसेच कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना आपलेसे वाटणारे ” देवेंद्र शाह” यांना खऱ्या अर्थाने आजच्या काळातील श्रीमंतयोगी असे म्हणणे वावगे ठरणार नाही.  असा हा कर्मयोगी या आंबेगावच्या देवभूमीत जन्माला आला. व त्याने अनेकांच्या जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. अशा या धुरंदर, दूरदृष्टीच्या प्रसिद्ध उद्योजकास बोभाटा परिवाराकडून वाढदिवसाच्या  लक्ष लक्ष मंगलमय शुभेच्छा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version