सामाजिक

मंचर नगरपंचायत ओर.. बडून खाणारे तीन कावळे कोण? सोशल मीडियाच्या त्या पोस्ट ने चर्चेला उधान….

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी ) मंचर नगरपंचायत हि आंबेगाव तालुक्यात कोणत्याना कोणत्या त कारणावरून चर्चेत असते यात काही नवीन नाही. परंतू ऐन सर्व पित्री अमावस्याच्या निमित्ताने मंचर नगर पंचायत ओर बडून खाणारे ते तीन कावळे कोण? अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्याने सर्वत्र चर्चेला प्रचंड उधान आले आहे.

(मंचर शहरातील वाहतूक कोंडी )

मंचर शहर हे आंबेगाव तालुक्याच्या राजकीय पटलावरील  सदैव चर्चेत असलेले गाव गेली अनेक दशका पासून हि पंचायत विरोधकांच्या ताब्यांतच राहिली. या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनी खूप प्रयत्न केले परंतू त्यांना म्हणावे असे यश मिळाले नाही माजी खासदार कै किसनराव बाणखेले तसेच शिवसेना नेते कै. अँड अविनाश रहाणे असताना सत्ताधारी पक्ष सदैव या पंचायतीवर आपले वर्चस्व राखण्यात अयशस्वी ठरला.

https://bobhatanews.in/wp-content/uploads/2025/09/1001008768.mp4

(स्वच्छाता गृहाची दुरावस्था)


दरम्यान गेल्या दोन वर्षपूर्वी मंचरमध्ये ग्रामपंचायत विसर्जित होऊन नगरपंचायत निर्माण झाली. तेव्हा पासून मंचर नगर पंचायतीवर प्रशासकीय कारभार सुरु आहे.या काळात मंचर नगर पंचायत कार्यक्षेत्रात   कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली गेली असल्याचे  बोलले जाते. यात विविध ठिकाणचे सिमेंट रस्ते व्यापारी संकुल भाजीमंडई या सोबत विविध विकास कामे करण्यात आली आहेत परंतू येथील बहुतांश कामे गैरव्यवहार झाल्याचे आरोपांनी वादाच्या  भोवऱ्यात सापडल्याचे आढळले झालेली कामे अतिशय नित्कृष्ठ दर्जाची झालेली असल्याचे आरोप अनेक प्रतिष्ठितांनी केले यावर अनेक उपोषणे झाली परंतू खरोखरच गैर व्यवहार झाला कि हि देखील विरोधकांची आरडा ओरड होती हे काही येथील जनतेला समजले नाही कारण हि आंदोलणे अचानक बसणात गुंढाळली गेली त्यामुळे  यावर कोणत्याही प्रकारची काहीच ठोस कारवाई मात्र झलेली दिसली नाही.


  मंचर नगरपंच्यातीच्या  विकासासाठी सुमारे एकशे दहा कोटी रुपयांचा निधी आला असे म्हटले जाते परंतू आलेल्या निधीपैकी किती निधी योग्य रीतीने खर्च केला गेला हे एक कोढंच म्हणावे लागेल. आजही अनेक झालेली कामे एकतर अर्धवट स्वरूपात पडुन आहेत तर अनेक कामे पूर्ण होऊनही त्यांचा दर्जा हिन असल्याचे दिसते. त्यामुळे मंचर शहरात योग्य नियोजन होण्या ऐवजी बकाल पणा वाढल्याचे दिसत आहे. यात वाहतुक कोंडीचा प्रश्न हि मोठा ऐरनीवर आहे.


दरम्यान सर्वपीत्री अमावस्या चे निमित्त साधून सोशल मीडियावर पाठविलेली पोस्ट नक्की कोणाकडे ईशारा करते यावर चर्चाना मोठ्या प्रमाणावर उधान आले आहे. हे तीन कावळे कोण? हा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आप आपसात चर्चा करताना दिसत आहेत. मग हे कथाकथित कावळे राजकीय क्षेत्रातील आहेत कि प्रशासनातील? किंवा ठेकेदारी क्षेत्रातील एजंट अशा स्वरूपाच्या चर्चांना सर्वत्र उधान आलेले दिसत आहे.


मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतित रूपांतर झालेपासुन वापरण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा योग्य रीतीने वापर झालेला आहे कि? नाही  यावरहि चर्चा सुरु आहेत कारण ठिकाठिकाणी बांधण्यात आलेले रस्ते असोत इमारती असोत कि शौचालये हि अतिशय नित्कृष्ठ दर्जाची बांधण्यात आल्याचे सांगितले जाते जर असे आरोप वारंवार होत असतील तर या आरोपांची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. कारण तालुक्यातील नेते कराडो रुपयांचा विकास कामाचा निधी शासनाकडून आणूनहि त्याचा योग्य विनियोग  जनतेसाठी  होत नसल्याची चर्चा आहे  या जनतेच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नसल्याने तालुक्यातील जेष्ठ नेते मंडळी यात गुंतले आहेत कि काय? अशीहि चर्चा नागरिकांनातून सुरु आहे कारण अनेक वेळा आरोप होऊनही जेष्ठ नेते  या आरोपांकडे दुर्लक्ष करीत असतील तर दाल मे कुछ तो काला है कि, पूर्ण डाळच काळी आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत त्यासाठी तालुक्याच्या राजकीय नेत्यांनी यापासून बोध घेऊन योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.


दरम्यान लवकरच नगर पंचायत निवडणुका होणार असून या प्रश्नबाबत जेष्ठ नेत्यांनी आपल्या भूमिका जाहीर न केल्यास येणाऱ्या निवडणुकीत नगरपंचायत गैरव्यवहार बाबत आरोपांची राळ उठण्याची शक्यता नकरता येणार नाही. असे चित्र गाव कऱ्यांच्या आप आपसातील चर्चेतून दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version