सामाजिक
सभापती शंकरराव विठू केंगले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन
घोडेगाव दि (प्रतिनिधी)-आपल्या कार्य कर्तृत्वाने समाज्याला नवी दिशा देणारे आंबेगाव पंचायत समितीचे सभापती व आदिवासी समाज्याचे मार्गदर्शक शंकरराव केंगले यांच्या स्मुर्ती दिनांनिमित्ताने जांभोरी ता आंबेगाव येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या मागस मागस असू शकतो परंतू वैचारिक दृष्ट्या त्यांच्या श्रीमंतीचे दर्शन धडवीणारे सभापती शंकरराव केंगले यांच्या रूपाने अनेक विचारवंत या समाज्यात काम करीत आहेत.. शिक्षण कमी असले तरी वैचारिक क्षमता प्रचंड असणारी अनेक व्यक्ती आपण या समाज्यात पहातो जे आपल्या निरीक्षण शक्तीच्या व मुत्सद्देगिरी ने समाज्यात आपल्या कार्यकर्तृत्वची छाप ठेवतात कि याव्यक्ती हयात नसल्या तरी या व्यक्तींचे कार्य व विचार हे अखंडित समाज्याला नवी दिशा देण्यासाठी जिवंत असतात. आपल्या कार्यकर्तृत्वाने आंबेगावातील जनतेच्या मनात आपले स्थान अढळ केलेले आंबेगाव पंचायत समितीचे आदिवासी समाज्याचे प्रथम सभापती शंकरराव केंगले यांचा स्मुर्तीस अभिवादन करण्याचे निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
आयोजित केलेल्या कार्यक्रमात बिरसा ब्रिगेड जांभोरी, समस्त ग्रामस्थ, ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी, नोकरदार मंडळी तसेच महिला मंडळ जांभोरी यांच्या वतीने सभापती शंकरराव केंगले यांच्या स्मुर्तीस श्रद्धांजली अर्पण केली यावेळी कार्यक्रमाला बिरसा ब्रिगेड जांभोरीचे अध्यक्ष सुनील गिंरंगे, आदिवासी विचार मंचाचे प्रदीप पारधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,माजी उपसरपंच किसन पारधी ग्रामपंचायत सदस्य लता केंगले, जांभोरी पेसा उपाध्यक्ष मीना केंगले बिरसा ब्रिगेड शिलेदार गणपत पारधी विलास केंगले सुरेश केंगले आदी मान्यवर उपस्थित होते.