सामाजिक
मंचर येथे “पंडित दिनदयाल उपाध्याय” यांची हिरक महोत्सवी जयंती साजरी
मंचर दि.(प्रतिनिधी) एकात्म मानववाद प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या हिरक महोत्सव जयंती मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली.
मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते जनसेवक संजय भाऊ थोरात आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, ,“एकात्म मानववाद” — समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी दिशा दाखवणार आजच्या पिढीला राष्ट्रसेवा, आत्मनिर्भरता आणि सामाजिक एकात्मतेची प्रेरणा देणारे. पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांचा आदर्श समाजातील प्रत्येक घटकांनी घेतला पाहिजे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.
दरम्यान या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन बाणखेले सर,उपमुख्याध्यापक कारंडे सर,पर्यवेक्षक काळे सर,बच्चे सर व सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.