सामाजिक
जांभोरी येथील “न्यू इंग्लिश स्कूल मध्ये, कर्मवीर भाऊराव पाटील यांची१३८ वी जयंती” मोठया उत्साहात साजरी.
घोडेगाव दि. (प्रतिनिधी) – जांभोरी (ता.आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची१३८ जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील भीमाशंकर परिसरातील जांभोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..जांभोरी ते माचीचीवाडी येथे कर्मवी्रांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक लेझिम पथक व ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली.
यावेळी बोलताना समाज्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शिक्षणाची गंगा वाहिल्यास एक सशक्त समृद्ध समाज निर्माण होईल व त्यातून भारत देश एक समृद्ध राष्ट म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे समज्याच्या हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वेचले. व रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहचविली त्यांच्या या कार्याची आठवण समाज कधीही विसरू शकणार नाही.असे मत सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी पश्चिम विभाग प्रमुख मारुती केंगले यांनी व्यक्त केले रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवनावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान या प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल जांभोरी येथे कर्मवी्रांच्या प्रतिमेचे पूजन जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी यांनी केले यावेळी उपसरपंच बबन केंगले, ग्रामपंचायत सदस्या लताबाई केंगले, जांभोरी गावचे पोलीस पाटील नवनाथ केंगले, माजी सरपंच नारायण पारधी, , बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे, टल्लू केंगले, सुभाष केंगले उपस्थित होते
शाळेचे मुख्याध्यापक श्री काळू केंगले सर, श्री चव्हाण सर, सहशिक्षक श्री मोरे सर, शिपाई किसन केंगले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार श्री मोरे सर यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.