सामाजिक
“भीमाशंकर साखर कारखान्याकडून” रु. १७५/- प्रमाणे अंतिम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा -बाळासाहेब बेंडे
शिंगवे पारगाव दि. (प्रतिनिधी) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या ११,३८,४९६ मे.टन ऊसाचा रु.१७५/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. १९ कोटी ९२ लाख ३६ हजार हि ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
दरम्यान कारखान्याचे संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण ११,३८,४९६ मे. टन ऊसासाठी रु. ३,२९०/- प्रती मे.टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. यापूर्वी एफ.आर.पी.प्रमाणे अदा केलेला रु. ३,०८०/- प्रती मे. टन वजा जाता रु. २१०/- प्रती मे.टन शिल्लक राहत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनुसार शिक्षण संस्था निधी रु.१०/- प्रती मे. टन व भाग विकास निधी रु.२५/- प्रती मे. टन वजा जाता उर्वरित रक्कम रु. १७५/- प्रती मे. टनाप्रमाणे होणारी रक्कम रु. १९ कोटी ९२ लाख ३६ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.
दिपावलीपूर्वी शेतक-यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला असून रब्बी हंगामाची सोसायटी रक्कम भरणा करण्यास मदत होणार आहे. कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम नेहमीच वेळेत दिलेली आहे. याशिवाय वाढीव रक्कम कपाती वजा जाता रु. १७५/- प्रती मे. टन अंतिम हप्त्याचे स्वरुपात ऊस उत्पादक शेतक-यांना दिलेली आहे. लवकरच साखर वाटप देखील केले जाणार आहे. गाळप हंगाम २०२५-२६ करीता ऊस गाळपाची तयारी झालेली असून त्यामध्ये मशिनरीचे संपूर्ण ओव्हरऑयलिंग पूर्ण झालेले असून ऊस तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणेचे करार करून अँडव्हान्स अदा केलेला आहे.
संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप करण्याचे पूर्ण नियोजन केले आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.