सामाजिक
अतीवृष्टी मुळे काळवाडी नं१ येथे दरड कोसळण्याचा धोका, : ना. दिलीप वळसे पाटील यांनी घेतली ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट
घोडेगाव दि.- जांभोरी ता. आंबेगाव जवळच असलेल्या काळवाडी क्र १ या गावांत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने तालुक्याचे आमदार वळसे पाटील यांनी तातडीची मदत पाठवून ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन केले.
गेल्या दोन दिवसांमध्ये संपूर्ण राज्यसह आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम भागात प्रचंड पाऊस झाला. सर्वदूर जगलेल्या या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या काळात आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी जवळच असलेल्या काळवाडी नं. १, येथे दगड कोसळण्याचा धोका धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत तत्परता दाखवीत मा.नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी या ग्रामस्थ्यांचे स्थलांतर केले व प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांची विचारपूस केली व जेवण व आदी आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या.
दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या मागणी केली असता शासनाने जमीन उपलब्ध केली असून प्लॉट तयार करण्याचे काम सुरू सांगण्यात आले व घर बांधण्यासाठी शासनाकडून १,६०,००० रुपये दिले जातील, उर्वरित निधी सीएसआरच्या माध्यमातून उभा केला जाईल.असेही सांगण्यात आले तसेच काळवाडी क्रमांक १ व २ या वस्त्या मिळून ७० घरे काही महिन्यांत पूर्ण केली जातील. लोकांना चांगली स्लॅबची, टिकाऊ घरे देणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही यासाठी कटिबद्ध आहोत, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी पुर्वा वळसे पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, नंदकुमार सोनावले, प्रकाश घोलप, माजी सभापती संजय गवारी, प्रवीण पारधी, अमोल अंकुश, निलेश बोऱ्हाडे, जितेंद्र गायकवाड, शामराव बांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, पोलिस पाटील नवनाथ केंगले, सागर पवार एपीआय घोडेगाव,ग्रामसेवक सुनिल पारधी, तलाठी विशाल गारे, सुनिल लोहकरे कृषी सेवक.संतोष जाधव, निलेश कान्नव, अशोक शेंगाळे,वैभव उंडे, सरपंच सुनंदा पारधी, उपसरपंच बबन केंगले, माजी सरपंच किसन पारधी, विठ्ठल पारधी, दुंदा भोकटे बाबा ग्रामपंचायत सदस्या लताबाई केंगले, सामाजिक कार्यकर्ते मुरली केंगले.जांभोरी काळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.