सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार
मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..