सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले
डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.