सामाजिक
पीडितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी,संकटकाळी देवासारखा “दत्त” म्हणून मदतीला धावणारा जण सामान्यांचा नेता “देवदत्त”

आजच्या काळात सर्वसामान्य जणांचे आसू पुसत संकटकाळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारी निस्वार्थी मंडळी थोडीच असतात. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाऊन मदतीचा हात तर दूरच, पण आपुलकीचे चार शब्द बोलणेही आजच्या नेत्यांना जमत नाही. परंतु या काळातही सर्वसामान्यांना आपले म्हणणारी अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रांत अनेक मंडळी कार्यरत आहेत. त्यात एक नाव येते ते म्हणजे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम

घटना इतरांच्या दृष्टीने तशी साधीच पण घटना कोणतीही असो आनंदाचे सर्वच सोबती असतात पण दुःख प्रसंगी जे उभे राहतात तेच खरे मित्र, “म्हणतात ना….” बुडत्याला काडीचा आधार”, अशाच वेळी पीडित कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात त्यांना आधार देऊन सावरण्यासाठी देवासारखे दत्त म्हणून उभे ठाकले ते “देवदत्त”
याबाबत सविस्तर वृत्त असे समजते की,घोडेगाव पासून सुमारे चार कि मीटर अंतरावर असलेल्या बाभुळवाडी (साल)येथे राहत असलेल्या श्री.गुलाब देवराम कदम यांचा शेतातील बैलांचा गोठा जाळून खाक झाला यात दोन बैल यासह अनेक वस्तू जाळून खाक झाल्याची दुःखद घटना घडली

( आगच्या भक्ष्यस्थानी पडलेला गोठा)
बैल हा प्राणी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच असतो. आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांना निटपणे वैरण पाणी दिले कि नाही. याची चौकशी केल्याशिवाय किंवा त्यांना खाऊ घातल्या शिवाय बळीराज्याच्या पोटात कधीच अन्नाचा घास जाणार नाही. अशातच आपले दोन बैल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले म्हटल्यावर शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला म्हणणे वावगे ठरणार नाही.

(शेतकरी कुटुंबाचे सांत्वन करताना देवदत्त निकम)
याबाबत असे कळते की, दुपारच्या वेळी अज्ञात व्यक्तिने गुलाब कदम यांच्या शेतातले बांधाचे गवत पेटवले . त्यावेळी हवा जास्त असल्यामुळे इतर शेतातील बांध पेटु लागले व दुपारी घरी कोणीही नसल्यामुळे जवळच असलेल्या गोठ्याला आग लागली यात श्री.गुलाब कदम यांच्या गोठ्यातील दोन बैल,शेतीची अवजारे ,धान्य,पाईप व ईतर आंब्याची झाडे हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यामुळे पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला .या घटनेची बातमी पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांना मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या सुरू असलेल्या राजकीय धामधूमिकडे दुर्लक्ष करीत देवदत्त निकम यांनी साल गावात जाऊन संबंधित पीडित कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली.

दरम्यान पीडित कुटुंबियांना शासकीय पातळी वरून तातडीची मदत मिळावी यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक.भालेकरसाहेब व तहसीलदार आंबेगाव यांच्यासोबत चर्चा करून पीडित कुटुंबियांना मदत मिळण्याविषयी विनंती केली. त्याचप्रमाणें कदम कुटुंबियांना प्राथमिक स्वरूपात आर्थिक मदत व्हावी यासाठी रुपये पाच हजार मदत रोख स्वरूपात देऊन मदतीचा हात पुढे केला.

या वेळी घोडेगाव शिवसेना (उद्धव ठाकरे) शहर प्रमुख नंदकुमार बोऱ्हाडे, जेष्ठ नेते बबन राव गव्हाणे ,सागर गव्हाणे,अतुल गव्हाणे,वसंत गव्हाणे,,शिवदास गव्हाणे,कचर गव्हाणे, ,मिनाबाई गव्हाणे ,गिरीश मते,विशाल वाबळे आदी मान्यवर घटना स्थळी उपस्थित होते
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….