अध्यात्मिक
ना. दिलीपरावजी वळसे (पाटील) यांच्या प्रकृतीत लवकर सुधाणा व्हावी, यासाठी महिला सरपंच यांनी स्वयंभू राजा हरिश्चंद्र महादेवास केला रुद्राभिषेक
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातमुळे मोठी दुखापत झाली होती. त्याच्यावर पुण्यातील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया देखील उत्तमरित्या संपन्न झाली आहे.

ना. वळसे पाटील या सर्व गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर पडावेत व वळसे पाटील यांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरातील विविध ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच यांनी एकत्र येऊन घोडेगाव येथील ग्रामदैवत स्वयंभू शिव ज्योतिर्लिंग स्वरूप राजा हरिश्चंद्र महादेव मंदिरात जाऊन शिवलिंगावर रुद्राभिषेक केला. या शिवरुद्राभीषेकाचे पौरोहित्य राकेश राघवेंद्र नरखेडकर यांनी केले.
दरम्यान घोडेगाव येथील स्वयंभू राजा हरिश्चंद्र महादेव मंदिरावर या परिसरातील भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे. या ठिकाणी महापूजा करून केलेली याचना लवकर फलश्रुत होते अशी या परिसरातील भाविकांची धारणा आहे

या प्रसंगी घोडेगावचे सरपंच अश्विनी तिटकारे,काळेवाडी दरेकरवाडीचे मा.सरपंच शुभांगी काळे, गिरवलीचे मा.सरपंच पुजा सैद, आंबेगाव गावठाणचे सरपंच प्रमिला घोलप, चिंचोली सरपंच विद्या कोकणे, तसेच घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य नंदाताई काळे,शोभा घोलप,पुनम घोलप आदि महिला उपस्थित होत्या.
अध्यात्मिक
खरोशी येथे “श्री दत्त मूर्ती” प्राणप्रतिष्ठापणा व भव्यदिव्य मंदिर कलशरोहन सोहळा
राजगुरूनगर दि. (प्रतिनिधी) दिगंबरा…. दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या शुभप्रसंगी श्री दत्त जयंतीचे निमित्ताने खरोशी (ता. खेड) येथे श्री दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व भव्य मंदिर कलशारोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

खेड तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीत श्री क्षेत्र भीमाशंकर च्या परिसरात असलेल्या खरोशी या गावामध्ये भव्य दत्त मंदिर उभारण्यात आले असून (दि १३ व १४ रोजी) या मंदिराचा कलशरोहन सोहळा संपन्न होत आहे.
याप्रसंगी शुक्रवारी(दि १३रोजी) सकाळी गणेश पूजन पुण्यहावाचन मातृका पूजन,वास्तूपीठ क्षेत्रदेव पूजन, पिठस्थ देवातांची स्थापना,अग्नी स्थापना, नवगृह स्थापना, होईल त्यानंतर श्री दत्त मूर्ती व कलश यांची पारंपारीक पद्धतीने ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक होईल. त्याचप्रमाणे श्रीच्या मूर्तीचा अभिषेक त्यानंतर मूर्ती व कलश धान्य निवास होऊन महाप्रसाद होऊन रात्री कालभैरवनाथ भजन मंडळ धामणगाव यांचा संगीत भजन कार्यक्रम होईल.

दरम्यान शनिवारी ( दि १४रोजी) सकाळी पिठस्थ देवतांची पूजा व उत्तरांग हवन त्यानंतर कलश व श्री मूर्ती दशविधी स्नान,त्यानंतर ब्रम्हचैतन्य श्री प्रभुनाथ महाराज यांचे शिष्य श्री संजय माऊली (कोल्हापूर) यांचे हस्ते कलश व मूर्ती पूजन होऊन त्यानंतर कलशरोहन व श्री दत्त मूर्ती स्थापना होऊन पूर्णआहुती आरती होईल. त्यानंतर दुपारी श्री जगदाळे महाराज यांचे श्री दत्त जन्म कथेवर प्रवचन होऊन त्यानंतर दत्तजन्म सोहळा होईल त्यानंतर हारतुरे,संगीत भजन होऊन पालखी मिरवणूक होऊन महप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी खेडचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी शेठ काळे, मा. आमदार दिलीपशेठ मोहिते, मा. आमदार सौ. सुलभाताई गायकवाड़, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुरेश कौदारे, हुतात्मा राजगुरू पतसंस्था अध्यक्षदत्तात्रय वाळुंज,माथाडी कामगार नेतेमारुती कौदारे, आंबेगाव तालुका पत्रकार संघ अध्यक्ष संजय कोकणे, कात्रज दूध संघाचे संचालक अरुणशेठ चांभारे, डेहणे आदिवासी सोसायटी चेअरमन रामचंद्र लांघी सह आदी मान्यवर उपास्थित राहणार आहेत तरी पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री दत्त युवा प्रतिष्ठान,हरिपाठ सेवा मंडळ,श्री कागजादेवी सेवा मंडळ यांचे व समस्त ग्रामस्थ खरोशी यांचे वतीने करण्यात आले आहे.
अध्यात्मिक
पोखरी येथील गोरक्षनाथ आश्रमावर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
घोडेगाव दि (जोशी जितेंद्र यांजकडून) योगी बेलनाथ महाराज गुरू श्री. योगी संपतनाथ महाराज – श्री. गुरू गोरक्षनाथ आश्रम राजेवाडी ता. आंबेगाव) येथे गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
गुरु:ब्रम्ह:गुरु: विष्णू: गुरु: देवो: महेश्वर, गुरु:साक्षात परब्रम्ह: तसमे श्री गुरु्वे नमः या विश्वाच्या निर्मात्याने माता पिता यांना प्रथम गुरु त्यानंतर जीवनाचा अर्थ समाजून घेण्यासाठी गुरु आवश्यक आहे. गुरु जो अज्ञाणाचा अंधःकार दूर करून आपल्या जीवनाला एक प्रकाशमय मार्ग दाखवितो. जो गुरु पूर्ण प्रामाणिक पणे त्या सद् गुरुला शरण गेलो. त्यांच्या पासून आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच व्यास(गुरु) पौर्णिमेनिमित्त सर्वत्र प्रत्येक नागरिक आपल्या गुरुला अभिवादन करण्यासाठी या दिवसांची वाट पहातो. गुरु च्या चरणाची (पाद्य ) पूजा करूनच तो पुढील कार्याची सुरुवात करतो.

. आंबेगाव तालुक्यातील राजेवाडी येथे श्री गोरक्षनाथ आश्रम येथे महंत बेलनाथ महाराज यांच्या आश्रमावर देशाच्या कानकोपऱ्यातून असंख्य शिष्यगण उपस्थित होते गुरुपौर्णिमा निमित्ताने शेकडो भाविक ग्रामस्थ व बाबांच्या शिष्य मंडळाने महाप्रसाद व गुरुपुजनाचा आनंद घेतला. त्या निमित्त अनेक भजन मंडळ, साधुसंत उपस्थित होते. गुरू पौर्णिमेनिमित्त देवाचा अभिषेक, होम हवन, कन्या पूजन, रुद्राक्षाचे वाटप, गुरू पूजन व तसेच सुंदरकांड पाठ देखील करण्यात आला. महिलांसाठी आश्रमातील माहेर हा उपक्रम राबवून त्यांचा सन्मान करण्यात आला. बेलनाथ महाराज ह्यांनी गुरू उपदेश करत गुरुबद्दल माहिती दिली.
.
अध्यात्मिक
गोवर्धन प्रकल्पाचे सर्वोसर्वा देवेंद्र शाह यांच्या हस्ते अंगारकी निमित्त “श्री सिद्धीविनायकांची” विधिवत पूजा संपन्न
हिंदू धर्मातील पवित्र व्रत अंगारकी चतुर्थी निमित्त मंचर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात श्री गणेश यांच्य मूर्तीची विधिवत पूजा गोवर्धन प्रकल्पाचे संस्थापक चेअरमन देवेंद्र शेठ शाह यांचे हस्ते संपन्न झाली.

अंगारक योग यास खूप महत्व प्राप्त आहे सर्व गणांचा अधपती 64 कलाची देवता देवतांनामध्ये प्रथम पूजाणिय असलेली श्री गणरायांची पूजा केली जाते. असेही म्हटले नवग्रहात जाते की मंगळ ग्रह यांच्या प्राभाव कमी करण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश यांची विधिवत पूजा केली जाते. सुमारे सहा महिन्यानंतर येणाऱ्या या चतुर्थीच्या योगास सनातन धर्मात फार महत्व आहे हिंदू धर्मात आबाल वृद्धांपासून, लहान मुलांपर्यंत सर्व जण अंगारकी चतुर्थीचे व्रताचे पालन करतात. सर्वांची आवडती प्रत्येक हिंदू धर्मियांच्या मनामनात एक अढळ स्थान असलेली व सर्वांची दृढ श्रद्धा असलेले दैवत म्हणजेच श्री गजानन होय.

दरम्यान मंगळवार (दि.२६) रोजी मंचर येथील गोवर्धन प्रकल्प येथे असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थी मोठ्या उत्साहातसाजरी करण्यात आली. “ओंकार स्वरूप” श्री गणरायाच्या मूर्तीला पराग प्रकल्पाचे चेअरमन देवेंद्र शाह यांच्या हस्ते दिव्यमंत्रांच्या जय घोषात “श्री गणेश” मूर्तीचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष संजय मिस्त्रा, संचालक सचिन शाह पराग समूहाचे विविध विभागांचे प्रमुख तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व विधींचे पौरहित्य अमित सोमाणी यांनी केले.

दरम्यान गोवर्धन प्रकल्पाच्या आवारात सुंदर, पुरातन पद्धतीचे सुबक मनमोहक नक्षीकाम केलेले पांढऱ्या शुभ्र दगडामध्ये बनविलेले भव्य दिव्य मंदिर अनेकांना आकर्षित करते या मंदिरात असलेली काळ्या पाषाणातील सुंदर श्री गणेशाची मूर्ती पाहून सर्वच भाविकांचे मन प्रसन्नतेने फुलून जाते. या श्री सिद्धी विनायक मंदिराला अंगारकी चतुर्थी निमित्ताने विविध रंगीबेरंगी फुलांची आरास व मनाला भुरळ पाडेल अशी मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी श्रीच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
-
राजकीय2 years agoवीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय2 years ago“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय1 year agoवळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years agoआयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय1 year agoआंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय2 years agoअढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year agoभोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक2 years ago“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….

🔑 You have received a email # 499. Read >> https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=ab8922423a68a47da5e3e0dff1eaa0a0& 🔑
November 20, 2024 at 12:48 am
jqceko