singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

क्रीडा

घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कुल चा साई वामन व जय शहा मॉडेल मेकिंग स्पर्धेत तृतीय  तर अनामिका हि निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर विजयी

Published

on

आयुका या संस्थेच्या वतीने नॅशनल सायन्स डे प्रोग्राम फॉर रुलर स्कूल या स्पर्धा अवसरी (ता.आंबेगाव) येथे उत्साहात पार पडल्या या स्पर्धवसाठी तालुक्यातील अनेक शाळांनी भाग घेतला होता आयुका संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या

या स्पर्धानमध्ये इतर सुमारे 20 त्व २५ शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदविला यात इयत्ता नववीचे विद्यार्थी साई जितेंद्र वामन व जय महेश पटेल या विद्यार्थ्यांनी मॉडेल मेकिंग या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला तर कुमारी अनामिका अरविंद काळे या विद्यार्थिनीने निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले 

दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे शिक्षक कैलास जाधव व श्रीमती हुदा शेख यांचे आणि प्राचार्य  व उप प्राचार्य यांचे संस्थेच्या संचालक मंडळाकडून  व घोडेगाव ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

क्रीडा

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घोडेगाव येथील “न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल” च्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड 

Published

on

घोडेगाव दि. (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा मध्ये घोडेगाव(ता आंबेगाव) येथील “न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल” च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले.

   अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर ता आंबेगाव येथे  तालुका स्थरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या यात घोडेगाव येथील इंग्लिश मेडीयम स्कूल च्या एकूण 46विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अनुक्रमे १४,१७ व १९ वर्ष वयोगटाच्या  मुले व मुलींनी सहभाग घेतला होता.यात न्यू इंग्लिश स्कूल च्या पुढील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश यश मिळविले ते पुढील प्रमाणे कु.पृथ्वीराज जितेंद्र खोसे थाळीफेक(१७ वर्षे वयोगट) प्रथम क्रमांक मिळाला.कु.अखिल धोंडू आंबवणे हॅमर थ्रो(१७ वर्षे वयोगट) द्वितीय क्रमांक मिळाला .कु. वेदांत पांडुरंग काळे ३ हजार मीटर धावणे(१७ वर्षे वयोगट) तृतीय क्रमांक मिळाला. १४वर्षे वयोगटातील कु.देविका संदीप काळे

 गोळा फेक- प्रथम क्रमांक , थाळीफेक- प्रथम क्रमांक ,कु.चेतना अरुण काळे_ उंच उडी -प्रथम क्रमांक , ८० मीटर हर्डल्स – द्वितीय क्रमांक, लांब उडी- तृतीय क्रमांक ,कु.कस्तुरी गोरक्षनाथ मीडगुळे उंच उडी- तृतीय क्रमांक मिळाला आहे.

दरम्यान १७ वर्ष वयोगटामधील कु.श्रद्धा राजेंद्र लोहोट ८०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक , तिहेरी उडी- प्रथम क्रमांक,  ४०० मीटर हर्डल्स- द्वितीय क्रमांक,कु. रुची रावसाहेब लोहगोळा फेक- द्वितीय क्रमांक, कु.गौरी गणेश पोखरकर_ हातोडा फेक_ द्वितीय क्रमांक, कु.जोया जावेद पानसरे २०० मीटर- रनिंग तृतीय क्रमांक,कु.आलीना इरफान मुजावर ४००मीटर रनिंग- तृतीय क्रमांक,कु.जान्हवी राजेश बोराडे थाळीफेक-तृतीय क्रमांक मिळाले आहेत.

त्याचप्रमाणे १९ वर्ष वयोगटामधील कु.समीक्षा गोवर्धन भास्कर तिहेरी उडी- प्रथम क्रमांक ,कु.आर्या किरण बोनवटे तिहेरी उडी- द्वितीय क्रमांक , भालाफेक-तृतीय क्रमांक ,कु.स्नेहल दत्तात्रय डुकरे थाळीफेक- द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

(संग्रहित चित्र)

दरम्यान कु.देविका काळे,कु. चेतना काळे,श्रद्धा लोहोट ,कु.रुची लोहोट, कु.स्नेहल डुकरे ,कु.समीक्षा भास्कर ,कु.आर्या बोनवटे, कु.गौरी पोखरकर, कु.पृथ्वीराज खोसे, कु.अखिल आंबवणे यांचप्रमाणे वरीलपैकी १० विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक सौ. ज्योती रोकडे व श्री रोहित तळेकर सर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक, विद्यालयाचे चेअरमन श्री.बाळासाहेब काळे, प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी,पर्यवेक्षिका सौ वंदना वायकर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Continue Reading

क्रीडा

घोडेगाव “न्यू इंग्लिश स्कूल च्या” विद्यार्थ्यांनीं तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत मिळविले नेत्र दीपक यश: ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव…!!!

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) येथे क्रीडा संचालणालायावतीने आयोजित  तालुका स्तरीय  कुस्ती स्पर्धा मध्ये घोडेगाव (ता आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक  यश संपादन केले.त्यामुळे ग्रामस्थांकडून भरघोस  कौतुकाचा वर्षाव केला  जातं आहे.

 क्रीडा संचालनालय पुणे यांच्यामार्फत शासकीय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याचं मंचर येथील तालुका क्रीडा संकुल, येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन  कामगिरी करून नेत्रदीपक यश प्राप्त केले. यामध्ये आपल्या विद्यालयाच्या एकूण ५ विद्यार्थ्यांची  जिल्हा पातळी वरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

दरम्यान पुढील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन नेत्र दीपक कामगिरी केली ते पुढील प्रमाणे मुले (१४ वर्षे) गट-  कु.विवेक मनोज घोलप(52kg) प्रथम क्रमांक.मुली (14 वर्षे) गट- कु.कस्तुरी मिडगुळे (39kg) द्वितीय क्रमांक.-कु.स्वरा राजीव झोडगे (36kg),द्वितीय क्रमांक.- मुले (१७ वर्षे )गट -ध्रुव काळे (51kg) प्रथम क्रमांक.आदित्य बेल्हवरे (71kg)प्रथम क्रमांक.-आयुध कर्पे (80kg),प्रथम क्रमांक.- मुली (17 वर्ष)गट- गौरी पोखरकर (61kg)प्रथम क्रमांक.

दरम्यान विजयी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. रोहित तळेकर व सौ ज्योती रोकडे मॅडम यांचे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी व संचालक, विद्यालयाचे चेअरमन,  तसेच  न्यू इंग्लिश मीडियम स्कूल परिवाराच्या वतीने हार्दिक  अभिनंदन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा दिल्या.

Continue Reading

क्रीडा

अकलूजचा “पै. विक्रम घोरपडे” ठरला “मंचर केसरी”

Published

on

मंचर दि . येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती आखाड्यात   पैलवान विक्रम घोरपडे हा स्पर्धेचा मानकरी ठरला असून याने  मंचर केसरी चा सन्मान मिळवत  ७१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे  बक्षीस पटकावलेआहे अशी माहिती यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी दिली.

        मंचरचे शेवाळेवाडी निघोटवाडी(ता.आंबेगाव) ग्रामस्थांचे कुलदैवत असलेल्या श्री भैरवनाथ माहाराज यात्रेनिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानी खेळामध्ये महाराष्ट्रयातील पुणे, नगर, नाशिक, सांगली, कोल्हापूर सातारा या विविध जिल्ह्ययातून  अनेक नामांकित कुस्ती पैलवानांनी  येऊन आपला खेळ प्रदर्शित केला. रोमांचक व सहासी  डाव प्रतिडाव टाकत विरोधी पैलवानास धूळ चारून असमान दाखवत अनेक कुस्त्यांचे खेळ पार पडले.  

       दरम्यान या  कुस्त्यांच्या आखाड्यात अकलूजचे पैलवान विक्रम घोरपडे यांच्याविरुद्ध गोकुळ तालमीचे पैलवान अक्षय कावरे  त्यांच्यात कुस्तीचा रोमांचकारी थरार पाहायला मिळाला.यात घोरपडे यांनी कावरे यांना चितपट करून ७१ हजाराचे रोख बक्षीस व मानाचा किताब पटकावला.

     द्वितीय क्रमांक साठी पैलवान अविनाश मूळ, पारनेर विरुद्ध पैलवान गणेश बेनके शिरूर, यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत  मुळूक यांनी विजयीश्री संपादित करीत . 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले

                दरम्यान या आखाड्यात पाचशे रुपयांपासून तर प्रथम क्रमांकापर्यंतच्या विविध कुस्ती मोठ्या उत्साहात पारपडल्या यावेळी गोवर्धन समूहाचे प्रमुख देवेंद्रशेठ शहा, पं. समितीसदस्य राजाराम बाणखेले, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे , भाजप नेते संजय थोरात, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुरेखाताई निघोट, लक्ष्मण बाणखेले, आंबेगाव तालुका कुंभार समाज तालुका अध्यक्ष राजुशेठ सोमवंशी, नामदेव शेठ थोरात, राजू भंडारी , चेअरमन शशिकांत बढे ,काँग्रेस नेते गणेश खानदेशे,  माजी जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर, सुहास बाणखेले, अरुण शेठ गांजाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या आखड्याची शोभा वाढविण्यासाठी  पैलवान अंकित धुळगंड विरुद्ध पैलवान अर्जुन चव्हाण, पैलवान अरुण खेंगले विरुद्ध पैलवान आदेश रायकर, पैलवान गोवर्धन शिंदे विरुद्ध पैलवान भारत चव्हाण, पैलवान कुमार देशमाने विरुद्ध पैलवान सागर सुळ, पैलवान भाऊसाहेब सदगीर विरुद्ध पैलवान आर्यन कराळे, पैलवान रोशन भोसले विरुद्ध पैलवान हर्षद घोलप, पैलवान कुणाल बच्चे विरुद्ध पैलवान पवन रोखले, पैलवान अक्षय खंडागळे विरुद्ध पैलवान रोहन मांजरे, पैलवान शुभम कराळे विरुद्ध पैलवान आण्णा वाळकुंडे, पैलवान सुजित मुळे विरुद्ध पैलवान वेदांत गुजर, पैलवान शुभम शेळके विरुद्ध पैलवान लक्ष्मण सावंत, पैलवान सिंहध्वज कणसे विरुद्ध पैलवान यश चांदवडे ,पैलवान राम आव्हाड विरुद्ध पैलवान रोहन मांजरे, पैलवान कार्तिक सुरकते विरुद्ध पैलवान अभी सावंत, पैलवान यश मोहिते विरुद्ध पैलवान सतीश पडवळ ,पैलवान अजय मोहिते विरुद्ध पैलवान अमोल शिंदे, पैलवान सार्थक वहिले विरुद्ध पैलवान अविराज थिटे ,पैलवान हर्षल दिवेकर विरुद्ध पैलवान श्रवण वहिले यांच्यात कुस्त्या लावण्यात आल्या. तसेच पैलवान श्रीशा काळे विरुद्ध पैलवान संचिता रोकडे अशी महिलांची कुस्ती विशेष आकर्षण ठरली.

      विजेत्या पैलवानांना  पप्पू  बागल ॲड. बाळासाहेब पोखरकर, बाबुशेठ मोरडे, शांताराम जाधव ,बंटी बागल, बबलू थोरात, त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सहा लाख रुपयांच्या कुस्त्यांचं आयोजन केलं यात २८ निकाली कुस्त्या झाल्या. सायंकाळी साडेपाच ते रात्री पर्यंत कुस्तीचा डाव रंगला होता.

  कुस्त्यांचा आखाड्याचे नियोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्ता थोरात, कार्याध्यक्ष ,राजेंद्र थोरात, युवराज बाणखेले,जेके थोरात यांनी केले.उपाध्यक्ष प्रवीण मोरडे, मंगेश बाणखेले ,कैलास गांजाळे, संजय बाणखेले, सुरेश निघोट, सचिन मोरडे बाबू बोऱ्हाडे राजू सोमवंशी आकाश खानदेशे जगदीश घिसे, स्वप्निल बेंडे, आदी यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.यावेळी पंच म्हणून जाधव आणि हिंगे सर यांनी काम पाहिले. मैदान व्यवस्था सचिन बाणखेले,लक्ष्मण थोरात प्रथमेश निघोट यांनी केली बघितली. कुस्त्यांच्या आखाड्यांचे समालोचन अक्षय मुळूक यांनी केले.

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in