आरोग्य
मंचर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भराव्यात – आंबेगाव तालुका शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षाची मागणी

मंचर दि (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रुग्णालायात, फिजिशियन, भुलातज्ञ्,,श्रीरोगतज्ञ् यांच्या जागा रिक्त असून त्या त्वरित भरण्यात याव्यात अशी मागणी आंबेगाव तालुका शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे पक्ष ) यांच्याकडून करण्यात आली आहे

सर्वसामान्य रुग्णाना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने मंचर येथे उपाजिल्हा रुग्णालंय कार्यरत केले असून या रुग्णालायात व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याच्या अनेक ग्रामस्थ्यांच्या तक्रारी आहेत. या ग्रामीण रुग्णालायात खेड,जुन्नर, आंबेगाव, शिरूर, संगमनेर आदि भागातून अनेक रुग्ण येतात परंतु या रुग्णाना व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याची तक्रात करण्यात आली त्याच प्रमाणे काही कर्मचारी येणाऱ्या रुग्णाना विविध तपासांनी करण्यासाठी बाहेरच्या लॅब मध्ये पाठवितात.
वास्तविक पहाता उपजिल्हा रुग्णालायातच रुग्णाच्या रक्त लघवी यासाह विविध तपासण्यारुग्णालायातच होणे अपेक्षित आहे. परंतु काही कर्मचारी या रुग्णाना येथे सुविधा नसल्याचे सांगत बाहेरून तपासांनी करायला सांगत असल्याचे सांगितले जाते. कोणत्याही रुग्णालायाकडून एखाद्या लॅब मध्ये रक्त अथवा कोणतीही तपास्नी करण्यात आल्यानंतर बाहेरच्या लॅब मध्ये तपासांनी करण्यात सांगितलेल्या वैद्यकीय कर्मचारी यांस खाजगी लॅब ने रुगणाकडून अकारलेल्या रक्कमेतून खाजगी लॅब कडून सुमारे चालीस ते पन्नास टक्के कमिशन दिले जातं अशी भयावह माहिती आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून सांगितले जाते.

या प्रसंगी शिवसेना जिल्हप्रमुख सुरेश भोर, जिल्हा निरीक्षक राजराम बाणखेले, तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक अरुण नाना बाणखेले,मंचर शहर प्रमुख जाधव, महेश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य
5 Best Fruits For Digestion | पचनासाठी लाभदायक फळे

Best Fruits For Digestion – आपल्या आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्याची सुरुवात ही नेहमी पोटापासून होते असे डॉक्टर अनेकदा सांगताना दिसतात तशाच आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्याला मिळेल ते आणि मिळेल तेव्हा आपण काही खातो यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता किंवा पोटात गॅसच्या समस्या उद्भवतात कधी कोणत्या समस्या व्हायला नको असं तुम्हाला वाटत तर सगळ्यात महत्वाची आपली पचनक्रिया ही चांगली असणे गरजेचे आहे त्यामुळे अशावेळी आपण कोणत्या 5 Best Fruits For Digestion फळांचे सेवन केले पाहिजे याबाबत तज्ञांनी दिलेली माहिती.
Best Fruits For Digestion फळे खालील प्रमाणे:
या फळांमध्ये पपई, मध-लिंबू , केळी, सफरचंद, कलिंगड अशांचा सहभाग होतो हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे.
पपई | Papaya:
पपई ही फक्त आपल्या त्वचेसाठी नाही तर आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी ही लाभदायक आहे यामध्ये असणारे पाचक एंजाइम हे आपल्या पोटासाठी चांगले असतात पपईमध्ये फायबर कॅरोटीन विटामिन सी, इ, ए आणि इतर अनेक खनिजे असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात जड आहार सहज पचण्याची क्षमता ही पपई हा एक रामबाण उपाय आहे.
मध-लिंबू | Honey Lemon Drink:
कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबू घालून त्याचे सेवन केल्याने पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती दोन्ही सुधारतात त्याशिवाय वजनही कमी होते मात्र याच्या अतिशय उन्हाने अशक्तपणा येण्याची शक्यता देखील असते.
केळी | Bananas:
पचन संस्था चांगली असायला हवी असे तुम्हाला वाटत असेल तर नेहमी केळीचे सेवन करत रहा. यात मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सफरचंद | Apple:
अपचन पोटात गॅस होणे यासारख्या पचनाशी निगडित समस्या असतील तर रोजच्या आहारात सफरचंद हवच. सफरचंदातून प्रथिने, फायबर आणि जीवनसत्व शरीरात मिळतात. या घटकांमुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून तुमची सुटका होते. पचन नीट होण्यासाठी सफरचंदातील गुणधर्म मदत करतात.
कलिंगड | Watermelon:
तुम्हाला नेहमीच मिळेल असं नाही पण तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा कलिंगडाचे सेवन करा. कलिंगडामध्ये अँटॉक्सिडंट, जीवनसत्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला ऊर्जाही मिळते.
कोणत्या पदार्थांमुळे तुम्हाला डीहायड्रेशन होऊ शकते याची माहिती जाणून घेण्यासाठी खालील आर्टिकल सुद्धा वाचा
Frequently Asked Questions:
- How is papaya beneficial for digestion? | पपईसाठी कसे उपयुक्त आहे?
पपईला आपल्या पोटाचे स्वस्थ आरोग्य बनवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात अनेक पाचक एंजायम, फायबर, कॅरोटीन, विटामिन सी, इ, ए आणि अनेक खनिजे आहेत. - How to prepare the honey lemon drink? | मध-लिंबू ड्रिंकसाठी कसे तयार करावंत?
कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबू घालून त्याचे सेवन केल्याने पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती दोन्ही सुधारतात. त्यामुळे वजन कमी होते आणि अतिशय उन्हाने अशक्तपणा येण्याची शक्यता देखील असते. - How to incorporate bananas into the diet? | केळीचे सेवन कसे करावंत?
रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात केळीचे सेवन करणे पचन संस्थेसाठी चांगलं आहे. त्यात फायबर मोठ्या प्रमाणात आहे जे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. - How can apples contribute to better digestion? | सफरचंदाचे उपयोग कसा करावा?
सफरचंदातून प्रथिने, फायबर आणि जीवनसत्व शरीरात मिळतात. यात मदत करण्यासाठी रोजच्या आहारात सफरचंद हवच. - What are the benefits of watermelon consumption? | कलिंगड कसे खाल्ल्यानंतर लाभकारी आहे?
कलिंगडामध्ये अँटॉक्सिडंट, जीवनसत्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला ऊर्जाही मिळते.
सारांश:
“यावरून असे प्रतीत होते की आपल्या आहारामध्ये फळाचे असणे किती गरजेचे आहे तुम्हाला जर तुमचे पोटाचे विकार बरे करायचे असतील तुमचं डायजेशन सिस्टम व्यवस्थित करायचं असेल तर तुमच्या आहारात ही फळे असलीच पाहिजेत तुमची डायजेशन सिस्टम म्हणजेच पचन संस्था जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला इतर आजार होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे रोजच्या जेवणात या फळांचा सीजननुसार उपयोग करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या आरोग्य चांगले राहील.”
Protein- शरीराला दररोज किती प्रोटीन ची गरज असते. याची माहिती जाणून घेण्यासाठी खालील आर्टिकल सुद्धा वाचा
आरोग्य
Dehydration – ‘या’ पदार्थांमुळेही होऊ शकते डिहायड्रेशन

Dehydration – ‘या’ पदार्थांमुळेही होऊ शकते डिहायड्रेशन
शरीरात पाणी कमी झाल्यास ‘डिहायड्रेशन‘ची Dehydration समस्या निर्माण होते. शरीर निरोगी राखण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या अधिक तीव्र होते. तर, पावसाळ्यात अनेक जणांकडून पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. ‘हायड्रेट‘ राहण्यासाठी फक्त पाणी पिणेच गरजेचे नाही तर रोजच्या आहारावरही लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा वेळी अवेळी किंवा चुकीचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा कमी होऊ शकते. शरीरात पाणी कमी झाल्यास सतत तहान लागणे, लघवीचा रंग गडद पिवळा असणे, लघवीला तीव्र दुर्गंध येणे, लघवीची वारंवारता घटणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, तोंड, ओठ किंवा जीभ सतत सुकणे आणि डोळ्यांची जळजळ अशी लक्षणे जाणवतात. फक्त पाणी कमी प्यायल्यामुळेच नाही तर काही खाद्यपदार्थांनाही शरीरातील पाण्याची मात्रा खालावते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ…
कॉफी :
अनेक जणांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने होते. कॉफीमध्ये कॅफिन असते ज्यामुळे दिवसभराची ऊर्जा मिळते. मात्र, त्याचमुळे डिहायड्रेशनदेखील होऊ शकते. शरीरात कॅफिनची मात्रा अधिक झाल्यास ते मूत्रवर्धक म्हणून काम करते. ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते.
Weight loss-वजन कमी करण्यासाठी कॉफीचे फायदे , 100% good for fat burning
ग्रीन टी :
ग्रीन टी हे एक हेल्थ ड्रिंक म्हणून मानले जाते. कारण यात अँटिऑक्सिडंट आणि फ्लेवोनोइडची मात्रा अधिक असते. मात्र, यामुळेही तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते. कॉफीप्रमाणेच ग्रीन टीमध्येही काही प्रमाणात कॅफिन असते. ज्यामुळे लघवीला जाण्याचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमी जाणवू शकते. परिणामी, तुम्हाला थकवा आणि सुस्तावा जाणवेल.
प्रोटिन :
वजन कमी करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी हायप्रोटिन पदार्थांचा आहारात समावेश करण्यात येतो. प्रोटिनचे शरीराला अनेक फायदे आहेत मात्र, डिहायड्रेशनचे एक कारणही प्रोटिन हेच आहे. प्रोटिन शरीरात नायट्रोजन निर्माण करते. त्यामुळे ते चयापचय प्रक्रियेसाठी अतिरिक्त पाणी वापरतात. यामुळे अनेकदा शरीरात द्रवपदार्थाचे असंतुलन होते.
Protein- शरीराला दररोज किती प्रोटीन ची गरज असते?
सोडा :
सोडा आणि बाटलीबंद ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते ज्याचा शरीरावर हायपरनेट्रेमिया प्रभाव असतो. याचा अर्थ, साखर पेशी आणि ऊतींमधून पाणी बाहेर काढते, ज्यामुळे शरीरातील द्रव पातळी कमी होते.
बीट :
बीटरूटमध्ये पोटॅशियमची मात्रा अधिक असते. ज्यात शरीरातील पदार्थ बाहेर काढून टाकण्याची क्षमता असते. त्यामुळे जर तुम्ही अतिप्रमाणात बीट खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आरोग्य
चांगल्या आरोग्यासाठी व्यसनांपासून दूर राहा, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकरांचा विद्यार्थ्यांना संदेश

पुणे : विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले राहावे म्हणून व्यसनापासून दूर रहावे आणि स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळावे. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेची आवड जोपासावी. तसेच व्यायामही आरोग्यसाठी उपयुक्त आहे. त्यामुळं विदार्थ्यांनी स्वच्छता आणि व्यामाय याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा संदेश पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (Dr. Raman Gangakhedkar) यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘राजे-महाराजे इंग्रजांना सामिल’ गांधींना फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, ‘राजघराण्यांचा..,’
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात (National Children’s Scientific Exhibition) आरोग्य आणि स्वछता या विषयावर गंगाखेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी गंगाखेडकर यांनी मानवी जीवनातील स्वच्छतेचे महत्व सांगताना दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेच्या सवयी कशा विकसित करता येतील ते उदाहरणांसह सांगितले. ते म्हणाले, काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुणे, दररोज सकाळी उठल्यावर व संध्याकाळी झोपण्यापूर्वी दात घासणे, कोणत्याही उघड्या पृष्ठभागावर स्पर्श करणे टाळणे या सवयी आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. हात न धुता त्याच हाताने खाल्यास डायरियासारखे आजार होतात. अस्वच्छतेमुळे विविध त्वचा विकार होतात. स्वच्छतेसोबत व्यायामही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. चालणं हा सर्वात उत्तम व्यायामाचा प्रकार आहे. त्यामुळं दररोज चालण्याची सवय ठेवावी. किशोरवयातील काही चुकीच्या सवयीमुळं त्याचा प्रौढ जीवनावर परिणाम होता. व्यसनाची लागलेली सवय मोडणे कठीण जाते. याबाबत मित्रांना वेळीच नाही म्हणायला शिकले पाहिजे, असे डॉ. गंगाखेडकर म्हणाले.
ते म्हणाले, निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मकता महत्वाची असल्याचे सांगून ते म्हणाले, मुलांची स्वतःची स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे. प्रत्यकाने स्वतःमधील क्षमता ओळखुन त्या वाढविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःची कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे जीवनात लहान लहान गोष्टीमधील स्वच्छता, समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे, देशाची आरोग्य विषयक धोरणे निश्चित करण्यासाठी योगदान देणे, स्वतःशी व देशाशी प्रामाणिक राहून देशाची सेवा करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्लास्टिकचा अतिवापर मानवाच्या शरीरावर खूप परिणाम करत आहे. प्लास्टिकचा अंश आता मानवी रक्तामध्ये सापडत आहे ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.गंगाखेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान केले.
यावेळी व्यासपीठावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ.नेहा बेलसरे, विज्ञान विभागाच्या प्रमुख तेजस्विनी आळवेकर, सहायक अधिव्याख्याता वृषाली गायकवाड आदी उपस्थित होते.
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय7 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय7 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय10 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….