मंचर दि (प्रतिनिधी) लाभार्थी ठेकेदारांनाची पोटं भरण्याकरिता माय बाप जनतेने जी एस टी किंवा इन्कम टॅक्स च्या माध्यमातून राष्ट्र उभारणी साठी दिलेल्या पैशाचा लुटारू शासनकर्ते व प्रशासनाच्या माध्यमातून प्रचंड प्रमानावर लूट चालली आहे हि लूट थांबविण्याकरिता कदाचित सर्व सामान्यांनाना आपल्या हाती कायदा घेण्याची गरज पुढील काळात येऊ नये एव्हढेच….
दररोज कुठेना… कुठे विकासच्या नावाखाली चाललेली विकासाची बहुतांशी कामे अतिशय नित्कृष्ठ दर्जाची होत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या विकास कामासाठी राज्यकर्ते निधी टाकतात कि आपल्या तालुक्यातील काही लाभार्थी ठेकेदारांची व त्यासोबत प्रशासकीय अधिकारी व कथाकथित पुढऱ्यांच्या विकासासाठी हे काही कळत नाही.राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यासोबत असणारे मंत्रिमंडळ राज्याच्या विकासाचा दावा करीत आहे. परंतु खरंच सुरु असलेल्या कामाचा दर्जा चांगला आहे का? या नित्कृष्ठ दरज्याच्या कामांना जबाबदारी कोण? हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे.
आज राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावांत सुरु असलेली कामे हि अतिशय नित्कृष्ठ दर्ज्याची सुरु आहेत. सर्वच ठिकाणी सुरु असलेल्या कामाचा दर्जा हा देश अथवा राज्य सक्षम बनविण्यासाठी नसून स्थानिक लाभार्थी कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी व कथाकथित लाचखोर पुढाऱ्यांची पोटं भरण्यासाठी चाललेला उतात्याप असल्याचे दिसत आहे. अशी चर्चा सर्वत्र जनतेमध्ये सुरु आहे.सिंधुदुर्ग जिल्यात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची दुरावस्था पाहून अनेकांच्या मुठी नक्क्कीच वळल्या असतील यात शंका नाही व नाजिकच्या काळात या वळलेल्या मुठीनी या भ्रष्ट यंत्रणेला सुधारविण्यासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये इतकेच….
राज्यकर्ते जाहीर सभांतून कामासाठी एव्हढ्या कोटींचा निधी त्या विकास कामासाठी, तेव्हढ्या कोटींचा निधी दिल्याच्या वलग्ना करीत आहेत. परंतु हा निधी खरंचच जनतेच्या जनतेच्या विकासासाठी योग्य रीतीने वापरला जातो का? कि, आपल्या आवातीभोंवती खोटेनाटे गोडावे गात फिरणाऱ्या लाभार्थी ठेकेदारांच्या विकासासाठी, याचे आत्मपरीक्षण राज्यकर्त्यांने करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काळात या विकास कामाच्या धिगाऱ्याखाली जनता या लाभार्थी ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत राज्याकर्त्यांना गाडल्या शिवाय राहणार नाही अशी स्थिती सर्वत्र निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
सध्या आपण जगत असलेल्या स्वातंत्र्यापेक्षा इंग्रजसत्ता बरी होती अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. असे म्हणण्यापेक्षा काही लोक तर हि प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. याचाच अर्थ या पराकोटीच्या भ्रष्ट व्यवस्थेला सुधारविण्यासाठी व पुन्हा नव्याने या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांच्या छाताडावर नाचण्यासाठी व स्वतंत्र व सक्षम भारत उभा करण्यासाठी पुन्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, टिळक, गांधी,चाफेकर बंधू या सारख्या स्वतंत्र सैनिकांना या भारत भूमीत जन्म घ्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजा महागाई, बेरोजगारी, भाष्टाचार, स्त्रीयांवर होणारे आत्याचाराचे स्वरूप पहाता पुन्हा देश या स्वार्थी सत्ताधाऱ्यांमुळे परतंत्र्यात जातं असल्याची भावना सर्वासामान्य जनता आज कुठेना कुठे व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात साठत चाललेल्या या ज्वाला मुखीचा उद्रेक होणे केव्हा तरी नक्कीच होईल कारण जनतेचा मनावर होणारे हे अधाद पहाता पुन्हा देशात सुरु झालेल्या या काळरात्रीचा नायनाट करून सक्षम भारताची उष:काल करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला पुढे यावे लागणार असून हि स्थिती नाजिकच्या काळात लकवकरच उभी राहील यात शंका वाटत नाही
अतिशय छान असं विश्लेषण आपण केलं . विकासाच्या नावाखाली जो काय भ्रष्टाचार चालू आहे . आणि लाभार्थ्यांचे पोट भरण्यासाठी विकस निधी वाटला जातोय .याबद्दल आपण रोखठोक भूमिका मांडली . त्याबद्दल आपले मनापासून मनसे अभिनंदन . असच लिखाण पुढे चालू राहू द्या .माझ्या आपणास मनःपूर्वक मनसे शुभेच्छा .
घोडेगाव. (प्रतिनिधी) जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळ, यांचे संयुक्त विद्यमाने . झालेल्या राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव ता. आंबेगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले
दरम्यान जुन्नर (ता जुन्नर )येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पार पडलेल्या राज्यस्थारीय मराठी वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल,च्या एकूण २७ विद्यार्थ्यांनी विविध वयोगटातून सहभाग घेतला यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून यश संपादन केले आहे.बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: -इ. १ली ते २री गट: -कु. अभिनव तानाजी बोऱ्हाडे (प्रथम क्रमांक) कु. क्रिशा निखिल आर्वीकर (तृतीय क्रमांक) तसेच इ.३री ते ४थी गट:-कुमारी आर्या स्वप्नील वाळुंज (प्रथम क्रमांक),कु. अनुजा हर्षद राऊत(उत्तेजनार्थ),इयत्ता ८वी ते१०वी गट:-कु.ऋतिका रवींद्र जैद (प्रथम क्रमांक),कु.अनुष्का वसंत लांघी (तृतीय क्रमांक),कु. स्नेहल दत्तात्रय डुकरे (उत्तेजनार्थ) या स्पर्धेत सर्वात जास्त एकूण सात बक्षिसे विद्यालयाने विद्यालयाने पटकावली.
दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षिका सौ .वंदना वायकर सौ. सुषमा फलके ,सौ सुनीता वाजे, सौ प्रज्ञा घोडेकर, सौ. जागृती महाजन यांनी मार्गदर्शन केले.तसेच संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे ,उपाध्यक्ष अंड. संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव विश्वासराव काळे, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे, समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, खजिनदार सोमनाथ काळे, वस्तीगृह कमिटी चेअरमन सूर्यकांत गांधी, विद्यालयाचे चेअरमन बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक अजित काळे व अक्षय काळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन केले.
दरम्यान आपले विद्यार्थी शालाबाह्य राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेच्या नाव लौकिकात भर घालत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार सोमनाथ काळे सर यांनी काढले.
मंचर दि. (प्रतिनिधी) पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री भीमाशंकर येथे दर्शनाला येणार असताना जिल्हाप्रमुख व माजी सरपंचांच्या नियोजनावर पाणी पाडत जेष्ठ पदाधिकार्याने केलेल्या कुरघुडीमुळे आंबेगाव तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेलाही गट बाजीचे ग्रहण लागल्याची चर्चाच तालुक्यात सर्वत्र सुरु जगली आहे.
“सत्तेचे सगळेच चहाते असतात. “शिंदेची शिवसेना,सत्तेत असल्यापासुन त्यापक्षाकडे सध्या भरती सुरु आहे. पण यामुळे पक्ष बळकट होण्या ऐवजी सर्वत्र गट बाजीला उधान आले असल्याचे बोलले जात असून, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यात दिसून आल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.”
“म्हणतात णा कानामागून मागून आली आणि तिखट झाली” या म्हणी प्रमाणे आगोदर पक्षात असलेल्या आपल्या सहकार्याना व जेष्ठ पदाधिकाऱ्यांना नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची खोड मोडण्यात मजा येते असेच म्हणावे लागेत म्हणूनच विश्वासात न घेताचे कारण पुढे करत क्काही जेष्ठ पदाधीकाऱ्यांनी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व उबाटा पक्षातून शिंदे च्या पक्षात आलेल्या माजी सरपंचांची खोड मोडण्यासाठीच केला उतात्याप मात्र यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल
घडले असे कि,मंचर शहराचे माजी सरपंच आणी शिंदे सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या एकनिष्ठतेची छाप पाडून आपले वर्चस्व वाढविण्याचा घाट घातल्याची कुणकुण काही जेष्ठ नेत्यांना लागल्या नंतर तालुक्यात राजकीय कुरघुडी ला सुरवात झाली. नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख व माजी सरपंच यांनी घोडेगाव येथे मोठी बॅनरबाजी करीत सत्काराचे आयोजनही केले. पण ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांचे वाहन सत्कारासाठी थांबणार होते. त्याचे अगोदरच्या स्थळी उप मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबावून काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला व सत्कार झाला असे सांगत उपमुख्यमंत्र्यांचा ताफा काढून दिला.
दरम्यान पुढे सत्कारच्या नियोजित स्थळी उपमुख्यमंत्री यांचा ताफा आल्यानंतर जमलेल्या शिव सैनिकांनी जयजयकारच्या घोषणा दिल्या त्याच सोबत ढोल ताशांचा आवाज झाला. जेसीबी ने फुलांची पुष्पावृष्टी हि करण्यात आली पण सत्कार अगोदरच झाला आहे असे समजत उपमुख्यमंत्री साहेबांनी याकडे दुर्लक्ष केले व गाडीच्या काचा हि खाली ना करता गाड्याचा ताफा तसाच पुढे सरकत श्री क्षेत्र भीमाशंकर शिवज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी रवाना झाला याठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांची, कार्यकर्त्यांची यामुळे घोर निराशा झाली व नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व नव्यानेच शिंदेच्या शिवसेनेत सामील झालेले मंचरच्या त्या नेत्याचा उपमुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करण्याच्या त्या सर्व नियोजनावर पाणी पडले.
दरम्यान यातूनचा आंबेगाव तालुक्यात सध्या वर्चस्वची लढाई शिंदे गटात सुरु झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशीच एकमेकांत सुरु असलेली कुरघुडी शिवसेना शिंदे गटास मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये महागात पडू शकते अशी शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे यातून शिंदेच्या शिवसेनेतही गटा तटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले दिसून येत आहे.
मंचर दि. (सदानंद शेवाळे)- गेल्या दोन दिवसापासुन डिंभे धरण परीक्षेत्रात सुरु असलेल्या पावासामुळे धरणातील पाण्याची पातली वाढल्यामुळे घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून नदिकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कुकडी प्रकल्प अभियंता यांनी केले आहे
दरम्यान डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डिंभे धरण क्षेत्रातील ओढ्या नाल्यांना मोठ्याप्रमाणा वर पाणी आले असल्यामुळे डिंभे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे सध्या धरणामध्ये ९४% पाणी असून खबरदारीच्छा उपाय म्हणून धरणातून आज दि १९/८/२०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ३००० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग घोड नदी पात्रात करण्यात आला आहे. धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून सध्या धरणातून तीन हजार क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
.दरम्यान पावसाचा वाढता जोर पहाता घोड नदीपात्रात डिंभे धरणातून विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे, नदीकाठच्या गावांतील सतर्क राहावे.तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठी कोणीही जाऊ नये व आपल्या जनावरांना जाऊ देऊ नये.त्याचप्रमाणे आपल्या गावातील लोकांना ही माहिती कळावी म्हणून सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्ष कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांचे वतीने देण्यात आला आहे.
अशोक मोढवे
August 26, 2024 at 2:35 pm
रोख ठोक भूमिका मांडली हे असं चालणार आंधळदळतंय कुत्र पीठ खातय खरंच इग्रजांचा राज्य चांगलं होतं
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
August 26, 2024 at 3:15 pm
अतिशय छान असं विश्लेषण आपण केलं . विकासाच्या नावाखाली जो काय भ्रष्टाचार चालू आहे . आणि लाभार्थ्यांचे पोट भरण्यासाठी विकस निधी वाटला जातोय .याबद्दल आपण रोखठोक भूमिका मांडली . त्याबद्दल आपले मनापासून मनसे अभिनंदन . असच लिखाण पुढे चालू राहू द्या .माझ्या आपणास मनःपूर्वक मनसे शुभेच्छा .
Nilkanth Suresh Kale
August 26, 2024 at 6:30 pm
छान शब्द लेखन
Bobhata News
August 28, 2024 at 7:48 am
Thanks
Nilkanth Suresh Kale
August 26, 2024 at 6:31 pm
रोख ठोक भूमिका