मंचर दि. (प्रतिनिधी )-उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसोबत, या नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करूया मनातील नकारात्मक विचारांची होळी करून नवीन संकल्पना मनात घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून नवीन विश्व् साकरण्याचा संकल्प करूया जिंकूया जिंकूया फक्त जिंकूया व विजयी होऊया….
भगवान श्री कृष्ण यांनी परिवर्तनच ब्रह्मांडाचा नियम असल्याचे सांगितले या ब्रह्मांडात सर्वत्र परिवर्तन होत आहे यात जन्माला आलेले मुलं यांच्या क्षणोक्षणी बदल होत तरुणांईकडे तर त्यातून वृद्धावास्थेकडे जातं आहे या विश्वात जे नवीन तयार होणार ते केंव्हातरी नष्ट होणार असे म्हंटल जाते जे चिरकाळ टिकते ते फक्त “ब्रम्ह” म्हणजे च आपले विचार होत कारण विचारातून कर्म घडते म्हणजेच कोणतेही कर्म घडण्यासाठी विचाराची गरज आहे.
दरम्यान हा विचार कोठून कसा निर्माण होतो. आपण अनेक पुस्तके वाचतो त्यात सांगितले जाते मानवाच्या मनात जास्तीतजास्त वाईट विचार म्हणजेच नकारात्मक विचार येत असतात. हेच नकारात्मक विचार बाजूला ठेवून मनात मन सकारात्मक केले तर तुमचे जीवन फुलून जाईल. यासाठी मनुष्याने वर्तमानात जगावयास हवे वर्तमानात जगणे, ते कसे जगावे? हाच प्रश्न अनेकांच्या मनात पडला असेल तुम्ही सर्वत्र पहा प्रत्येक व्यक्ती हा वर्तमानात जगण्यापेक्षा भूत किंवा भविष्यातच जगतो ते कसे? तर, प्रत्येक माणसाच्या मनात जेव्हा केंव्हाही विचार सुरु असतात ते भुताकाळातील घडलेल्या चांगल्या वाईट घटनाचे अथवा भविष्यात काहीही चांगले वाईट व्हावे किंवा करावे या बाबातच व्यक्ती विचात करतो .
मात्र कोणताही व्यक्ती वर्तमानकाळात जगताना दिसत नाही तुमच्या हातातील प्रत्येक वर्तमानाचा क्षण भूत होत आहे. त्यामुळे तुमच्या हातात असलेला प्रत्येक वर्तमानाचा क्षण कसा चांगला जगता येईल याचा विचार व त्याप्रमाणे कर्म केले पाहिजे तरच तुमचा भविष्यकाळ उज्वल होईल यात शंका नाही. यासाठी कोणाविषयी आकस राग, सुडाची भावना यांना तिलांजली देताना सोबत लोभ, आसक्ती लाही आपल्यापासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणजेच साक्षीभावाने जगावे आज या जगात चाललेली कुलियुगी दुषकृत्ये पाहुन असंख्य संत महात्मे यांनी दिलेल्या अनमोल विचारांचे अनुकरण करण्याबाबत प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे, कारण वर्ष ख्रिती असो मुस्लिम असो वा हिंदू चांगले संकल्प करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते गरज असतें ती चांगल्या विचारांची…… सर्व वाचक हितचिंतक यांना बोभाटा परिवारातर्फे 2025 या नूतन वर्षाचे निमित्ताने मंगलमय हार्दिक शुभेच्छा…..
मंचर दि. (प्रतिनिधी) पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री भीमाशंकर येथे दर्शनाला येणार असताना जिल्हाप्रमुख व माजी सरपंचांच्या नियोजनावर पाणी पाडत जेष्ठ पदाधिकार्याने केलेल्या कुरघुडीमुळे आंबेगाव तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेलाही गट बाजीचे ग्रहण लागल्याची चर्चाच तालुक्यात सर्वत्र सुरु जगली आहे.
“सत्तेचे सगळेच चहाते असतात. “शिंदेची शिवसेना,सत्तेत असल्यापासुन त्यापक्षाकडे सध्या भरती सुरु आहे. पण यामुळे पक्ष बळकट होण्या ऐवजी सर्वत्र गट बाजीला उधान आले असल्याचे बोलले जात असून, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यात दिसून आल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.”
“म्हणतात णा कानामागून मागून आली आणि तिखट झाली” या म्हणी प्रमाणे आगोदर पक्षात असलेल्या आपल्या सहकार्याना व जेष्ठ पदाधिकाऱ्यांना नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची खोड मोडण्यात मजा येते असेच म्हणावे लागेत म्हणूनच विश्वासात न घेताचे कारण पुढे करत क्काही जेष्ठ पदाधीकाऱ्यांनी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व उबाटा पक्षातून शिंदे च्या पक्षात आलेल्या माजी सरपंचांची खोड मोडण्यासाठीच केला उतात्याप मात्र यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल
घडले असे कि,मंचर शहराचे माजी सरपंच आणी शिंदे सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या एकनिष्ठतेची छाप पाडून आपले वर्चस्व वाढविण्याचा घाट घातल्याची कुणकुण काही जेष्ठ नेत्यांना लागल्या नंतर तालुक्यात राजकीय कुरघुडी ला सुरवात झाली. नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख व माजी सरपंच यांनी घोडेगाव येथे मोठी बॅनरबाजी करीत सत्काराचे आयोजनही केले. पण ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांचे वाहन सत्कारासाठी थांबणार होते. त्याचे अगोदरच्या स्थळी उप मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबावून काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला व सत्कार झाला असे सांगत उपमुख्यमंत्र्यांचा ताफा काढून दिला.
दरम्यान पुढे सत्कारच्या नियोजित स्थळी उपमुख्यमंत्री यांचा ताफा आल्यानंतर जमलेल्या शिव सैनिकांनी जयजयकारच्या घोषणा दिल्या त्याच सोबत ढोल ताशांचा आवाज झाला. जेसीबी ने फुलांची पुष्पावृष्टी हि करण्यात आली पण सत्कार अगोदरच झाला आहे असे समजत उपमुख्यमंत्री साहेबांनी याकडे दुर्लक्ष केले व गाडीच्या काचा हि खाली ना करता गाड्याचा ताफा तसाच पुढे सरकत श्री क्षेत्र भीमाशंकर शिवज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी रवाना झाला याठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांची, कार्यकर्त्यांची यामुळे घोर निराशा झाली व नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व नव्यानेच शिंदेच्या शिवसेनेत सामील झालेले मंचरच्या त्या नेत्याचा उपमुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करण्याच्या त्या सर्व नियोजनावर पाणी पडले.
दरम्यान यातूनचा आंबेगाव तालुक्यात सध्या वर्चस्वची लढाई शिंदे गटात सुरु झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशीच एकमेकांत सुरु असलेली कुरघुडी शिवसेना शिंदे गटास मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये महागात पडू शकते अशी शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे यातून शिंदेच्या शिवसेनेतही गटा तटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले दिसून येत आहे.
मंचर दि. (सदानंद शेवाळे)- गेल्या दोन दिवसापासुन डिंभे धरण परीक्षेत्रात सुरु असलेल्या पावासामुळे धरणातील पाण्याची पातली वाढल्यामुळे घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून नदिकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कुकडी प्रकल्प अभियंता यांनी केले आहे
दरम्यान डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डिंभे धरण क्षेत्रातील ओढ्या नाल्यांना मोठ्याप्रमाणा वर पाणी आले असल्यामुळे डिंभे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे सध्या धरणामध्ये ९४% पाणी असून खबरदारीच्छा उपाय म्हणून धरणातून आज दि १९/८/२०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ३००० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग घोड नदी पात्रात करण्यात आला आहे. धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून सध्या धरणातून तीन हजार क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
.दरम्यान पावसाचा वाढता जोर पहाता घोड नदीपात्रात डिंभे धरणातून विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे, नदीकाठच्या गावांतील सतर्क राहावे.तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठी कोणीही जाऊ नये व आपल्या जनावरांना जाऊ देऊ नये.त्याचप्रमाणे आपल्या गावातील लोकांना ही माहिती कळावी म्हणून सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्ष कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांचे वतीने देण्यात आला आहे.
भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड रैली काढण्यात आली.
दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती वाढीस लागेल
दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.