सामाजिक
अवसरी बुद्रुक येथे “कला अविष्कार चित्र व शिल्प प्रदर्शनाचे आयोजन” : प्रदर्शनाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद….

मंचर दि (प्रतिनिधी) अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर माध्य व उच्च माध्य विद्यालय या विद्यालयातील कलाशिक्षक श्री. संतोष चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून कलाविष्कार चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे आयोजन आले होते .प्रदर्शनास नागरिकांणाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

उत्तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच प्रथमच दि.25 जाने ते 27 जाने. या काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी ” कलाशिक्षक आणि विद्यार्थी यांच्या कलाकृतीचे कलाविष्कार चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे आयोजन आले होते .या प्रदर्शनाचे उदघाटन साई चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.दत्ता ठुबे सर यांचे शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री.विष्णू काका हिंगे पाटील कार्यकामाच्या अध्यक्ष स्थानी होते. तर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.भास्कर हांडे सर ( वैश्विक आर्ट गॅलरी नेदरलँड) , सिटीस्केप आर्टीस्ट श्री. गणेश पोखरकर, हे प्रमुख पाहुणे होते.

दरम्यान महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. किरण सरोदे सर, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. मिलिंद शेलार सर, आंबेगाव तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. भानुदास बोऱ्हाडे सर, आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विनोद बोंबले सर , विद्या विकास मंदिर अवसरी बु.विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. नानासाहेब पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आणि विविध माध्यमातून चित्रे साकारली आहेत.
कलाशिक्षक श्री संतोष चव्हाण सर आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच आंबेगाव तालुक्यातील काही कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आणि विविध माध्यमातून साकारलेल्या 250 चित्र व शिल्प कलाकृतींचा कलाविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. व यात प्रामुख्याने निसर्ग चित्रे,व्यक्ती चित्रे, वस्तू चित्रे याबरोबरच सामाजिक विषयांवरील चित्रे तसेच अमूर्त व आधुनिक शैलीची चित्रे जलरंग, पोस्टर रंग, ॲक्रॅलिक, ऑईल पेस्टल, क्रेऑन यां सोबतच तैलचित्र देखील साकारली आहेत. त्याचप्रमाणे विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. आदेश शहा यांची 50 काष्ठ शिल्प या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
कोरोना नंतर शाळा रेग्युलर सुरू झाल्या परंतु मुलांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत पठारावस्था आलेली आहे. मुलांना यातुन बाहेर काढून शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी मुलांना रंगांच्या सानिध्यात आणून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून विद्यालयाने ग्रामीण भागात अशा प्रकारचा अतिशय स्तुत्य आणि यशस्वी उपक्रम राबविला आहे.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष, श्री. विष्णू काका हिंगे, उपाध्यक्ष – श्री. योगेश शेठ चव्हाण, उपसचिव श्री. दिपकशेठ चवरे, संचालक- श्री. अजित वाडेकर, शिवशंभो प्रतिष्ठान अवसरी बु. यांचे विशेष सौजन्य लाभले.आणि ग्रामपंचायत अवसरी बु यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी श्री.सचिन वाघ साहेब, मंचर पोलीस स्टेशन चे श्री. डावखर साहेब आणि शिंदे साहेब, पुणे जिल्हा कलाध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रावण जाधव सर, भाजप चे जिल्हाध्यक्ष जनसेवक श्री.संजयभाऊ थोरात साहेब, आंबेगाव तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष राजु इनामदार, मयूर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरिदास रामवत सर, पुणे जिल्हा उपप्रमुख श्री. अजितराव चव्हाण, शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजु आढळराव सर, आदी मान्यवरांनी त्याचप्रमाणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व शिक्षक, ग्रामस्थ, पालक , माजी विद्यार्थी यांनी सदिच्छा भेटी देवून विद्यालयाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
त्याचप्रमाणे शिंगवे, पारगाव, निरगुडसर, लांडेवाडी , घोडेगाव या शाळांचे कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
सामाजिक
शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती वाढीस लागेल
दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.
सामाजिक
“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते
दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.
“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा”
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.
सामाजिक
अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय10 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय10 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय12 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….