singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

कर्मचाऱ्यांमध्ये “सुदृढता,सक्षमता व उत्साह कार्यक्षमता वाढविण्यासाठी “दिवे अगार” येथे अभ्यास दौरा : पराग नागरी पतसंस्थेचा अभिनव उपक्रम……

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) – स्पर्धेच्या युगात कॉर्पोरेट क्षेत्रातील बँकाप्रमाणे वाढत्या स्पर्धेच्या युगात  सक्षम, प्रशिक्षित व उत्साही  कर्मचारी निर्माण करण्यासाठी “प्रसिद्ध उद्योगपती व संस्थेचे आधार स्तंभ देवेंद्रशेठ शाह” यांच्या मार्गदर्शनानुसार पराग नागरी  पतसंस्थेच्या कर्मचारी व संचालक मंडळासाठी आयोजित करण्यात आलेला अभ्यास दौरा राज्यातील पतसंस्था क्षेत्रात एक अभिनव उपक्रम ठरत आहे…..

 जीवनाच्या प्रत्येक क्षणी नवनवीन अनुभव घेणे  म्हणजेच शिक्षण,. शिक्षण घेण्यासाठी ची काही एक वेळ असे नाही जीवनभर व्यक्ती शिकत असतो व आपले ज्ञान इतरांना देत असतो आपण घेतलेले ज्ञान इतरांना देऊन त्यांना प्रशिक्षित करणे म्हणजेच प्रशिक्षण होय परंतु कोणतेही ज्ञान घेण्यासाठी ज्ञान देणारा व घेणारा, यांना  ज्ञान देण्यात व घेण्यात आनंद वाटायला हवा,.

 ‘खरंतर आजच्या या धावत्या युगामध्ये  प्रत्येक व्यक्ती कुठल्याना कुठल्या व्यापात अडकलेला दिसत आहे त्यामुळे तो त्याचे हास्य विसरून गेला आहे कि काय? अशी स्थिती सर्वत्र दिसते यात काही नवीन प्रशिक्षण घेऊन या धावत्या युगात सर्वांसोबत वेगाने चालण्यासाठी तयार राहणे गरजेचे असतें मग ती व्यक्ती असो वा  संस्था……

पराग नागरी पतसंस्थेचे” संस्थापक व आधार स्तंभ, प्रसिद्ध उद्योगापती देवेंद्र शाह यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य अविरतपणे  सुरु असून  या पतसंस्थेने  नागरिकांचा विश्वास संपादन करीत  अल्पवाधित मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा करून, त्याद्वारे  नियमानुसार विविध छोट्या मोठ्या अनेक  व्यवसाईकांना मदतीचा हात आहे त्यामुळे अनेक उद्योजक आपल्या  व्यवसायात  यशस्वीपणे काम करीत आहेत. त्यामुळे  ठेवीदार व कर्जदारांसोबत आंबेगाव तालुक्यातील जण माणसाच्या मनात अल्पवाधित नांवलौकिक मिळवून विश्वास संपादन केला आहे. 

दरम्यान आजच्या स्पर्धेच्या काळात मोठमोठया बँका पतसंस्थापुढे  पराग पतसंस्थेची सक्षमपणे  प्रगती  व्हावी.  यासाठी संस्थेचा  कर्मचारी  अधिकाधिक उत्साही, आनंदी व सक्षम, प्रशिक्षित असला  पाहिजे त्यासाठी त्याला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे व हे प्रशिक्षण देताना कर्मचाऱ्याच्या मनावर तणाव, दबाव अथवा न्यूनगंड निर्माण होता कामा नये. तसेच  कर्मचाऱ्यांमध्ये स्वत:च्या  सुरक्षितेची तर  संस्थेविषयी अस्थेची, आपलेपणाची भावना सुदृढ रहावी या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष  जितेंद्र बांगर यांनी  पतसंस्थेतील सर्व संचालक व  कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण सहल “दिवे अगार” यां ठिकाणी आयोजित केली होती. या सहलीच्या निमित्ताने  मोकळ्या वातावरणात कर्मचारी व संचालक एकत्रित येऊन यांच्यातील एकमेकांमध्ये सुसंवाद वाढेल व  त्यातून संस्थेच्या प्रगतीविषयी एकत्रितपणे नियोजनबद्ध ध्येय धोरण ठरवून ते साकारण्यासाठी सक्षम  प्रयत्न केले जातील. हा उद्देश उरी बाळगून म्हणून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव भुसारी म्हणाले कि, प्रशिक्षित व उत्साही कर्मचारी हा कोणत्याही संस्थेच्या  प्रगतीचे द्योतक आहे. संस्थेचा माध्यमातून आयोजित उपक्रमामुळे कर्मचाऱ्याच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मनात सुरक्षितेची भावना  वाढीस लागून संस्थेविषयी आपुलकी व निष्ठा निर्माण होईल व कर्मचारी संस्थेच्या प्रगतीसाठी जीव ओतून काम करेल, यातून संस्थेचा नावलौकिक वाढून संस्था यशस्वीतेच्या शिखरांवर नेण्यासाठी चांगली मदतच होईल.

दरम्यान संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरास महाराष्ट्र राज्य बँकिंग फेडरेशन चे हिरामान ढोरे, यांनी पतसंस्थेच्या विषयी मार्गदर्शन केले या वेळी पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सदाशिव भुसारी, सर्वश्री संचालक बाबाजी टेमगिरे, विकास भोर, समीर घेवडे, सौ ललिता थोरात, संतोष निकम, अनिल लबडे, उपस्थित होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शिंदे सेनेलाहि लागले का? “गटबाजीचे ग्रहण”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री भीमाशंकर येथे दर्शनाला येणार असताना जिल्हाप्रमुख व माजी सरपंचांच्या नियोजनावर पाणी पाडत जेष्ठ पदाधिकार्याने केलेल्या कुरघुडीमुळे आंबेगाव तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेलाही गट बाजीचे ग्रहण लागल्याची चर्चाच तालुक्यात सर्वत्र सुरु जगली आहे.

“सत्तेचे सगळेच चहाते असतात. “शिंदेची शिवसेना,सत्तेत असल्यापासुन त्यापक्षाकडे सध्या भरती सुरु आहे. पण यामुळे पक्ष बळकट होण्या ऐवजी सर्वत्र गट बाजीला उधान आले असल्याचे बोलले जात असून, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यात दिसून आल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.”

      “म्हणतात णा कानामागून मागून आली आणि तिखट झाली”  या म्हणी प्रमाणे आगोदर पक्षात असलेल्या आपल्या सहकार्याना व जेष्ठ पदाधिकाऱ्यांना नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची खोड मोडण्यात मजा येते असेच म्हणावे लागेत म्हणूनच विश्वासात न घेताचे कारण पुढे करत क्काही जेष्ठ पदाधीकाऱ्यांनी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व उबाटा पक्षातून शिंदे च्या पक्षात आलेल्या माजी सरपंचांची खोड मोडण्यासाठीच केला उतात्याप मात्र यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल

घडले असे कि,मंचर शहराचे  माजी सरपंच आणी शिंदे सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख यांनी  राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या एकनिष्ठतेची छाप पाडून आपले वर्चस्व वाढविण्याचा घाट घातल्याची कुणकुण काही जेष्ठ नेत्यांना लागल्या नंतर तालुक्यात राजकीय कुरघुडी ला सुरवात झाली. नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख व माजी सरपंच यांनी घोडेगाव येथे मोठी बॅनरबाजी करीत सत्काराचे आयोजनही केले. पण ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांचे वाहन सत्कारासाठी थांबणार होते. त्याचे अगोदरच्या स्थळी उप मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबावून काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला व सत्कार झाला असे सांगत उपमुख्यमंत्र्यांचा ताफा काढून दिला.

दरम्यान पुढे सत्कारच्या नियोजित स्थळी उपमुख्यमंत्री यांचा ताफा आल्यानंतर जमलेल्या शिव सैनिकांनी जयजयकारच्या घोषणा दिल्या त्याच सोबत ढोल ताशांचा आवाज झाला. जेसीबी ने फुलांची पुष्पावृष्टी हि करण्यात आली पण सत्कार अगोदरच  झाला आहे  असे समजत उपमुख्यमंत्री साहेबांनी याकडे दुर्लक्ष केले व  गाडीच्या काचा हि खाली ना करता  गाड्याचा  ताफा तसाच पुढे सरकत श्री क्षेत्र भीमाशंकर शिवज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी रवाना झाला याठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांची, कार्यकर्त्यांची यामुळे घोर निराशा झाली व  नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व नव्यानेच शिंदेच्या शिवसेनेत सामील झालेले मंचरच्या त्या नेत्याचा उपमुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करण्याच्या त्या सर्व नियोजनावर पाणी पडले. 

दरम्यान यातूनचा आंबेगाव तालुक्यात सध्या वर्चस्वची लढाई शिंदे गटात सुरु झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशीच एकमेकांत सुरु असलेली कुरघुडी शिवसेना शिंदे गटास मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये महागात पडू शकते अशी शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे यातून शिंदेच्या शिवसेनेतही गटा तटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले दिसून येत आहे.

Continue Reading

सामाजिक

भीमाशंकर परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसाने डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु घोड नदीकाठच्या गावांना सावधनतेचा इशारा….

Published

on

मंचर दि. (सदानंद शेवाळे)- गेल्या दोन दिवसापासुन डिंभे धरण परीक्षेत्रात सुरु असलेल्या पावासामुळे धरणातील पाण्याची पातली वाढल्यामुळे घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून नदिकाठच्या  नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कुकडी प्रकल्प  अभियंता यांनी केले आहे 

दरम्यान डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डिंभे धरण क्षेत्रातील ओढ्या नाल्यांना मोठ्याप्रमाणा वर पाणी आले असल्यामुळे डिंभे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे सध्या धरणामध्ये ९४% पाणी असून खबरदारीच्छा उपाय म्हणून धरणातून आज दि १९/८/२०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ३००० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग घोड नदी पात्रात करण्यात आला आहे.  धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून सध्या धरणातून तीन हजार क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

.दरम्यान पावसाचा वाढता जोर पहाता घोड नदीपात्रात डिंभे धरणातून  विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे, नदीकाठच्या गावांतील सतर्क राहावे.तसेच  नदीपात्रात किंवा नदीकाठी कोणीही जाऊ नये व आपल्या जनावरांना जाऊ देऊ नये.त्याचप्रमाणे आपल्या गावातील लोकांना ही माहिती कळावी म्हणून सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्ष कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांचे वतीने देण्यात आला आहे.

Continue Reading

सामाजिक

शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

Published

on

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर  क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या  आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड  रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची  गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती  वाढीस लागेल  

दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in