सामाजिक
जनतेच्या सेवेसाठी, तत्पर सदैव…होऊ पहाणाऱ्या, “पूर्वा” यांचे कार्य,भविष्यातील बांधणीसाठी ठरेल का? “अपूर्व”

मंचर दि (प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यात दरवेळी हजारोंच्या मतांधिक्याने विजयी होणारे राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देवदत्त निकम यांच्याकडून अगदी निसटता विजय मिळाला त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना तालुक्यात त्यांची कमी झालेली ताकद समजली हे नक्की…..परंतु आत्मचिंतन करून पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करून घडी बसविण्यासाठी वळसे पाटलांनी कंबर कसली असून पुनर्णिमाणाचे काम करण्यासाठी चे “अपूर्व” कार्य वळसे पाटलांच्या कन्या “पूर्वा” यांनी हाती घेतल्याचे दिसत आहे…

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष पुन्हा बांधणी करण्यासाठी कार्यकर्ता संवाद मिळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील अडीवरे येथे ‘कार्यकर्ता संवाद कार्यक्रम’ संपन्न झाला. यावेळी.पूर्वा वळसे पाटील यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत .आदिवासी भागातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्याबाबत चर्चा केली.

“अडिवरे येथे कातकरी वस्ती येथील दोन घरांचे अचानक आग लागल्याने नुकसान झालेल्या कुटुंबियांना भेट देऊन “अलका वळणे व सुवर्णा पवार” या दोन्ही महिलांना प्रत्येकी रु. २५०००/- मदत “पूर्वा वळसे” यांच्या उपस्थितीत देण्यात आली”
माजी मंत्री आ.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून आहुपे खोऱ्यात सुरू असलेली विविध विकासकामे व प्रलंबित कामे यांचा आढावा घेण्यात आला त्याचप्रमाणे अनुसया महिला उन्नती केंद्र, मंचर यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असून गरजू व पात्र लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना आदींच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश देण्यात आले.

दरम्यान जनजीवन मिशन अंतर्गत मुदतीत पूर्ण न होणाऱ्या कामांच्या ठेकेदारांना दंड लावण्यात यावा तसे दिरंगाई बाबत कारंवाई करावी तसेच रस्त्या च्या कडे ने नितृष्ठ दर्जाचे पाईप लाईन करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत विजेचे खांब पावसाळ्याच्या आधी बदलेले जावेत तसेच पाणी योजने साठी वेगळी नवीन डीपी देण्यात यावी पांचाळे गावच्या पुनर्वसणा साठी एका वेळी ८३ घरांना घरकुल योजनेतून निधी मिळावा फॉरेस्ट मुळे थांबलेलि आहुपे रस्त्या चे काम तात्काळ चालू करण्यात यावे.

यावेळी रामदास वळसे, आदिवासी नेते अमोल अंकुश, पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष प्रकाशराव घोलप, युवक कार्याध्यक्ष निलेश बो-हाडे, माजी सभापती संजय गवारी, तिरपाड ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सोमा दाते, अडीवरेचे सरपंच संगीताताई किर्वे, असाणेचे माजी उपसरपंच रामदास भोगटे, माळीनचे उपसरपंच हेमंत भालचिम, गणेश झांजरे, बोरघरचे सरपंच विजय जंगले, अनंथा साळवे, सखाराम गभाले, मुद्गुन गुरुजी, दत्ता गवारी, सुरेखाताई जढर, संतोष शेळके, नामदेव असवले, समीर घारे, काळू जढर शंकर लांगी आधी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मंचर शहर अध्यक्ष धुभम बाणखेले व विविध खात्यांचे अधिकारी तसेच आहुपे, पिंपरगणे, तिरपाड, दिगद, कोंढरे, आसाने, माळीन, पंचाळे, अडिवरे, बोरघर फुलवडे या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….
Rajesh Chandrakant Chaskar
March 6, 2025 at 11:53 am
जनतेने आपल्याला का नाकारले समजल्यावर जनतेच्या समस्या काय आहे हे जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचं आज एसटी बस समस्या केवढी गंभीर आहे ह्या समस्येचं निवारण करायला लोकांना दुसऱ्या तालुक्याच्या आमदाराकडे जावा लागेल का?
अमोल अंकुश
March 6, 2025 at 12:34 pm
पूर्वाताई यांचे नेतृत्व हे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून युवा वर्गात लोकप्रिय होत असून दादा व साहेब यांना मानणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ताई काम करत आहेत यामुळे लवकरच राजकीय,सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणारी युवा पिढी आपल्याला पाहावयास मिळेल.