सामाजिक
“स्थानिक नेतृत्वाच्या मनमानी व अविश्वासाहर्य कारभाराने”, शिवसैनिकांचा “उबाटा” सेनेवरील हरविलेला विश्वास, खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याने परत मिळणार का….?

मंचर दि. (प्रतिनिधी) राज्यामध्ये शिवसेनेत फूट पडून राजकीय स्थलांतरानंतर पोरक्या पडलेल्या ऊ बा टा सेनेच्या शिवसैनिकांच्या विश्वासाचे स्थानिक सक्षमनेतृत्वाने धिंदोडे उडवले असून सद्या उद्धव सेनेची अवस्था हि आत्मविश्वास हरवलेल्या एखाद्या मारतूकड्या पिंजाऱ्यातील वाघाप्रमाणे झाली आहे. स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार विश्वासघात झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्याकार्यकर्त्यांमध्ये खासदार संजय राऊत यांचे आंबेगाव, शिरूर,जुन्नर च्या दौऱ्याने काही बदल घडणार का? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे

गेल्या काही वर्षापासून शिवसेना म्हणजे एक चविचा विषय झालेला आहे. ज्या शिवसेनाविषयी अनेक शिवसैनिक अना भाका खाऊन आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याची तयारी ठेवतअसत, त्याच शिवसेला आज गद्दारीची वाळावी लागली असून शिवसेना रुपी हा वटवृक्ष येथील स्थानिक अप्रामाणिक नेतृत्व व गद्दारीमुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तरी रसातळाला जात आहे असे म्हणणे अनेकांच्या मते वावगे ठरणार नाही.
दरम्यान जुन्नर आंबेगाव साठी शिवसेनेने दिलेल्या नेतृत्वावर साध्या शिवसैनिकांचाही विश्वास नाही त्यामुळे ज्यांनी शिवसेना रुपी हा वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी व बहारण्यासाठी जीवाचे राण केले ते कट्टर शिवसैनिक आजही शिवसेनेच्या प्रवाहातून बाजूला गेले आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यांनी आंबेगाव तालुक्यात १९८४ साली “घोडेगाव” येथे पहिल्यांदा जाहीर सभा घेत हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा नारा दिला होता. त्या शिवसेनेची आता गद्दारी वा अप्रामानिक पणाच्या कर्तृत्व शून्य पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी मनोदायामुळे वाटोळे झाले आहे. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य शिवसैनिकांनातून ऐकावयास मिळत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी जाहीर गद्दारी केली. कागदोपत्री खोटे अहवाल दाखवून वरिष्ठांची दिशाभूल करीत निवडणुकीत आपले हात ओले केले अशी कथाकथित नेतृत्व आज उजळ माथ्याने पक्षाच्या वरिष्ठ्यांचे मागे पुढे फिरत एकनिष्ठतेचा पाठ देत आहेत. म्हणतात ना… सो चुहे खाके… बिल्ली चली हज को…. या उक्ती प्रमाणे सध्या स्थिती आहे व या बाबत मुंबईतील सेना भवनात देखील अनेकांनी सांगून पाहिले व नेतृत्व बदलाची मागणी केली परंतू येथे न्याय मिळण्या ऐवजी या कथाकथित पुढऱ्यांना निष्ठावंताची पखाल चढवून काही वरिष्ठ नेते त्यांची बाजू घेत आहेत मग यात नक्की काय? मर्म दडले आहे.हे जाणून घ्यायला कोणत्या चमकदार आरश्या ची गरज नक्कीच नाही.
उद्धव ठाकरे सेनेत सध्या सर्वत्र अशा काही तीन माकडाची उत्पत्ती झाली आहे कि, तेसर्व जाणूनही डोळ्यावर, तोंडावर व कानावर हात ठेवून बसले आहेत. जसे तुम्ही काही केले आम्ही पाहिले नाही, तुम्ही काय? बोलले आम्ही ऐकले नाही, म्हणून आम्ही काही बोलत नाही अशी स्थिती झाली असल्याची चर्चा आहे. आज दुर्दैवाने सांगावेसे वाटते कि, जुन्नर आंबेगाव व शिरूर तालुक्यातील बेचाळीस गावांत शिवसेना (उद्धव सेना) कुठेही कार्यरत नाही. ज्या शाखा आहेत त्या फक्त कागदोपत्री आहेत. आलेल्या राऊत साहेबांनी खरोखरच गावोगावी जाऊन व्यवस्थित आढावा घेतला तर शिवसेनेची झालेली दैनिय अवस्था पाहवणार नाही. हे नक्की……

स्थानिक नेते फक्त वरिष्ठ आल्यानंतर त्यांना खुश करण्यासाठी कागदी घोडे नाचवत शिवसेनेच्या गाव तेथे शाखा व शाखा प्रमुख अस्तित्वात आहेत. कागदोपत्री खोटी वस्तुस्थिती मांडून वरिष्ठ नेत्यांना अंधारत ठेवत आहेत असे करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कमकुवत ठेवण्यामागे येथील स्थानिक पक्ष नेतृत्वाचा नक्की वैयक्तिक स्वार्थ आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
दरम्यान सध्या स्थानिक नेतृत्वार विश्वास नसल्याने नाईलाजास्तव अनेक कार्यकर्ते शांत बसून आहेत. जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी खूप काही गमावून हि जुन्नर तालुक्यात शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला आहे. पुढील काळात जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्याचे शिवसैनिक जागृत करून कार्यरत करण्यासाठी निस्वार्थी सक्षम नेतृत्व आंबेगाव जुन्नर व शिरूर तालुक्यास देण्यास खासदार संजय राऊत अयशस्वी ठरले तर पुढील काळात या भागात सक्षम पक्ष बांधणी करणे शिवसेना उबाटा गटाला नक्कीच दुरास्पद होईल असे राजकीय वर्तुळातील जाणकारांचे मत आहे
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….
प्रा.अनिल नारायण निघोट
May 24, 2025 at 3:25 pm
तीस वर्ष ज्या शिवसेनेसाठी दिली,त्याच शिवसेनेचं अस्तित्व पुसण्याचं काम वरीष्ठ,संपर्किंच्या वशिल्यानं फक्त स्वतःपुरतं पहाणारे लादलेलं नेतृत्व ,ना विश्वासानं पहावं असं वाटतच नसल्याने गावागावात शिवसैनिक पहायला मिळणं पण अवघड झालंय कारण त्यांचाच द्वेष,विरोधकांशी सलगी, वर कित्येक तक्रारी पण केराची टोपली,निष्ठावंत शिवसैनिकांना किंमत ऊरली नाही, मिरवणारे राजकारण हाच धंदा करणारांना ऊद्धवजी पण मातोश्रीवर प्रवेश देऊन हे सांगतील त्यांला पदाधिकारी नेमतात,आधीच्यांचं काय झालं विचारायला नको का? वर शिवसैनिकांना अंधारात ठेवुन डायरेक्ट जाहीर पण नव्वद टक्के नेमणूका बाकी पण ज्यांचा द्वेष ते त्वरित बाजुला,जुन्नर, मावळ चे भाजप बंडखोर त्याच भाजपात मानानं मिरवतात पण ज्यांनी तीस वर्ष दिवसरात्र शिवसेनेचाच विचार करुन शेकडो मेळावे सभां,आधिवेशनांस ऊपस्थिती लावून बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपत लाखो रुपये खर्चुन तालुकाभर कार्यक्रम उपक्रम घेत,सर्वांना मानाचं स्थान देत शिवसैनिक तितुका मेळवावा या भावनेनं कित््येक फ्लेक्स लावत गावोगावी शिवसेना फुटीनंतर ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विविध सामाजिक कार्यक्रमातुन पोहोचण्याचा प्रयत्न केला, ते आपल्याला काही पक्षकार्य करायचं नसलं तरी डोईजड होताहेत वाटल्यावर हस्तकांमार्फत तक्रारी करुन वशिल्यानं त्वरीत कारवाई !पण बेचाळीस गावातील तालुका स्तरीय माजी पदाधिकारी महाविकास आघाडीऐवजी वळसेंना पाठींबा देऊनही परत मानानं फ्लेक्स वर झळकतोय हे सोयीचं दुटप्पी धोरण फक्त शिवसेनेसाठी मनापासून जीवाचं रान करणारांना मात्र बाहेचा रस्ता,मग हकालपट्टीनंतर हे कधी शिवसेनेत घेतले? की पक्षनेत्रुत्वास संपर्कींच्या वशिल्यानं भुरळ घातली कोणास ठाऊक आधी एकानं भोळेभाबडे शिवसैनिक वापरुन घेतले,पैशाची चटकवाले त्यांच्याबरोबर बाजूला ऊडी मारुन गेले,आता तरी निष्ठावंत शिवसैनिकास किंमत येईल वाटलं तर पक्ष लक्ष च देत नसल्याने लोकसभा विधानसभा निवडणुकीत मलिदयाची चटक लागलेले वगळता, कुणाचे मिंधे न होणारे स्वाभिमानी शिवसैनिक पूर्ण थंडावलेत, प्रत्येक निवडणुकीत ज्यांचं काम केलं, ज्यासाठी राष्ट्रवादी च्या साम दाम दंड भेदाचा सामना करुन वाईटपणा घेऊन भविष्याची रोजीरोटीची धुळदान करुन घेतली,त्यांच्याच चटया ऊचलायची वेळ शिवसैनिकांवर ऊद्धवजींनी आणली, आताही गावागावात शिवसैनिक कुठंय दुर्बिण घेऊन सापडत नाही, ऐंशी टक्के राष्ट्रवादी च्या दोन्ही गटांनी गुंडाळलेत,कोण कुठं तेच कळत नाही,कसली निष्ठा न कसलं काय ? निष्ठावंतांवर ईतर ठिकाणी जाण्याची वेळ आणली पण त्यातुन भगवा सोडणार नाही म्हणारांची गोची झाली,या हाडाच्दाया शिवसैनिकांना काही पोटासाठी ,घरं भरण्यासाठी शिवसनेत नाही,तर त्यांना शिवसेनेचं बाळकडु आहे
पद शिवसेनेचे पण काम राष्ट्रवादीचं,निवडणूका पार पडुन शेकडो दिवस झाले,ना मिटिंग ना आंदोलन ना कार्यक्रम आता कुठं जाग आलीय,पण विरोधकांच्या पाकीटांसाठी शिवसेना दावणीला,कायम विरोधकांचं हित मग शिवसैनिकांचा विश्वास च संपला,चार दहा वशिल्यानं निवडलेले पदाधिकारी म्हणजे शिवसेना?