सामाजिक
लायन हार्टेड होणाजी केंगले” यांच्या स्मारकाच्या उभारणीच्या कामाला वेग

मंचर दि. (प्रतिनिधी) आदिवासी समाज्याचे नेते लायन हार्टेड होणाजी केंगले यांचा स्मारक उभारणीसाठीमाजी गृह मंत्री व आमदार वळसे पाटलांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या
स्वतंत्र संग्रामाच्या काळात आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपले प्राणाची आहुती देणारे आदिवासी समाज्याचे नेते लायन हार्टेड होणाजी केंगले यांचा स्मारक उभारणी साठी आमदार वळसे पाटील यांची मंचर येथे भेट घेऊन संबंधित समारकाच्या स्थितीबाबत स्मारक समितीने राज्याचे माजी गृह मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांचो भेट घेतली

या बैठकीमध्ये जांभोरी येथे नियोजित असणाऱ्या लायन हार्टेड होनाजी केंगले यांच्या स्मारकबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रवीण पारधी यांच्या माध्यमातून स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत केंगले दादा यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्यांनी चर्चा करून स्मारकास निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली.यावेळी स्मारक समितीच्या शिष्ठ मंडळाची बाजू समजावून घेत वळसे पाटलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला नियोजित जागेला भेट देऊन पुढील पंधरा दिवसात जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सूचनेनुसार डी पी आर तयार करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान लायन हार्टेड होनाजी केंगले यांचा पुतळा तयार करण्याबाबत पुढील आठवड्यात समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने वर्कशॉपला पुणे येथे भेट देणार असून पुढील आठवड्यातच सर्वांजिंक बांधकाम विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येईल
यावेळी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब, माजी सभापती प्रकाशराव घोलप साहेब, माजी सभापती संजय गवारी साहेब, युवक चे अध्यक्ष वैभव दादा उंडे, युवा नेते अमोल अंकुश, बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात शरद बांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, उपसरपंच बबन केंगले, युवानेते प्रविण पारधी, दिनेश गभाले, पुनाजी पारधी, ज्ञानेश्वर पारधी, विठ्ठल पारधी, सुनिल गिरंगे, मारुती केंगले , गोविंद केंगले,दुंदा किरवे, हेमंत केंगले, सुरेश केंगले,स्मारक समितीचे सदस्य तसेच जांभोरी गावचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
सभापती शंकरराव विठू केंगले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

घोडेगाव दि (प्रतिनिधी)-आपल्या कार्य कर्तृत्वाने समाज्याला नवी दिशा देणारे आंबेगाव पंचायत समितीचे सभापती व आदिवासी समाज्याचे मार्गदर्शक शंकरराव केंगले यांच्या स्मुर्ती दिनांनिमित्ताने जांभोरी ता आंबेगाव येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या मागस मागस असू शकतो परंतू वैचारिक दृष्ट्या त्यांच्या श्रीमंतीचे दर्शन धडवीणारे सभापती शंकरराव केंगले यांच्या रूपाने अनेक विचारवंत या समाज्यात काम करीत आहेत.. शिक्षण कमी असले तरी वैचारिक क्षमता प्रचंड असणारी अनेक व्यक्ती आपण या समाज्यात पहातो जे आपल्या निरीक्षण शक्तीच्या व मुत्सद्देगिरी ने समाज्यात आपल्या कार्यकर्तृत्वची छाप ठेवतात कि याव्यक्ती हयात नसल्या तरी या व्यक्तींचे कार्य व विचार हे अखंडित समाज्याला नवी दिशा देण्यासाठी जिवंत असतात. आपल्या कार्यकर्तृत्वाने आंबेगावातील जनतेच्या मनात आपले स्थान अढळ केलेले आंबेगाव पंचायत समितीचे आदिवासी समाज्याचे प्रथम सभापती शंकरराव केंगले यांचा स्मुर्तीस अभिवादन करण्याचे निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
आयोजित केलेल्या कार्यक्रमात बिरसा ब्रिगेड जांभोरी, समस्त ग्रामस्थ, ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी, नोकरदार मंडळी तसेच महिला मंडळ जांभोरी यांच्या वतीने सभापती शंकरराव केंगले यांच्या स्मुर्तीस श्रद्धांजली अर्पण केली यावेळी कार्यक्रमाला बिरसा ब्रिगेड जांभोरीचे अध्यक्ष सुनील गिंरंगे, आदिवासी विचार मंचाचे प्रदीप पारधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,माजी उपसरपंच किसन पारधी ग्रामपंचायत सदस्य लता केंगले, जांभोरी पेसा उपाध्यक्ष मीना केंगले बिरसा ब्रिगेड शिलेदार गणपत पारधी विलास केंगले सुरेश केंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक
मंचर नगरपंचायत ओर.. बडून खाणारे तीन कावळे कोण? सोशल मीडियाच्या त्या पोस्ट ने चर्चेला उधान….

मंचर दि. (प्रतिनिधी ) मंचर नगरपंचायत हि आंबेगाव तालुक्यात कोणत्याना कोणत्या त कारणावरून चर्चेत असते यात काही नवीन नाही. परंतू ऐन सर्व पित्री अमावस्याच्या निमित्ताने मंचर नगर पंचायत ओर बडून खाणारे ते तीन कावळे कोण? अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्याने सर्वत्र चर्चेला प्रचंड उधान आले आहे.

(मंचर शहरातील वाहतूक कोंडी )
मंचर शहर हे आंबेगाव तालुक्याच्या राजकीय पटलावरील सदैव चर्चेत असलेले गाव गेली अनेक दशका पासून हि पंचायत विरोधकांच्या ताब्यांतच राहिली. या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनी खूप प्रयत्न केले परंतू त्यांना म्हणावे असे यश मिळाले नाही माजी खासदार कै किसनराव बाणखेले तसेच शिवसेना नेते कै. अँड अविनाश रहाणे असताना सत्ताधारी पक्ष सदैव या पंचायतीवर आपले वर्चस्व राखण्यात अयशस्वी ठरला.
(स्वच्छाता गृहाची दुरावस्था)
दरम्यान गेल्या दोन वर्षपूर्वी मंचरमध्ये ग्रामपंचायत विसर्जित होऊन नगरपंचायत निर्माण झाली. तेव्हा पासून मंचर नगर पंचायतीवर प्रशासकीय कारभार सुरु आहे.या काळात मंचर नगर पंचायत कार्यक्षेत्रात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली गेली असल्याचे बोलले जाते. यात विविध ठिकाणचे सिमेंट रस्ते व्यापारी संकुल भाजीमंडई या सोबत विविध विकास कामे करण्यात आली आहेत परंतू येथील बहुतांश कामे गैरव्यवहार झाल्याचे आरोपांनी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे आढळले झालेली कामे अतिशय नित्कृष्ठ दर्जाची झालेली असल्याचे आरोप अनेक प्रतिष्ठितांनी केले यावर अनेक उपोषणे झाली परंतू खरोखरच गैर व्यवहार झाला कि हि देखील विरोधकांची आरडा ओरड होती हे काही येथील जनतेला समजले नाही कारण हि आंदोलणे अचानक बसणात गुंढाळली गेली त्यामुळे यावर कोणत्याही प्रकारची काहीच ठोस कारवाई मात्र झलेली दिसली नाही.
मंचर नगरपंच्यातीच्या विकासासाठी सुमारे एकशे दहा कोटी रुपयांचा निधी आला असे म्हटले जाते परंतू आलेल्या निधीपैकी किती निधी योग्य रीतीने खर्च केला गेला हे एक कोढंच म्हणावे लागेल. आजही अनेक झालेली कामे एकतर अर्धवट स्वरूपात पडुन आहेत तर अनेक कामे पूर्ण होऊनही त्यांचा दर्जा हिन असल्याचे दिसते. त्यामुळे मंचर शहरात योग्य नियोजन होण्या ऐवजी बकाल पणा वाढल्याचे दिसत आहे. यात वाहतुक कोंडीचा प्रश्न हि मोठा ऐरनीवर आहे.
दरम्यान सर्वपीत्री अमावस्या चे निमित्त साधून सोशल मीडियावर पाठविलेली पोस्ट नक्की कोणाकडे ईशारा करते यावर चर्चाना मोठ्या प्रमाणावर उधान आले आहे. हे तीन कावळे कोण? हा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आप आपसात चर्चा करताना दिसत आहेत. मग हे कथाकथित कावळे राजकीय क्षेत्रातील आहेत कि प्रशासनातील? किंवा ठेकेदारी क्षेत्रातील एजंट अशा स्वरूपाच्या चर्चांना सर्वत्र उधान आलेले दिसत आहे.
मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतित रूपांतर झालेपासुन वापरण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा योग्य रीतीने वापर झालेला आहे कि? नाही यावरहि चर्चा सुरु आहेत कारण ठिकाठिकाणी बांधण्यात आलेले रस्ते असोत इमारती असोत कि शौचालये हि अतिशय नित्कृष्ठ दर्जाची बांधण्यात आल्याचे सांगितले जाते जर असे आरोप वारंवार होत असतील तर या आरोपांची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. कारण तालुक्यातील नेते कराडो रुपयांचा विकास कामाचा निधी शासनाकडून आणूनहि त्याचा योग्य विनियोग जनतेसाठी होत नसल्याची चर्चा आहे या जनतेच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नसल्याने तालुक्यातील जेष्ठ नेते मंडळी यात गुंतले आहेत कि काय? अशीहि चर्चा नागरिकांनातून सुरु आहे कारण अनेक वेळा आरोप होऊनही जेष्ठ नेते या आरोपांकडे दुर्लक्ष करीत असतील तर दाल मे कुछ तो काला है कि, पूर्ण डाळच काळी आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत त्यासाठी तालुक्याच्या राजकीय नेत्यांनी यापासून बोध घेऊन योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
दरम्यान लवकरच नगर पंचायत निवडणुका होणार असून या प्रश्नबाबत जेष्ठ नेत्यांनी आपल्या भूमिका जाहीर न केल्यास येणाऱ्या निवडणुकीत नगरपंचायत गैरव्यवहार बाबत आरोपांची राळ उठण्याची शक्यता नकरता येणार नाही. असे चित्र गाव कऱ्यांच्या आप आपसातील चर्चेतून दिसत आहे.
सामाजिक
निश्चय शक्तीच्या जोरावर लाखो शेतकरी व शेकडो बेरोजगार युवकांना आर्थिक स्थर्य देणारा सर्वसामान्यांचा ….. “श्रीमंत योगी”

मंचर दि (प्रतिनिधी )- {वाढदिवस विशेष }
निश्चयाचा महामेरू, बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, “श्रीमंत योगी”
हे वाक्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना उद्देशून बोलले जाते. कारण संपूर्ण हिंदुस्थानात असलेली मुगल साम्राज्याची जुलमी सत्ता उलथुन टाकत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व हिंदुस्थानातील जनतेला रयतेच राज्य दिले. एक निश्चित ध्येय साध्य करण्याची इच्छा व त्यासाठी त्यांनी केलेला त्याग,यामुळे राजे, बहुतांचा आधार बनले, सर्वकाही असूनही जनहितासाठी सर्वसुखांचा त्याग करत, बहूजणांचे कल्याण करण्यासाठी अहोरात्र झगडून,एक सक्षम स्थिती त्यांनी निर्माण केली त्यामुळे जनतेचे त्यांना श्रीमंत योगी म्हटले.

आजच्या स्वातंत्र्य भारतात विविध क्षेत्रात अनेकांनी आपल्या निश्चित ध्येयाच्या जोरावर एक स्थान प्राप्त केले आहे. त्यातून समाज हित राष्ट्र उंन्नती साधाण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या कल्पनेतून साकरलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून सर्वांच्या आर्थिक उन्नतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो शेतकरी व हजारो युवकांना रोजगार निर्माण करून देत.त्यांचा आधार बनून या शेकडो कुटुंबाना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी स्थिती निर्माण केली अशा या उद्योजकास हि श्रीमंत योगी म्हणणे वावगे ठरणार नाही.

(पराग समूहात काम करणाऱ्या महिलांना विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रो्त्साहन )
भारत देशामध्ये दुधाची उत्क्रांती झाली व दुधाचे उत्पादन वाढले परंतू त्यावेळी खऱ्या अर्थाने दुधाची साठवणूक करून शहरी बाजार पेठेत दूध पोचविण्याबाबत शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत होती त्यामुळे बळीराज्याने उत्पादीत केलेले दूध शासन स्वीकारण्यास सक्षम नसल्याने १९९१ च्या काळात दुधाला खडा पद्धत सुरु झाली. या कारणाने शेतकऱ्याने उत्पादीत केलेले लाखो लिटर दूध शेतकऱ्यांना रस्त्यावर अथवा ओढ्या नाळ्यांत फेकून द्यावे लागतं होते अशा वेळी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या प्रामानिक हेतूने प्रवाहित होत.बळीराज्याने उत्पादीत केलेल्या दुधाला योग्य भाव मिळून शेताकऱ्यांचे अर्थिक उत्पन्न वाढवे यासाठी देवेंद्र शाह यांनी डेअरी व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय करून पराग दूध प्रकल्पाची निर्मिती केली व यातीन पुणे नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे खडा असलेल्या दिवसांचे दूध विकत घेऊन शेतकऱ्यांच्या व्यवसायाला हातभार लावला. या तून अनेक विविध अडिअडचणीवर मात करीत पराग उद्योग समूहाचे एका मोठ्या दूध प्रकल्पा मध्ये रूपांतर झाले.

दरम्यान “देवेंद्र शाह” यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर व्यवसाय वृद्धिंकाळात निर्माण होणाऱ्या अनंत अडचणीवर मात करीत डेअरी उद्योग क्षेत्रात “गगन भरारी” घेतली. तर जगाच्या बाजारपेठेत भारतीय डेअरी उद्योगाला नवी दिशा देत एक सन्मान जनक स्थान मिळवून दिले, व त्यातून भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उत्कर्षांचे दिवस आणले.जीवनात एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन अहोरात्र काम करीत, प्रयत्नाची पराकष्ठा करणारे देवेंद्र शाह हे “निश्चियाचे महामेरू” ठरतात.

आज जगाच्या बाजारपेठेमध्ये पराग उद्योग समूहाने आपला दाबदबा निर्माण केला असून गोवर्धन घी, गो चीझ, प्राईड ऑफ काऊ नावाने उत्कृष्ट दर्जाचे दुग्ध जन्य पदार्थ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले या दुग्धजन्य पदार्थाना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आज जगाच्या बाजार पेठेत पराग मिल्क फूड्स च्या उत्पादनांनी मोठा ग्राहक जमा केला आहे. महाराष्ट्र गुजरात सह देशाच्या अनेक राज्यात गोवर्धन घी या सोबत आवतार, टॉपअप, गो चीझ, या नावाने असलेल्या दुग्धजन्य पदार्थाना प्रचंड प्रमाणावर ग्राहकांकडून मागणी आहे. १९९१ च्या सुमारास सुरु झालेल्या गोवर्धन प्रकल्पा ने जगाच्या बाजारपेठेत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. सुरवातीच्या काळात विविध अडीअडचणी वर मात करत गोवर्धन प्रकल्पचे सर्वोसर्वा देवेंद्र शाह यांनी एक नवा इतिहास निर्माण केला आहे.

भारतीय डेअरी उद्योगात आपल्या कंपनीचे नाव सर्वोत्कृष्ठ स्थानावर नेण्याचा निश्चय करण्याच्या या “निश्चयाच्या महामेरूने” लाखो शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या दुधाला भाव देत आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला.त्याचबरोबर आपल्या व्यवसायास एक उत्कृष्ठ उंची निर्माण करून देत यातून शेतकऱ्या सह युवकांना नोकरी व व्यवसाय निर्माण करून देऊन राज्यातील नव्हेतर देशात शेकडो कुटुंबाना आर्थिक आधार दिला आहे.त्यामुळे आज लाखो शेतकरी व शेकडो युवक आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत.

दरम्यान सर्वांचे कल्याण होवो, भले होवो, या उद्देशाने अहोरात्र झगडणारे तसेच कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना आपलेसे वाटणारे ” देवेंद्र शाह” यांना खऱ्या अर्थाने आजच्या काळातील श्रीमंतयोगी असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असा हा कर्मयोगी या आंबेगावच्या देवभूमीत जन्माला आला. व त्याने अनेकांच्या जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. अशा या धुरंदर, दूरदृष्टीच्या प्रसिद्ध उद्योजकास बोभाटा परिवाराकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष मंगलमय शुभेच्छा….

-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय11 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….