Customize Consent Preferences

We use cookies to help you navigate efficiently and perform certain functions. You will find detailed information about all cookies under each consent category below.

The cookies that are categorized as "Necessary" are stored on your browser as they are essential for enabling the basic functionalities of the site. ... 

Always Active

Necessary cookies are required to enable the basic features of this site, such as providing secure log-in or adjusting your consent preferences. These cookies do not store any personally identifiable data.

No cookies to display.

Functional cookies help perform certain functionalities like sharing the content of the website on social media platforms, collecting feedback, and other third-party features.

No cookies to display.

Analytical cookies are used to understand how visitors interact with the website. These cookies help provide information on metrics such as the number of visitors, bounce rate, traffic source, etc.

No cookies to display.

Performance cookies are used to understand and analyze the key performance indexes of the website which helps in delivering a better user experience for the visitors.

No cookies to display.

Advertisement cookies are used to provide visitors with customized advertisements based on the pages you visited previously and to analyze the effectiveness of the ad campaigns.

No cookies to display.

singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

आपल्या “मायभूमीच्या उत्कर्षांसाठी सर्वोतोपारी मदत करणारा, तरुण नवउद्योजक”…. सचिन सहाणे 

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) हे,..माय भु तुझे मी, फेडीन पांग सारे… आणील आरतीला हे सूर्य चंद्र,तारे”… स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या गीताच्या ओळी रेखाटत आपल्या जन्म भूमिबद्दल आदर व्यक्त केला आहे.  याच आपल्या जन्मभूमीबद्दल आदर  व्यक्त करीत आपण आपल्या बालवयातील कडू,गोड आठवणीचा ठेवा,आपल्या गावातील ज्या बाल मित्रांमध्ये तसेच आपले नातेवाईक, आप्तेष्ठ, गावातील प्रत्येक व्यक्तीसोबत जगलो. त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष किंबहुना अप्रत्यक्ष क्षणाचे पांग फेडणे तसें मात्र अशक्यच…

परंतु त्या आपल्या गावच्या मातीसाठी व आपल्या गावातील नागरिकांसाठी काहीतरी चांगले करून आपल्या गावातील पुढील पिढीला सक्षम  घडविण्यासाठी, शक्य तेव्हढे निरपेक्ष भावनेने मदत करण्याची संधी मिळणे भाग्यचेच म्हणता येईल,

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या घोडेगाव येथे आपले बालपण घालवून आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी गरुड भरारी घेत विविध अडचणींवर मात करीत कर्नाटक राज्यात  बेंगलोर या नवख्या  शहरात जाऊन स्व हिंमतीने कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग उभा केला. दिवस रात्र अतोनात कष्ट करून आपले साम्राज्य निर्माण करत केले परंतु यात  आपल्या मायभूमिला न विसरता  तेथे राहणाऱ्या आपल्या गावच्या उत्कर्षांसाठी, येथील विद्यार्थ्यांच्या  शौक्षणिक प्रगतीसाठी सर्वोतोपारी मदत करण्याची मनोमन इच्छा बाळगून या तरुणांने लाखो रुपयांची शाळेला मदत केली…हा तरुण उद्योजक म्हणजे  सचिन भीमाशंकर सहाणे  ….

उद्योजक सचिन सहाणे  यांनी घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेच्या नवीन सभागृह निर्मितीसाठी आपले कनिष्ठ बंधू कै. समीर सहाणे  यांच्या स्मरणार्थ सातलाख एक्कावण हजार रुपयांची देणगी दिली आहे.त्याचप्रमाणे या आगोदर मागील वर्षी उद्योजक सहाणे यांनी तीं लाख रुपये बँकेत एफ डी करून त्याद्वारे मिळणाऱ्या व्याजतून घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेतील दहावी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषक वितरण केले जाते.

दरम्यान घोडेगाव येथे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सवात ह उद्योजक सहाणे यांनी सात लाख एक्कावंन हजार रुपयांचा चेक संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांच्याकडे प्रदान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल चेअरमन  बाळासाहेब काळे, संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेश काळे, कोशाध्यक्ष सोमनाथ काळे, सचिव  विश्वास काळे, समन्वय समिती अध्यक्ष राजू काळे,सर्वश्री संचालक अजित काळे अक्षय काळे बी डी काळे कॉलेज चेअरमन अँड मुकुंद काळे प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्रचार्य धनंजय पातकर, प्राचार्या डिसोजा मॅडम व इतर  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Continue Reading
2 Comments

2 Comments

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    December 30, 2024 at 11:36 am

    पैशाने श्रीमंत झालेली माणसे आपल्या गावाला आपल्या माणसांना विसरतात . परंतू उद्योजक सचिन सहाणे यांनी दाखवुन दिले की माझे गांव माझी माणसं हे माझं सर्वस्व आहे . आणी म्हणूनच त्यांनी आपल्या गावच्या शाळेला साडेसात लाखांची देणगी दिली . अशा या उद्योजकाचे मनापासून आभार . त्यांना पुढील काळात खुप मोठे व्हावेत अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना !

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शिंदे सेनेलाहि लागले का? “गटबाजीचे ग्रहण”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री भीमाशंकर येथे दर्शनाला येणार असताना जिल्हाप्रमुख व माजी सरपंचांच्या नियोजनावर पाणी पाडत जेष्ठ पदाधिकार्याने केलेल्या कुरघुडीमुळे आंबेगाव तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेलाही गट बाजीचे ग्रहण लागल्याची चर्चाच तालुक्यात सर्वत्र सुरु जगली आहे.

“सत्तेचे सगळेच चहाते असतात. “शिंदेची शिवसेना,सत्तेत असल्यापासुन त्यापक्षाकडे सध्या भरती सुरु आहे. पण यामुळे पक्ष बळकट होण्या ऐवजी सर्वत्र गट बाजीला उधान आले असल्याचे बोलले जात असून, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यात दिसून आल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.”

      “म्हणतात णा कानामागून मागून आली आणि तिखट झाली”  या म्हणी प्रमाणे आगोदर पक्षात असलेल्या आपल्या सहकार्याना व जेष्ठ पदाधिकाऱ्यांना नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची खोड मोडण्यात मजा येते असेच म्हणावे लागेत म्हणूनच विश्वासात न घेताचे कारण पुढे करत क्काही जेष्ठ पदाधीकाऱ्यांनी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व उबाटा पक्षातून शिंदे च्या पक्षात आलेल्या माजी सरपंचांची खोड मोडण्यासाठीच केला उतात्याप मात्र यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल

घडले असे कि,मंचर शहराचे  माजी सरपंच आणी शिंदे सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख यांनी  राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या एकनिष्ठतेची छाप पाडून आपले वर्चस्व वाढविण्याचा घाट घातल्याची कुणकुण काही जेष्ठ नेत्यांना लागल्या नंतर तालुक्यात राजकीय कुरघुडी ला सुरवात झाली. नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख व माजी सरपंच यांनी घोडेगाव येथे मोठी बॅनरबाजी करीत सत्काराचे आयोजनही केले. पण ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांचे वाहन सत्कारासाठी थांबणार होते. त्याचे अगोदरच्या स्थळी उप मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबावून काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला व सत्कार झाला असे सांगत उपमुख्यमंत्र्यांचा ताफा काढून दिला.

दरम्यान पुढे सत्कारच्या नियोजित स्थळी उपमुख्यमंत्री यांचा ताफा आल्यानंतर जमलेल्या शिव सैनिकांनी जयजयकारच्या घोषणा दिल्या त्याच सोबत ढोल ताशांचा आवाज झाला. जेसीबी ने फुलांची पुष्पावृष्टी हि करण्यात आली पण सत्कार अगोदरच  झाला आहे  असे समजत उपमुख्यमंत्री साहेबांनी याकडे दुर्लक्ष केले व  गाडीच्या काचा हि खाली ना करता  गाड्याचा  ताफा तसाच पुढे सरकत श्री क्षेत्र भीमाशंकर शिवज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी रवाना झाला याठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांची, कार्यकर्त्यांची यामुळे घोर निराशा झाली व  नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व नव्यानेच शिंदेच्या शिवसेनेत सामील झालेले मंचरच्या त्या नेत्याचा उपमुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करण्याच्या त्या सर्व नियोजनावर पाणी पडले. 

दरम्यान यातूनचा आंबेगाव तालुक्यात सध्या वर्चस्वची लढाई शिंदे गटात सुरु झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशीच एकमेकांत सुरु असलेली कुरघुडी शिवसेना शिंदे गटास मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये महागात पडू शकते अशी शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे यातून शिंदेच्या शिवसेनेतही गटा तटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले दिसून येत आहे.

Continue Reading

सामाजिक

भीमाशंकर परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसाने डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु घोड नदीकाठच्या गावांना सावधनतेचा इशारा….

Published

on

मंचर दि. (सदानंद शेवाळे)- गेल्या दोन दिवसापासुन डिंभे धरण परीक्षेत्रात सुरु असलेल्या पावासामुळे धरणातील पाण्याची पातली वाढल्यामुळे घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून नदिकाठच्या  नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कुकडी प्रकल्प  अभियंता यांनी केले आहे 

दरम्यान डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डिंभे धरण क्षेत्रातील ओढ्या नाल्यांना मोठ्याप्रमाणा वर पाणी आले असल्यामुळे डिंभे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे सध्या धरणामध्ये ९४% पाणी असून खबरदारीच्छा उपाय म्हणून धरणातून आज दि १९/८/२०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ३००० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग घोड नदी पात्रात करण्यात आला आहे.  धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून सध्या धरणातून तीन हजार क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

.दरम्यान पावसाचा वाढता जोर पहाता घोड नदीपात्रात डिंभे धरणातून  विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे, नदीकाठच्या गावांतील सतर्क राहावे.तसेच  नदीपात्रात किंवा नदीकाठी कोणीही जाऊ नये व आपल्या जनावरांना जाऊ देऊ नये.त्याचप्रमाणे आपल्या गावातील लोकांना ही माहिती कळावी म्हणून सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्ष कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांचे वतीने देण्यात आला आहे.

Continue Reading

सामाजिक

शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

Published

on

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर  क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या  आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड  रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची  गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती  वाढीस लागेल  

दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in