सामाजिक
UPI Payment Rules 2024 | UPI Payment साठी लागू झालेले १० नवीन नियम

UPI Payment Rules 2024- आपल्या देशात जवळपास 40 कोटींच्या घरात यूपीआय युजर आहेत भाजी मार्केट पासून हॉटेलपर्यंत सगळीकडेच आपण मोबाईल वरून पेमेंट करतो त्यामुळे खिशात कॅश नसायची आपल्याला 2023 मध्ये यूपीआय वापरून सोळा लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले पण यासोबत आजकाल करण्याचे प्रमाण सुद्धा वाढलं सायबर क्राईमच्या आकड्यानुसार या 16 लाख कोटींच्या व्यवहारांपैकी 30000 कोटी रुपयांची चोरी केली गेली आता एवढे व्यवहार वाढणार तर चोरीचा प्रमाण सुद्धा वाढणार म्हणूनच ते कंट्रोल करण्यासाठी आणि सिक्युरिटी वाढावी म्हणून यूपीआय वर काही नवीन रूल्स अप्लाय केले जाणार आहेत जे एक जानेवारी 2024 पासून लागू होतील आरबीआयने एमपीसीआयच्या मार्फतरण होणाऱ्या सर्व प्रकारच्या यूपीआय पेमेंट सिस्टीम मध्ये एक जानेवारी 2024 पासून लिमिट कमी करण्यापासून ते ॲप बंद करण्यापर्यंत कोणते बदल केले ते आपण पाहूयात.
UPI Payment Rules 2024 खालीलप्रमाणे:
Rule no-1 | UPI Lock- पहिला नियम असा की 2023 मध्ये तुम्ही न वापरलेले सर्व युपी ॲप्स लॉक होतील:
UPI Payment Rules 2024 नुसार हा नियम असा की जर गुगल पे, फोन पे, पेटीएम, ॲमेझॉन पे, भीम (Google Pay, Phonepe, Paytm, Amazon Pay, Bhim) यापैकी कोणताही अँप तुमच्या फोनमध्ये असेल आणि संपूर्ण वर्षात तुम्ही एकदाही याचा वापर केला नसेल तर तो सिक्युरिटी रीजन साठी RBI-आरबीआय द्वारा रद्द केला जाईल म्हणजेच जर तुम्ही एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 च्या आतमध्ये एकही व्यवहार केला नसेल तर तो आप रद्द केला जाईल.
Rule no-2 | UPI Payment Rules 2024-Daily Limit on UPI Payment- डेली पेमेंट लिमिट यूपीआय पेमेंट वर आता लिमिटेशन लावण्यात येणार :
UPI Payment Rules 2024 नुसार UPI वरील डेली पेमेंट लिमिट आता कमी केले जाणार आहे हे लिमिट आता फक्त एक लाखांपर्यंत असेल एक लाखांवरचा कोणताही व्यवहार तुम्ही आता यूपीआय वापरून करू शकणार नाही.
Rule no-3 | Special Payment Limit- स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणार:
UPI Payment Rules 2024 नुसार तिसरा आहे स्पेशल पेमेंट लिमिट स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणारे स्पेशल पेमेंट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधली फी तिथले बिल हे सर्व व्यवहार इथला पेमेंट तुम्ही एक दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता.
Rule no-4 | Transaction Settlement Time- ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम :
चौथा आहे ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम खूप महत्त्वाचा बदल असणार आहे. वाढता सायबर गुन्हा लक्षात घेऊन तो रोखण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा बदल समजला जातो. जानेवारी 2024 पासून 2000 पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तास लागणार आहेत, आत्तापर्यंत या सिस्टीम मध्ये UPI ने केलेले पेमेंट लगेच समोरच्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये जमा व्हायचं, पण आता 2024 पासून कोणत्याही नवीन व्यक्तीशी केलेला यूपीआय व्यवहार पूर्ण व्हायला ४ तास लागणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे की जर तुम्ही कोणाशीही नेहमी व्यवहार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू होणार नाहीये. हा नियम फक्त आणि फक्त नवीन लोकांसोबत होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या वरच्या व्यवहारासाठी लागू होणार आहे. आता नवीन व्यक्ती म्हणजे कोणीही असू शकतं जसं की कोणता दुकानदार, किराणावाला, हॉटेल, रेस्टॉरंट असे लोक असतील. पण इथे हा प्रश्न येतो की जर या व्यवहाराला एवढा वेळ लागणार असेल तर हे सर्वजण त्यांच्या ग्राहकांसाठी युपीआय पेमेंटचा ऑप्शन ओपन ठेवतील की नाही.
Rule no-5 | UPI Transaction Cancel Option- यूपीआय ट्रांजेक्शन कॅन्सल ऑप्शन हा सुद्धा खूप महत्त्वाचा बदल आहे:
UPI ट्रांजेक्शन कॅन्सल ऑप्शन हा वरती सांगितलेल्या पॉईंट सोबत कनेक्टेड आहे या तुम्ही जर कोणत्याही नवीन व्यक्तीसोबत यूपीआय व्यवहार केला असेल तर तो तुम्ही ४ तासाच्या आत कॅन्सल करू शकता आणि ते पैसे पुन्हा आपल्या अकाउंटला रीवर्ट करू शकता किंवा जमा करू शकता याचा मोठा फायदा असा की जर तुमचे पैसे कोणी फसवून त्यांच्या अकाउंट मध्ये घेतले असतील किंवा तुमच्याकडून चुकून पैसे पाठवले गेले असतील तर ते ट्रांजेक्शन तुम्ही ४ तासाच्या आत कॅन्सल करून परत स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा करू शकता.
UPI Payment Rules 2024 नुसार तिसरा आहे स्पेशल पेमेंट लिमिट स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणारे स्पेशल पेमेंट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधली फी तिथले बिल हे सर्व व्यवहार इथला पेमेंट तुम्ही एक दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता.
Rule no-3 | Special Payment Limit- स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणार:
UPI Payment Rules 2024 नुसार तिसरा आहे स्पेशल पेमेंट लिमिट स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणारे स्पेशल पेमेंट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधली फी तिथले बिल हे सर्व व्यवहार इथला पेमेंट तुम्ही एक दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता.
याचा तोटा असाही होऊ शकतो की जसं की एखाद्या कॅफे किंवा रेस्टॉरंट ला जेवायला गेलात तर तिथे एखादे एखाद्या वेळेस तुमचा UPI पेमेंट ऑप्शन स्वीकारणार नाही आणि तुम्हाला आधी सारखं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पेमेंट करावे लागेल किंवा एखादा दुकानदार तुम्ही पेमेंट केल्यानंतर चार तासांनी वस्तूची डिलिव्हरी देऊ शकतो. तुम्ही ट्रांजेक्शन कॅन्सल केलं तर काय होणार ही भीती असेल म्हणून ते अशी रिस्क घेणे टाळू शकतात.
Rule no-6 | Bank Account Name will be displayed on UPI- बँक अकाउंट नेम यूपीआय मध्ये डिस्प्ले होणार:
बँक अकाउंट नेम यूपीआय मध्ये डिस्प्ले होणार आता तुम्ही कुठे यूपीआय पेमेंट करायला गेलात तर त्या विक्रेत्याचा खरं नाव तुम्हाला पेमेंट करताना दिसणार म्हणजे बँक डिटेल्स मध्ये असलेलं खरं नाव तुम्हाला दिसणार त्यामुळे यापुढे ट्रान्सपरन्सी वाढणारे.
Rule no-7 | UPI Credit Line Payment- यूपीआय क्रेडिट लाईन पेमेंट:
सातवा आहे यूपीआय क्रेडिट लाईन पेमेंट(UPI Credit Line Payment) करायला बँक मध्ये पैसे असणे इम्पॉर्टंट होतं आतापर्यंत तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे असतील तरच पेमेंट करू शकत होतात. पण आता UPI Payment Rules 2024 नुसार 2024 पासून तुम्ही बँकेला रिक्वेस्ट करून क्रेडिट घेऊ शकता. याचा फायदा असा की जर तुमच्या अकाउंटला कमी पैसे शिल्लक असतील तर तुम्ही क्रेडिट घेऊन जास्त पेमेंट करू शकता. ही सर्विस बँक तुम्हाला तुमचा सिव्हिल स्कोर (CIBIL Score) आणि ट्रॅक रेकॉर्ड चेक करून ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर यूपीआयचं आता क्रेडिट कार्ड सारखा वापर करता येऊ शकतो.
Rule no-8 | UPI ATM- यूपीआय एटीएम:
आठवा नियम असा आहे की RBI आता यूपीआय एटीएम (UPI ATM) आणत आहे. यासाठी RBI ने जपान मधल्या हिताची कंपनीसोबत कोल्याबोरेट (Collaborated with Hitachi Company) केल्या आहे त्यामुळे लवकरच यूपीआय एटीएम (UPI ATM) भारतात सगळीकडे प्रोव्हाइड केले जाईल. ज्यामुळे जसं तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरून एटीएम मधून केस काढता आता त्याचप्रमाणे तुम्हाला यूपीआय क्यूआर कोड स्कॅन (UPI QR Code Scan) करून एटीएम मधून पैसे काढता येणार आहे.
Rule no-9 | UPI Transaction Charges- यूपीआय ट्रांजेक्शन चार्ज:
नववा आहे यूपीआय ट्रांजेक्शन चार्ज (UPI Transaction Charges) जर कोणी यूपीआय क्रेडिट लिमिट (UPI Credit Limit) वापरून किंवा क्रेडिट कार्ड वापरून यूपीआय वॉलेटमध्ये पैसे जमा केले म्हणजे आता ही सर्विस फक्त पेटीएमला अवेलेबल आहे पण जर का युपीआय वॉलेटमध्ये तुम्ही पैसे जमा केले असतील तर त्यातून यूपीआय पेमेंट केलं असेल तर त्या विक्रेत्याला 1.1% सर्विस चार्ज द्यावा लागेल हा सुद्धा महत्त्वाचा बदल होणार. सर्विसेसला इम्प्लिमेंटेशन मध्ये येणाऱ्या सर्व प्रॉब्लेमचा अभ्यास करून हे नवीन रूल्स एन. एफ. टी. आर. टी. जी. एस. (NEFT RTGS) या ऑनलाइन पेमेंट साठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आरबीआय च्या वतीने UPI Payment Rules 2024 त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात.
Rule no-10 | UPI Tap & Pay Option- यूपीआय साठी आता टॅप अँड पे ऑप्शन येऊ शकतो:
UPI Payment Rules 2024 नुसार UPI साठी आता टॅप अँड पे ऑप्शन येऊ शकतो. 2024 साठी यूपीआयचे नियम बदललेत त्यामुळे जसा तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ऑप्शन वापरता तसा आता यूपीआय द्वारा पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना लवकरच टॅप अँड पे सुविधा मिळू शकते. यात तुम्हाला तुमचा मोबाईल पेमेंट मशीनवर टच करावा लागेल आणि मग पेमेंट होणार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payment Corporation of India) ने ही सर्विस देणारी प्रोसेस सुरू केली असे सांगितले जात आहे. जानेवारी 2024 पासून UPI Payment मध्ये होणारेत आणि जे आपण रोजच्या व्यवहारांसाठी इझीली वापरतो आता याचा ग्राहक म्हणून आपल्याला किती फायदा आणि किती तोटा होणार आहे ते आपल्याला हे वापरून समजेल पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या होणाऱ्या चेंजेस बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून सांगा
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….