राजकीय
युवा नेत्यांकडून पत्रकारांना कोकण वारी,हि कोणत्या निवडणुकीची तयारी

सद्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला असल्याने प्रसिद्धी झोतात येण्यासाठी कोण काय शक्कल लावेल काही सांगता येत नाही..? काही योजना करतानाही गुप्त कराव्यात असे म्हटले जाते. परंतु एका कथाकथीत युवा नेत्याने मात्र प्रसिद्धी झोतात राहण्याच्या हव्यासापोटी काही पत्रकारांना स्वखर्चाने कोकण दर्शन सहल घडवली असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.

त्यामुळे “युवा नेत्यांकडून कोकण वारी, कोणत्या निवडणुकीची तयारी ..?”अशी एक चर्चा तालुक्यात सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.
तालुक्यात अनेकांना दिवसा स्वप्न पडताना दिसत आहेत. काही वर्षापूर्वी टेलिव्हिजन वर एक मालिका प्रचंड गाजली होती त्या मालिकेचे नाव होते. “मुंगेरीलाल के हसीन सपने” अशा अनेक मुंगेरीलाल यांचा तालुक्यात सुळसुळाट झाला असल्याचे बोलले जात आहे. काही स्वयंघोषित पुढाऱ्यांना तर दिवसा आमदारकीची किंवा खासदारकीची, जिल्हा परिषद ,पंचायत समिती पदाची स्वप्न पडताना दिसत आहेत.

काही ठिकाणी आयोजित सभांमध्ये व्यासपीठावर चमकेशगिरी करून आपण काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहोत. अशा अविर्भावात ते वावरत असतात. आपल्या पूर्वजांच्या किंवा वडिलधाऱ्या नातेवाईकांच्या पुण्याईवर पंचायत समिती जिल्हापरिषद सरपंच पद किंवा या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पद मिळाले म्हणून असे अनेक स्वयं घोषित युवा नेते अर्ध्या हळकुंडणे पिवळे होऊन नेता असल्याच्या अविर्भावात वावरत असतात.
अनेकांना अजूनही समजले नाही की नेता होण्यासाठी मनापासून समाजकार्याची आवड, दूरदृष्टीकोण,मुत्सद्देगिरी, काहीतरी मिळविण्याचे ध्येय व सर्वात महत्वाचे म्हणजे सातत्य हवे असते. आपल्या वाड-वडिलांच्या पुण्याईने त्यांना समाजात स्थान मिळाले पण ते टिकवून ठेवण्यासाठी स्वतः चे समाजाप्रतीचे योगदान ओळखण्या ऐवजी प्रसिद्धी क्षेत्रातील काही प्रतिनिधींना रिजविण्याचा प्रयत्न करून वर्तमान पत्र किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर थोडस नाव झळकल की अशा स्वयंघोषित नेत्यांना आसमंत ठेंगण होते आहे.
दरम्यान एका मोठ्या नामांकित संस्थेवर महत्वाचे पद भूषवित असलेल्या या युवा नेत्याच्या गेल्या दोन पिढ्या प्रामाणिकपणे समाज सेवा करीत आहेत. असा प्रचंड वारसा असलेल्या युवा नेतृत्वाकडून तालुक्यातील जनतेच्या नक्कीच योग्य अपेक्षा आहेत. मात्र त्यांना कोणत्या निवडणुकीची स्वप्ने पडत असावीत. कोण जाणे? होऊ घातलेल्या महत्वपूर्ण अनेक निवडणुकांमध्ये एखादी निवडणूक लढविण्याचे मनसुबे असावेत म्हणून तथाकथित युवा नेत्याने काही पत्रकारांना कोकण दर्शन वारी घडविली. या कोकण वारीत सर्व सामील मीडिया प्रतिनिधींचा सर्वतोपरी खर्च या नेत्याने आपल्या हस्तकामार्फत केला असल्याचे अनेकांच्या मुखातून ऐकावयास मिळते. या पत्रकारांमध्ये सहली दरम्यान काही पत्रकारांना योग्य सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याने तात्विक वाद झाले व हे “कोकण वारीचे” भिंग समाजात फुटले व तालुक्यात ही सहल एक चर्चेचा विषय ठरू लागली आहे…
समाजमान्य नेता होण्यासाठी समाजाशी नाळ जुळणे गरजेचे असते. समाजाचा मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी आपले समाजाप्रतीचे योगदान असणे आवश्यक आहे. एके काळी सत्तेत असलेल्या राहुल गांधीं यांनाही समाजातील सर्व सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी समाजात येऊन सर्व सामान्य जनतेशी नाळ जोडण्यासाठी भारत-जोडो यात्रेचे आयोजन करून शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत सर्वसामान्य गरीब जनतेच्या व्यथा समजावून घेत विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करावे लागले आहेत. त्याचप्रमाणे शरद पवार, उद्धव ठाकरे, या सारख्या अनेक मोठ्या नेत्यांना ही आपली छबी समाजमनावर ठसविण्यासाठी जनतेमध्ये येऊन काम करावे लागत आहेत. त्यामुळे समाजाचा विश्वास संपादन करणे किती महत्वाचे आहे. याची जाणीव अशा कथा-कथित युवा नेत्यांना केंव्हा होणार हाच एक संशोधनाचा भाग म्हणावा लागेल. कारण आपले कर्तृत्व असेल तर ते कोणीही लपवू शकत नाही. त्यासाठी असे कोणाचे लांगुलचालन करण्याचीही काही आवश्यकता नसते.
समाजाप्रतीचे आपले योगदान हीच खरी आपल्या प्रसिद्धीची पावती असून समाज मनावर आपले नाव कोरन्यासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसते. अशा युवा नेतृत्वाला समजू नये ही शोकांतिका म्हणावी लागेल. एकाने अनेक वर्षांपूर्वी असे म्हटले आहे की “या विश्वाचे कल्याण होऊदे”,या मागचा त्याचा हेतू विचारला असता त्या महान व्यक्तीने म्हटले की या विश्वात आपणही येतो म्हणजे आपसुकच परमेश्वर आपलेही कल्याण करतो म्हणजेच परमार्थातून गरजेपुरता स्वार्थ साधलाही जातो देण्याची वृत्ती ठेवली कि निसर्ग त्याला भरभरून देतो असे म्हणतात
परंतु परमार्थ व कर्तृत्व मात्र शून्य व स्वप्न मोठी मोठी हा निसर्ग तरी अशा स्वयंघॊषित नेत्यांची इच्छा पूर्ण करील की नाही यात शंकाच आहे. असो सध्या अनेकजण असेही म्हणत आहेत की, ‘कोकणवारी लई भारी मीडयावाले वरपतात मच्छी करी’ हा मोठा हास्य कल्लोळाचा विषय सर्वत्र चर्चिला जात आहे.
राजकीय
हे कार्यकर्ते… “खरंच जनहितार्थी कि लाभार्थी”?

मंचर दि (प्रतिनिधी)राज्याच्या राजकारणात वळसे पाटलांना स्थान मिळाले नाही म्हणून वळसे पाटलांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे कोणतीही दाद मागण्या ऐवजी .आपल्या नेत्यावर अन्याय होऊनही निमूटपणे मूग गिळून गप्प बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे सत्तेचा लाडू चाखत असूनही जेव्हा नेत्यावर अन्याय अन्याय होतो. तरीही गप्प असतील तर ते खरंच जनहितार्थी लाभार्थी कि, स्वार्थी ?

राज्याच्या राजकारणात गेली पस्तीस वर्षे असणारे एकेकाळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना यावर्षी मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही खऱ्या अर्थाने राज्याच्या उत्कर्षांसाठी नियोजनबद्ध काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकाला असे म्हणावायास हरकत नाही कारण वळसे पाटलांनी ज्या खात्याचे काम पाहिले त्या खात्याचा कारभार उत्तम पप्रकारे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
या वेळी मात्र महायुतीच्या काळात त्यांना मंत्री मंडळातून डावळण्यात आले यामागे कोणतीही व काहीहि कारणे असतील. परंतु महाराष्ट राज्य एका चांगल्या व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमहत्वाला मुकला हेही खरेच. वळसे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या खात्याचे काम पाहिलं त्या खात्याची प्रगती झाली आहे इतिहास आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तीला बाजूला ठेवणे हे पक्ष नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला ओ बि सी वर अन्याय झाला. असे सांगत पक्ष नेतृत्वावर आगपाखाड केली व आपण काहीही करू शकतो हे दाखवत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध केला व जोडे मारो आंदोलन करून धिक्कार हि अनेक कार्यकर्त्यांनी केला.परंतु आंबेगाव तालुक्यात मात्र वळसे पाठलांच्या कार्यकर्त्यांकडून साधा निषेधही नोंदवीला गेला नाही.
आंबेगाव,जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात वळसे पाटलांचे शेकडो कार्यकर्ते आहेत.परंतु वळसे पाटलांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. यावर कार्यकर्त्याकडून मंत्रिपदच्या मागणीसाठी प्रचंड हल्लाबोल होणं गरजेचं होत. परंतु यावर बोलण्याचे धारिष्टय कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. याचाच अर्थ वळसे पाटलांनी जे कार्यकर्ते जपले त्या कार्यकर्त्यांची भूमिका फक्त “टी फॉर टॅट” अशीच होती कि काय? असा प्रश्न विचाराला जातं आहे.
गेली अनेक वर्ष ते वळसेपाटलांच्या सोबत राहून समोर आल्यावर फक्त ” देखल्या देवाला दंडवत” घालत फक्त सत्तेचा मलिदा चाखणारे लाभार्थी कार्यकर्ते वळसे पाटलांजवळ होते हि सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची आवश्यकता नसावी. कारण वळसे पाटलांना डावलले जातं असताना त्यांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत रस्त्यावर येण्याचे धाडस एकाही कार्यकर्त्यांने दाखविले नाही किंवा या लाभार्थी कार्यकर्त्यांना वळसे पाटलांना मंत्री पदापासुन डावळून त्याच्यावर अन्याय केला जातं आहे. असेही वाटले नाही. किंवा त्यांची बाजू पक्ष नेर्तृत्वासमोर मांडण्याची हिंम्मतहि कोण्या कार्यकर्त्यांची झाली नाही हि मोठी शोकांतिका आहे.
दरम्यान काल झालेल्या आभार मेळाव्यात एकमेकांची उणी दुनी काढून आपण किती समर्थक हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. परंतु त्यात साहेबांवर पक्ष नेतृत्वाने अन्याय केला असून त्यावर पक्ष नेतृत्वाला जाब विचारावा असा साधा मुद्दाही कोणी मांडला नाही. खरंतर वळसे पाटलांना याची खंत नक्कीच असेल पण काय करणार? एकही कार्यकर्ता काहीच बोलला नाही यावरून असेच दिसते कि, साहेबांना मिळालेले बहुतांशी कार्यकर्ते फक्त जनहितार्थी नसून लाभार्थी आहेत का? अशा आशयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
राजकीय
माजी खासदार शिवाजीराव आढळराव ठरताहेत? “किंगमेकर”

मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत, खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूरलोकसभा मतदार संघावर आपली एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या संकल्पचा “अश्व” रोखून धरत,माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे किंग मेकर ठरले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

विधानसभेची रणधुमाळी संपली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुतीत आनंदी आनंद साजरा होत असताना मात्र विधानसभा काळात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी फोडलेल्या गगनभेदी डरकाळ्या पराभवाच्या गर्तेत शांत झाल्या या लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकविणारे शिरूर लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पश्चिम महाराष्ट्राचा ओ बी सी चा नेता होण्याचे स्वप्न मात्र धुळीलाच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराजयाची धूळ चारणारे तसेच प्रती संभाजी म्हणून आपली प्रतिमा मालिकांच्या माध्यमातून तयार करून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले, खासदार अमोल कोल्हे यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विधानसभेच्या रणांगणात मात देली व विधान सभेत आपल्याच विचाराचे लोकप्रतिनिधी विजयी करून शिरूर लोकसभेवर आपला वरचष्मा असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखवून दिले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार आढळराव थोडे बॅक फूट वर गेले होते. त्यांचे राजकारण मर्यादीत झाले. अशा अशयाच्या चर्चा देखील सर्वत्र झाल्या.परंतु नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रचंड कष्ट घेत आंबेगाव,शिरूर, भोसरी,जुन्नर व हडपसर येथे आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणून खासदार कोल्हे यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते.

दरम्यान जुन्नर, हडपसर, आंबेगाव भोसरी हे मतदार संघ विधानसभेत विरोधात जाणे म्हणजे कोल्हे यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कोल्हे यांना मतदारांनी लोकसभा मतदार संघात निवडून येताना जेव्हढी मते पडली त्या पेक्षा सुमारे दोन लाख कमी मते विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवारांना मतदान झालेले आहे.

दरम्यान राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सार्थ करीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले आहेत तर पुढील काळात खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करणे करणे गरजेचे आहे. त्यात इंद्रायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, भोसरी ते खेड रस्ता या दोन गोष्टी उत्तर पुणे जिल्यातील मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा आहेत. या घोषणा बाबत खासदार कोल्हे यांनी जागरूक राहून हि कामे युद्ध पातळीवर करणे त्यांच्या राजकीय सौख्याचे दृष्टीने गरजेचे आहे. परंतु केंद्रात व राज्यात विरोधी विचार सरणीचे सरकार असताना खासदार कोल्हे हे महत्व कांक्षी प्रकल्प कसे पूर्ण करणार? व शिरूरच्या जनतेला कसा? न्याय मिळवून देणार हे पहाणे कुतूहलचे ठरणार आहे.
राजकीय
“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावावेत”:जेष्ठ नेते अशोक काळे यांची प्रशासनाकडे मागणी

मंचर दि(प्रतिनिधी) सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी यांनी दिले आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो सध्या तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय निमशासकीय कार्यालयात दिसत नाहीत गेले काही काळापासुन सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसापासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहे असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधीजींचे फोटो व संदेश लावावे जावेत असे आवाहन केले असून या प्रसंगी पाटणचे उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोरडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यासंदर्भातल्या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती द्रोपदी मुर्दौ राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही संबंधित निवेदनामध्ये केलेले आहे.
दरम्यान याबाबत तालुका पातळीवर डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्यघटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पो स्टेशन घोडेगाव ग्रामीणरुग्णालया घोडेगाव रजिस्टर आँफीस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय7 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय7 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय10 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….