singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

सक्षम विद्यार्थी घडवीण्यासाठी अग्रेसर असलेल्या   “नालंदा विद्यालयाचा” स्नेह संमेलन सोहळा उत्साहात साजरा..

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी)-सामर्थ्य हि जीवन है | दुर्बलता मृत्यू…. स्वामी विवेकानंदानी म्हटल्याप्रमाणे आजच्या काळात . शिक्षण असेल तर व्यक्ती सामर्थ्यवान आहे अन्यथा दुर्बल… सामाजिक जाणीवेच्या कार्यातून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देत देशाची सक्षम पिढी बनविण्याचे कार्य करताना आपल्या कार्य शैलीतून मंचर परिसरात नावाजलेली  इंग्लिश माध्यमाची शाळा म्हणून ओळख असलेल्या नालंदा विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले. 

  जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणी शिकत असतो शिक्षण घेत असतो.शिक्षण सांस्कृतिक असेल समाजिक असेल शिक्षणात चौदा विद्या चौसाष्ठ कला अंतरभाव असल्याचे सांगितले जाते.शौक्षणिक कार्यात उत्कृष्ठ गुणवत्तेची ओळख निर्माण करणाऱ्या   मंचर परिसरात नावाजलेली  इंग्लिश माध्यमाची शाळा म्हणून ओळख असलेल्या “नालंदा विद्यालयाचे” स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले.

दरम्यान  यावर्षी नालंदा विद्यालयाच्या स्थापनेला  वीस वर्ष पूर्ण झाली असून यासंबंधित औचित्य साधून “स्नेहसंमेलनाचा नवरस” हा विषय निवडण्यात आला होता. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित नवरस या विषयावर विद्यार्थ्यांनी विवीध नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी माजी सहकारमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, पूर्वाताई वळसे पाटील, पराग कारखान्याचे चेअरमन यशवर्धन डहाके, शरद बँकेचे संचालक अजय घुले, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, सुहास बाणखेले, दत्ता थोरात, अरुणाताई थोरात, मनीषा बेंडे, नालंदा इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल डॉ. करुणा मनुजा, व्हॉईस प्रिन्सिपल सोजी जेकब, शेवाळवाडी सरपंच माधुरी शेटे, एन सी आर टी चे सीईओ अमरजीत खराडे, प्रसिद्ध युट्युबर मंदार पडवळ हे उपस्थित होते. 

यावेळी संस्कार फाउंडेशनच्या वतीने विद्यालयातील चार यशस्वी आणि गुणवंत ,क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला या विद्यार्थ्यांचा सन्मान दिलीप वळसे पाटील आणि पूर्वा ताई वळसे पाटील, अजय घुले, यांच्या हस्ते करण्यात आला माननीय दिलीप वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर करुणा मनुजा यांचे देखील कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आणि व्यवस्थापन विद्यालयाचे समन्वयक सय्यद मुमताज अली यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक महेश देशपांडे तसेच विद्या बांगर आणि रफत काझी यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

Published

on

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर  क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या  आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड  रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची  गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती  वाढीस लागेल  

दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.

Continue Reading

सामाजिक

“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

Published

on

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व  त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी  तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या  रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते

दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.

“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा” 

माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.

Continue Reading

सामाजिक

अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

Published

on

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे  आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.

  आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे  स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार  पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.

दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.

 शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले 

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in