singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

पोखरी येथील वनविभागाचे वतीने “हिरडा महोत्सव “उत्साहात साजरा :”भीमाशंकर परिसरात दहा हजार झाडे लावण्याचे लक्ष”…

Published

on

घोडेगाव दि (नवनाथ फलके)आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी येथील “श्री पंढरीनाथ महाविद्यालयात  “हिरडा महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी आदिवासी भागात यावर्षी दहा हजार वृक्ष लागवड करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे

जुन्नर वनविभागाअंतर्गत घोडेगाव वनपरिक्षेत्राच्या वतीन पेसा क्षेत्रातील दहा हजारांहून अधिक झाडाची रोपे आदिवासी शेतकऱ्यांना मोफत देण्यात आली,यात हिराड्या सोबत बांबू,काजू, जांभूळ, साग आदी झाडांची रोपे देखील वाटण्यात आली. आगामी काळात भीमाशंकर अभयारण्य परिसरात पर्यावरण संवर्धन, शाश्वत शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सशक्तीकरणाच्या दिशेने हे अत्यंत महत्वाचे पाऊल समजले जात आहे

या कार्यक्रमाचे प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले कि , निसर्गातील बदलांमुळे शेतकऱ्यांवर दरवर्षी वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पारंपरिक व पर्यावरणपूरक उत्पन्न स्रोतांकडे वळणे गरजेचे आहे. हिरडा, स्टॉबेरी, यासारख्या वनउपजांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावं, जेणेकरून कमी जोखमीच्या मार्गातून अधिक उत्पन्न मिळवता येईल. याआधी हिरड्याच्या नुकसानीबद्दल १४ कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली होती, हे समाधानकारक आहे. वनउपज वस्तू विक्रीसाठी लागणाऱ्या परवानगी सुलभ करण्यासाठी वनविभागाने स्वतंत्र यंत्रणा राबावावी, जेणेकरून दलालांचा हस्तक्षेप न होता थेट शेतकऱ्यांच्या हातात मोबदला पोहोचू शकेल,

त्याचप्रमाणे या उपक्रमामुळे वन्यप्राणी-मानव संघर्ष कमी करण्यास मदत होईलच, पण त्याचबरोबर गावांच्या विकासाला एक नवा पर्यावरणपूरक दृष्टिकोन मिळेल. वनविभागाच्या सहकार्याने आणि स्थानिक लोकसहभागातून अशा उपक्रमांचा विस्तार करणे ही काळाची गरज आहे. ‘हिरडा महोत्सव हा  फक्त रोपे वाटपाचा कार्यक्रम नसून, तो ग्रामीण समृद्धीकडे नेणाऱ्या बदलाची सुरुवात आहे, 

दरम्यान या कार्यक्रमास आदिवासी भागातील कोंढवळ, राजापूर, तळेघर, जांभोरी, चिखली, पोखरी, राजेवाडी, गोहे, उगलेवाडी, चपटेवाडी, फुलावडे, बोरघर, अडीवरे, तिरपाड आदी गावाचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य  ग्रामसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, अमोल सातपुते, प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई, सहायक उपवनसंरक्षक अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, विकास भोसले तसेच समाज कल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, संजय गवारी, विष्णुकाका हिंगे, प्रकाश घोलप, निलेश थोरात, प्रविण पारधी, जनाबाई उगले, इंदुबाई लोहकरे, नंदकुमार सोनावळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले ग्रामसेवक सुनिल पारधी निलेश बो-हाडे, बाळासाहेब कोळप, अमोल अंकुश, गौतम खरात, सलिम तांबोळी, अशोक गभाले, बुधाजी डामसे, प्राचार्य शशिकांत साळवे, सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार , गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे व इतर ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

घोडेगावच्या न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची “कु.दुर्गा आवटे” वक्तृत्व स्पर्धेत उत्तर पुणे जिल्ह्यात प्रथम…

Published

on

घोडेगाव दि. (प्रतिनिधी) रा. प. सबनीस मेमोरियल नारायणगाव ता जुन्नर यांच्या वतीने  घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल ची दुर्गा आवटे हिने प्रथम क्रमांक पटकविला

  उत्तर पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील इंग्लिश मीडियम शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नारायणगाव येथील अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात येणाऱ्या आलेल्या  इंग्लिश  भाषा वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयातील कु. दूर्वा सुहास आवटे(इ.७वी)  या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून 5000 रुपये रोख प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह असे बक्षीस पटकावले.

दरम्यान याच गटातून इयत्ता कु. समृद्धी दत्तात्रय डुकरे तिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. या विद्यार्थिनीला प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह व २००० रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता आठवी ते दहावी या गटात कुमारी अनुष्का वसंत लांगी या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. ही विद्यार्थिनी प्रशस्तीपत्रक मानचिन्ह व ३०००हजार रुपये रोख अशा बक्षिसाची मानकरी ठरली.

या स्पर्धेत खेड,आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील एकूण ४० इंग्लिश मिडीयम शाळांच्या  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . पाचवी ते सातवी या गटात दोन व इयत्ता आठवी ते दहावी या गटात दोन विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये  या विद्यालयातील विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला. त्यांना इंग्रजी विषय शिक्षिका  सौ .सोनीका नायकोडी , सौ. स्मिता पवळे व सौ. मोनिका भालेराव यांनी मार्गदर्शन केले. 

दरम्यान विद्यार्थिनींच्या या उत्तुंग यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष  तुकाराम  काळे, उपाध्यक्ष   संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश  काळे, संस्थेचे सचिव  विश्वास काळे, जॉईंट सेक्रेटरी  प्रशांत  काळे, संस्थेचे खजिनदार सोमनाथ काळे, विद्यालयाचे चेअरमन  बाळासाहेब काळे, वस्तीगृह कमिटीचे चेअरमन सूर्यकांत गांधी समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, संस्थेचे संचालक अजित काळे,  वैभव काळे व  अक्षय काळे तसेच जगदीश चंद्र महिंद्रा हायस्कूल विद्यालयाचे अध्यक्ष रामदास घोलप, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसूजा, उपप्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका सौ वंदना वायकर यांनी अभिनंदन केले . 

Continue Reading

सामाजिक

गोवर्धन” च्या उत्कर्षांसाठी अहोरात्र झगडाणारा सक्षम तारा… “प्रीतमभाई शाह”

Published

on

मंचर दि. (संजय कोकणे )कोणतीही संस्था अथवा संघटन उत्कृष्टपणे चालण्यासाठी एका सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. संघटनाच्या अंतर्गत असणाऱ्या बारीक सारीक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून कंपनीचे उत्कर्षांचा ध्यास उरी बाळगून रात्रौदिवस देह भान विसरून काम करणारा गोवर्धन च्या कोंदनातील तारा…. गोवर्धन चे  व्यवस्थापकीय संचालक प्रीतम शाह…

  “प्रीतम शाह आपले थोरले बंधू देवेंद्र शाह सोबत”

शासनाकडून सुरु असलेल्या खाडा पद्धतीमुळे शेतकरी राजाच्या रस्त्यावर टाकले जाणाऱ्या दूधाला योग्य भाव मिळावा व त्याची आर्थिक स्थिती संपन्न व्हावी या् उद्देशाने पुणे जिल्ह्यातील मंचर सारख्या छोट्याशा गावातून कंपनीचे चेअरमन देवेंद्र शाह यांच्या संकल्पनेतून यांच्या सुमारे १९९२ सुमारास सुरु करण्यात आलेल्या “पराग मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट” या कंपनीने गगन भरारी घेत एका मोठ्या जागतिक दर्जाच्या कार्पोरेट कंपनीमध्ये रूपांतर झाले आहे. पराग मिल्क फूड्स हि देशातच नव्हे तर जगाच्या बाजारपेठेत एक लोकप्रिय ब्रँड झाला आहे. आज भारतासह जगातील विविध देशामध्ये ” गोवर्धन घी, गो चीझ, प्राईड ऑफ काउ,आवतार प्रोटीन पावडर आदी नावाने अनेक उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली असून गोवर्धन ब्रँड जगभरातील ग्राहकांचा विश्वासाला पात्र ठरला आहे.

दरम्यान आज हजारे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करत कसलेली पराग मिल्क फूड्स म्हणजेच गोवर्धन डेअरी प्रगतीच्या शिखरावर पोहचण्याचे कारण म्हणजे आपले थोरले बंधू देवेंद्र शाह यांच्या खांद्याला खांदा लावून एकदिलाने एकविचारणे व संपूर्ण समर्पण भावनेने कंपनीच्या उत्कर्षांसाठी व विकासासाठी दिवस रात्र एक करून काम करणारे  कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक, ज्यांनी डोळ्यांत तेल घालून कंपनीच्या उत्कर्षांसाठी एकाग्रतेने व प्रमाणिक पणे  काम केले त्यामुळेच आज  गोवर्धन कंपनी जगाच्या बाजार पेठेत खंबीरपणे पाय रोवून आकाशी पुन्हा गरुड झेप घेण्यासाठी उभी आहे. 

पराग मिल्क फूड्स या कंपनीच्या स्थापनेपासून आज पर्यंत अनेक स्थित्यंतरे आली अनेक आव्हाने उभी राहिली परंतू अशा वेळी प्रीतम यांनी  कंपनीचे चेअरमन यांच्या  सोबतीला खंबीर पणे उभे राहून येणाऱ्या सर्व आव्हाणांना सक्षमपणे तोंड दिले वर कंपनीच्या यशासाठी सदोदित प्रयत्न केले म्हणूनच मागील पस्तीस वर्षापूर्वी सुरु असलेल्या  खडा पद्धतीचे दूध घेऊन कारभार करणारी पराग डेअरी आज मोठा वटवृक्ष झाली असून या कंपनीला  यशाच्या शिखरावर नेण्यासाठी या कंपनीच्या यशाच्या राज मुकूटातील दैदिप्यमान रत्न म्हणजेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम शाह होत हे नाकरता येणार नाही त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना मंगलमय लक्ष लक्ष शुभेच्छा…..

Continue Reading

सामाजिक

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५o व्या जयंती निमित्त मंचर येथे “रण फॉर युनिटी” स्पर्धेचे आयोजन

Published

on

मंचर दि.31 (प्रतिनिधी) :  सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५० वी जयंती निमित्त देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आपल्या समर्पणाला प्रोत्साहन व बळकटी देण्यासाठी  मंचर पोलीस स्टेशनच्यावतीने रन फॉर युनिटी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

देशाचे लोहपुरुष  व स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्रीसरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मंचर येथे आयोजित  करण्यात आलेल्या रन फॉर युनिटी या कार्यक्रमांतर्गत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मंचर पोलीस स्टेशनचे 05  पोलीस अधिकारी, 40 पोलीस अंमलदार, आळेफाटा महामार्ग सुरक्षा पथकाचे 10 अंमलदार मंचर शहरातील तीन पोलीस भरती अकॅडमी यांचे 150 विद्यार्थी तसेच मंचर शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर लोकांनी सहभाग घेतला होता. 

दरम्यान सदर मॅरेथाॅन स्पर्धा महिला गट व पुरुष गट असे दोन गटात आयोजीत करण्यात आली होती. महिलांसाठी तीन किलोमीटर तर पुरुषांसाठी पाच किलोमीटर असे अंतर निर्धारित करण्यात आले होते सदर स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथून सुरु होऊन ते भिमाशंकर आयुर्वेदीक महाविद्यालय वडगाव काशिंबेग ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर अशी घेण्यात आली

त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक – कु.सचिन भारद्धाज ,द्वितीय क्रमांक – कु. तुषार  योगराज कोनरे , तृतीय क्रमांक – कु ऋषभ कैलास निसाळ यांनी पटकवला. तसेच सदर स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये प्रथम क्रमांक – कु.आर्या मनोज डोक, द्वितीय क्रमांक – कु.स्वरा संजय गाडे, तृतीय क्रमांक – कु शर्वरी प्रकाश थोरात यांनी पटकविला विजयी स्पर्धकांना  मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान चिन्ह, मेडल तसेच प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

         त्याचप्रमाणे रन वे स्पर्धेत सहभाग घेतलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा पैकी प्रथम क्रमांक – श्री.यशवंत यादव, (पोलीस उपनिरीक्षक मंचर पोलीस स्टेशन,), द्वितीय क्रमांक -श्री.विनोद जांभळे, पोहवा (मंचर पोलीस स्टेशन) तृतीय क्रमांक,- रूपाली मिंढे (महिला पोलीस अंमलदार मंचर पोलीस स्टेशन) यांना देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. असल्याची माहिती मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी बोभाटा न्यूज शी बोलताना सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK