गावागावातुन
घोडेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी कपिल सोमवंशी

आंबेगाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या घोगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी अनेक वर्षांपासून सर्व पक्षात चढाओढ असते कारण या तालुक्यातील पश्चिम पट्ट्यावरील राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी ही ग्रामपंचायत महत्वाची भूमिका बजावते असे म्हणणे वावगे ठरणार नाही त्यामुळे तालुक्यातील सर्वच पक्ष ही ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात

दरम्यान घोडेगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच सोमनाथ काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच कोण होणार? याची उत्सुकता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे चर्चांना उत आला होता यावेळी घोडेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पद शिवसेनेकडे जातील असेही बोलले जात होते परंतु अनेक जाणकारांचे राजकीय निरीक्षण खोटे ठरवीत घोडेगाव मध्ये ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व आबादीत ठेवले

दरम्यान २२/२/२०२४ रोजी ग्रामपंचायत घोडेगाव येथे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी या दोन पक्षामध्ये वार्ड क्रमांक १ चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कपिल गुलाब सोमवंशी यांना एकूण सदस्यामधून ११मते पडली तर शिवसेना (शिंदे) गटाचे ग्रामपंचायत सदस्य मनोज काळे यांना एकूण ७ मते पडली असून यामध्ये कपिल सोमवंशी हे उपसरपंच पदासाठी विजयी झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनीताई तिटकारे यांनी जाहीर केले आहे.

परंतु निवडणुक प्रक्रिया चालू असताना १२.३० वाजे पर्यंत माघार घेण्याची वेळ असताना उमेदवारी साठी अर्ज भरणारे स्वप्नील घोडेकर यांनी १२.३६ वाजता अर्ज माघारी घेतला. यावरून शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला असून यासंदर्भात तक्रारी अर्ज दिल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घोडेकर यांच्याकडून बोलल जात आहे. उपसरपंच कपिल सोमवंशी यांची घोडेगाव मध्ये घोडेगाव गावच्या विकासाची काय ध्येय धोरणे राहणार आहेत. व सध्या सुरू असलेला मारुती मंदिरा शेजारील अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न करणार की अतिक्रमण धारकाला मदत करणार याबाबत घोडेगावचे नागरिक चर्चा करत आहेत.
गावागावातुन
मंचर शहरात बैलपोळा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा: मोरडे व लोंढे यांच्या बैलजोडीने पटकविला प्रथम क्रमांक.!!!

मंचर दि (प्रतिनिधी) येथे प्रती वर्षी प्रमाणे याही वर्षी भाद्रपद महिन्यातील बैलपोळा उत्सव पारंपारीक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

शेतकत्यांच्या सर्व सुख दुःखात सदैव सहभागी असणाऱ्या सर्जा राजा च्या अनंत उपकारातून उताराई होण्यासाठी शेतकरी प्रतीवर्षी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो काही ठिकाणी हा श्रावण पोळा साजरा केला जातो तर परंतु मंचर येथे भाद्रपद पोळा साजरा केला जातो या निमित्ताने मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंचर निघोटवाडी शेवाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य बैलपोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात तळी भंडार करून बळीराज्याने मिठ्या आनंदाने बैलपोळा महोत्सवाला सुरुवात करण्यात केली. त्याचप्रमाणे सायंकाळी पारंपरिक वाद्याच्या गजरात डीजेच्या तालावर भंडाराची उधळण करत बैलांना आकर्षक सजवून त्यांची मिरवणूक मंचर शहरात काढण्यात आली. मंचर येथील शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातून नव्याने निवड झालेल्या बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आली
याप्रसंगी गोवर्धन उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा, माजी पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले, लाला अर्बन बँकेचे चेअरमन युवराज बाणखेले,यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्ता थोरात, आंबेगाव तालुका कुंभार समाज अध्यक्ष राजू सोमवंशी,मंचर नगरपंचायतचे अधिकारी वरद थोरात, निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट, शेवाळवाडीचे सरपंच निलेश थोरात,API बडगुजर, सुरेशआण्णा निघोट, बैलगाडा संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबाजी थोरात, प्रवीण मोरडे, लक्ष्मण थोरात ,बाजीराव मोरडे,जगदीश घिसे, बाबू बोऱ्हाडे, जेके थोरात , केके थोरात, इ.उपस्थित होते.

दरम्यान यावेळी आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्हे देऊन शेतकरी वर्गाचा सन्मान करण्यात आला यात शिस्तबद्ध मिरवणूक सुंदर व आकर्षक बैलजोडी चे नंबर काढण्यात आले.प्रथम क्रमांक दत्तात्रय शंकर मोरडे आणि महादू त्र्यंबक लोंढे . द्वितीय क्रमांक – संजय विठ्ठल निघोट आणि राजवीर नितीन थोरात विघ्नहर्ता प्रतिष्ठान मंचर. तृतीय क्रमांक- ज्ञानेश्वर सोपान निघोट आणि विठ्ठल मारुती पाचपुते चतुर्थ क्रमांक – भिकाजी मोरडे आणि भानुदास बाणखेले पाचवा क्रमांक- गणेश अनंता खानदेशे आणि सिताराम मथाजी लोंढे त्यांना रोख बक्षिसे आणि भव्य ट्रॉफी देण्यात आली. प्रत्येक सहभागी बैल जोडीला उत्तेजनार्थ भव्य ट्रॉफी देण्यात आली.
बैलपोळा महोत्सवाचे आयोजन समस्त ग्रामस्थ मंचर शहर निघोटवाडी शेवाळवाडी यांनी केले तर बैलपोळ्याचे उत्तम नियोजन धर्मवीर चंद्रशेखरआण्णा बाणखेले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास बाणखेले, ग्रामपंचायतचे माजी सदस्य वसंतराव बाणखेले, लोकनेते किसनराव बाणखेले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक उपाध्यक्ष गणेश खानदेशे,बैलगाडा संघटनेचे सचिव सागर पाचपुते यांनी केले.
गावागावातुन
“गुड्डी” नामक कुत्री मुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले शेतकऱ्याचे “प्राण”

मंचर दि. (प्रतिनिधी)”म्हणतात ना.. कुत्रा हा सर्वात प्रामाणिक व इनामदार प्राणी आहे.या वाक्याचा प्रत्यय काल लाखगाव (ता आंबेगाव) येथील एका शेतकऱ्याला आला.येथील “गुड्डी” नावाच्या कुत्रीच्या सावधानतेमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून हनुमंत टाके शेतकऱ्यांचे प्राण वाचले.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि आंबेगाव तालुक्यातील लाखगाव येथील गव्हाळीमळा या वस्तीवर राहणारे हनुमंत नारायण टाके (वय ४२ वर्षे) हे शेतकरी पहाटे चार वाजताच्या सुमारास लघुशंख्येसाठी घराबाहेर आले होते यावेळी त्यांच्या सोबत त्यांची गुड्डी नावाची कुत्री देखील होती. या वेळी या परिसरात सावजासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकरी हनुमंत टाके यांच्या अंगावर झेप घेतली व त्यांच्या मानेला धरण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी यांच्या सावधनतेमुळे बिबटयाने माने ऐवजी शेतकरी यांचा दंड पकडला. यात शेतकरी खाली जमिनीवर पडले

दरम्यान बिबट्यासोबत झालेल्या् झटापटीत बिबट्याच्या जबड्यातून शेतकरी टाके यांचा हात सुटला. तद नंतर बिबट्याने पुन्हा शेतकरी हनुमंत टाके यांच्या पायाला पकडून ओढुन नेण्यास सुरुवात केली असता जवळच असलेली त्यांची पाळीव कुत्री “गुड्डी” हिने जीवाची तमाम न बाळगता बिबट्यावर हल्ला करून बिबट्याला चावा घेऊन ओढण्यास सुरुवात केली. याच वेळी शेतकरी यांची पत्नी हिने दरवाज्यातून तर घरातील लहान मुलांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केल्याने बिबट्या तेथून पसार झाला. अशा प्रकारे मृत्युच्या दाढेतून “गुड्डी” नावाच्या या कुत्रीने आपल्या मालकाचे “प्राण” वाचऊन, या प्राण्याने “कुत्रा” च खरा इनामी प्राणी असल्याचे पुन्हा सिद्ध केले.

बिबट्याचे मानवी हल्ले थांबविण्याच्या उपाय योजना करा”
गेल्या काही वर्षापासुन जुन्नर वन परीक्षेत्रात बिबट्यांची संख्या सातात्याने वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या सर्व भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. साधारण पणे जंगलात जर एखाद्या प्राण्याने अनेक पिलांना जन्म दिल्या नंतर त्यातील अनेक पिले काहीना काही करणास्तव जगत नाहीत.
परंतु उसाच्या शेतात या पिलांना बिबट्याने जन्म दिल्या नंतर त्यांची सर्वच्या सर्व पिले जगतात त्यामुळे त्यांची जनन प्रमाण वाढले आहे. यामुळे थोड्याच कालावधित बिबट्याची संख्या वाढत चालली आहे. परंतु त्याच प्रमाणात त्यांच्या भक्षकांची संख्या झापाट्याने कामीही होत आहे त्यामुळे बिबट्यांचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी तसेच मानवी हल्ले रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
गावागावातुन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने दुध दरवाढीसाठी मंचर येथे मोर्चा व धरणे आंदोलन,’ आंदोलनास सर्वस्थरातून उत्स्फूर्त पाठिंबा

मंचर दि.६ (प्रतिनिधी) – दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा व पशुखाद्याचे भाव कमी करावेत या मागणीसाठी आंबेगाव तालुका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ मंचर (ता. आंबेगाव) येथे धरणे व मोर्चा आंदोलन करण्यात आले.

दोन वर्षांपासून दुधाचे भाव दिवसेंदिवस कमी झालेले आहेत भाव यामुळे दुधाउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे त्यात केंद्रसरकारने दुधपावडरनिर्यातकरण्याऐवजी दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे . महाराष्ट्र वगळतागुजरात सह इतर राज्यात दुधाला ३२ ते ३५ रुपये इतका प्रती लिटर इतका भाव आहे. तर महाराष्ट्रात मात्र ३.५ व ८.५ प्रतिच्या दुधास २६ रुपये पेक्षाही कमी भाव मिळत आहे. अशातच दिवसेंदिवस पशुखाद्याचे भाव वाढत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तरीही शासन शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी कोणतेही ठोस उचलण्या ऐवजी महाराष्ट्र सरकार फक्त घोषणा करीत मार्केटिंग करण्यात व्यस्त आहे. अशा सरकारला जाग आणण्यासाठी आंबेगाव तालुका शिवसेना(उद्धव ठाकरे) पक्षाचे वतीने हे धरणे आंदोलन व मंचर शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनास शेताकार्यासामावेत विविध स्तरातून नागरिकांकडून प्रचंड प्रमाणावर पाठिंबा मिळाला.
शेतकरीविरोधात काम करतअसल्याच्या घोषणा देत आंदोलकांनी महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ मंचर येथील बाजार समिती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा चे आयोजन करण्यात आले . यावेळी प्रचंड संख्येने सहभागी होत शिवसैनिक ,दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणा देत मोर्चासह आज आंदोलन केले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ भोर, जिल्हा संघटक राजाराम बाणखेले , जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड घोषणाबाजी करत दुधाला दरवाढ मिळावी म्हणून धरणे आंदोलन केले, यावेळी सुरेश भोर, राजाराम बाणखेले, माऊली खंडागळे यांनी शासनाची लीटर ला पाच रुपये दरवाढ फसवी असल्याचा आरोप करीत, दुधाला ४० रु.भाव मिळावा अन्यथा पुढील काळात मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालून मंत्रालयात आंदोलन करु असा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी ऊपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे, तालुका प्रमुख गणेश जामदार, तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे,ऊपतालुकाप्रमुख भरतशेठ मोरे, सचिनशेठ निघोट, नितीन भालेराव,युवा सेना ऊपजिल्हाप्रमुख प्रसन्ना लोखंडे, युवा सेना तालुका प्रमुख विवेक पिंगळे, घोडेगाव शहरप्रमुख नंदकुमार बोर्हाडे, मंचर शहरप्रमुख विकास जाधव, महिला आघाडी ऊपतालुकाप्रमुख चंद्रकला पिंगळे, मा जि प सदस्य प्रज्ञा भोर, विभागप्रमुख माऊली पाटील, सचिन लबडे, भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रा अनिल निघोट,शेतकरी सेना तालुका प्रमुख डी वाय खानदेशे, युवा सेना ऊपतालुका प्रमुख हेमंत एरंडे, अरुण बाणखेले,महेश घोडके, खादी ग्रामोद्योग उपाध्यक्ष विजय जाधव,विनोद घुले,अदिल सय्यद,सखावत मिर्झा, कमल अली मणियार , अमोल बाणखेले व शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार बाजार समिती संचालक मयुरी भोर यांनी मानले
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय10 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय10 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय12 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….