Connect with us

शैक्षणिक

घोडेगाव येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कुलचा विद्यार्थी “सत्यम वाघमारे” राज्यस्तरीय मंथन स्पर्धेत चा  राज्य गुणवत्ता यादीत

Published

on

*घोडेगाव:- येथील न्यू इंग्लिश  मेडियम स्कुल चा विद्यार्थी कु.सत्यम वाघमारे याने राज्यस्तरीय मंथन परीक्षेत  गुणवता यादीत  स्थान पटकावले असून सर्वत्र त्याचे अभिनंदन केले जात आहे.

माहे फेब्रुवारी मध्ये  राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा   घेण्यात आली होती. या परीक्षेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव विद्यालयातील इयत्ता सहावी मध्ये शिकणारा सत्यम मोहन वाघमारे हा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चौथा आलेला आहे.

 सत्यम याने परीक्षेत ३०० पैकी एकूण २७२ गुण मिळवले. मंथन परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत झळकणारा विद्यालयाचा  तो पहिलाच विद्यार्थी आहे.सत्यम वाघमारे हा विद्यालयातील अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी आहे. 

दरवर्षी तो विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होतो व उत्तुंग यश संपादन करतो. नुकत्याच झालेल्या नॅशनल स्कॉलर सर्च  परीक्षेत देखील त्याने राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशस्वी वाटचालीमुळे विद्यालयामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सत्यम हा अत्यंत अभ्यासू असून विविध स्पर्धा परीक्षा देण्यामध्ये त्याला रस आहे. त्याची आई सौ. अर्चना वाघमारे या स्वतः त्याला सतत मार्गदर्शन करत असतात. सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन देखील त्याला लाभत असते. 

कु. सत्यमच्या या ऐतिहासिक यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष श्री शाम शेठ होनराव, कार्याध्यक्ष श्री राजेश काळे, संस्थेचे सेक्रेटरी श्री अक्षय काळे, विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, सल्लागार तसेच विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा  डिसोझा,प्राचार्या श्रीमती रेखा आवारी, पर्यवेक्षिका सौ.वंदना वायकर सत्यमच्या वर्गशिक्षिका सौ. दीपा उजागरे , सर्व विषय शिक्षक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य यांनी कौतुक करून त्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तसेच त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान यावेळी सत्यांचे कौतुक करताना, अभ्यासातील सातत्य, अवांतर वाचन, एकाग्रता व ध्येय निश्चिती यामुळे आपण आपल्या जीवनात यश संपादन करू शकतो  असे मत विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे यांनी व्यक्त केले .जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.


Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

शैक्षणिक

जागतिक युवा दिनानिमित्त घोडेगाव येथे  “उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम” संपन्न….

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी) पासून जवळच असलेल्या  गोणवडी (ता.आंबेगाव) येथे क्रांतिकारी होन्याजी केंगले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घोडेगाव (गोनवडी) आयोजित जागतिक युवा दिनानिमित्त “उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम” पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

जागतिक युवा दिनांनिमित्त घोडेगाव  येथील आय टी आय येथे  औद्योगिक प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रन्मात व्यवसाय उद्योगाच्या निर्मितीसाठी तसेच वाढीसंदर्भात विविध माहिती देण्यात आली.

दरम्यान यावेळी शिरुर लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिनभाऊ भोर, माजी उपसभापती संतोषशेठ भोर, बाजार समिती संचालक सोमनाथ काळे, हेमंत केंगले (अध्यक्ष, स्मारक प्रतिष्ठान),श्री विलास कडलग (मा.अध्यक्ष जुन्नर रोटरी क्लब), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले सुनिल गिरंगे विलास केंगले सुरेश केंगले मारुती केंगले भिमा केंगले किसन शेळके नामदेव भोकटे श्री निलेश पोखरकर (सहाय्यक शास्रज्ञ, आयुका केंद्र गिरवली), प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Continue Reading

शैक्षणिक

मंचरच्या महात्मा गांधी विद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी!!!  

Published

on

मंचरदि (प्रतिनिधी) आपल्या कृतीतून जण माणसाला स्वच्छतेचा संदेश देणारे व कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवरती परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या आसूडाचे जोरदार फटके मारणारे थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मंचर येथे श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या  प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुरेखा भांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक यादव चासकर, डॉ.मनाली बाणखेले,अशरफ पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

दरम्यान यावेळी आपले मत व्यक्त करताना प्राचार्य सुरेखा भांबरे यांनी सांगितले कि संत गाडगे महाराज यांचे विचार आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये अमलात आणले  पाहिजेत असे मत व्यक्त करीत सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, आपला परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे; आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे,असे केले तरच गाडगे महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणले जातील असे मत विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका भांगरे यांनी मांडले.

दरम्यान संत गाडगे बाबांचा आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचा खूप जवळचा स्नेह होता याची आठवणही भांबरे यांनी करून दिली यावेळी आदिबा आतार, माईजा तिरंदाज, गौरी जगताप, अपेक्षा लोंढे, हर्षदा निघोट,आर्या कंधारे, साक्षी देवकर,हिना खान आदी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून संत गाडगे महाराज यांचे विचार मांडले.

यावेळी .कार्यक्रमाचे नियोजन प्रियंका गवळी,प्रलय गावंड, दत्तात्रेय चासकर,संतोष मुंढे,किसन थोरात,मारुती बोराडे यांनी केले.दिलीप चौधरी यांनी फलक लेखन केले.सूत्रसंचालन महिमा रोडे हिने केले तर प्रांजल बढे या विद्यार्थिनीने आभार मानले.

Continue Reading

शैक्षणिक

ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेत “देविकाने” द्वितीय तर “पृथ्वीराजने ” तिसरा क्रमांक पटकावीत मिळविले नेत्रदीपक यश…

Published

on

घोडेगाव दि. (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश मेडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांनी ऑलम्पिक ॲथेटीक्स स्पर्धेत विविध खेळात भाग घेऊन या उपक्रमात नेत्रदीपक यश मिळविले.

सकाळ समूहामार्फत सनस ग्राउंड पुणे येथे घेण्यात आलेल्या स्कूल ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेत घोडेगाव(ता. आंबेगाव ) येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यालयातील विद्यार्थिनी देविका संदीप काळे हिने थाळीफेक खेळात  द्वितीय क्रमांक मिळवला तर येथील विद्यार्थी  पृथ्वीराज जितेंद्र खोसे इयत्ता 10 वी याने भलाफेक खेळात  तृतीय क्रमांक मिळवला.

दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध खेळात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल  आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळचे अध्यक्ष उपाध्यक्ष व  सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थांनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending