Connect with us

शैक्षणिक

शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगावची स्नेहल व ओम राज्य गुणवत्ता यादीत

Published

on

घोडेगाव दि – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगाव येथील  कु. स्नेहल दत्तात्रय डुकरे या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत २२ वे तर कु. ओम रवींद्र मेहेर या विद्यार्थ्याने राज्य गुणवत्ता यादीत २६ वे स्थान प्राप्त केले आहे.

 

नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादीत  राज्य व जिल्हा गुणवत्ता यादी इंग्लिश मीडियम स्कूलच्या एकूण १४ विद्यार्थ्यांनी राज्य तथा जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवी मध्ये  एकूण ९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. 

त्यामध्ये कु.रिया योगेश वाघमारे(J-100), कु. रुची रावसाहेब लोहोट(J-161), कु. श्रेयस संजय बोनावटे(J-269), कु.ओजस शांताराम पाटील(J-289), कु. पूर्वी संजय शिंदे(J-308), कु. शाफीन समीर मुजावर(J-313), कु. ऋतिका दीपक घोडेकर(J-340), कु. श्रद्धा राजेंद्र लोहोट(J-342), कु. सेजल राजेश खिंवंसरा(J-523)या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून जिल्हा यादीत स्थान पटकावले. तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्यामध्ये कु.समृद्धी दत्तात्रय डुकरे (J-93)  कु.स्वरा सिद्धराज बोराडे(J178), कु. सक्षम अनिल घोडेकर(J-577) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  

या वेळी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या स्कूलच्या आदर्श प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसूजा, उपप्राचार्या रेखा आवारी, शिक्षिका सौ ज्योती जाधव, सौ सोनीका नायकोडी, सौ प्रज्ञा घोडेकर, श्रीमती सुप्रिया मंडलिक, सौ सुषमा फलके श्रीमती सुषमा भोर, श्री. संतान आसंगी , सौ प्रज्ञा बारवे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. तुकाराम नामदेवराव काळे, उपाध्यक्ष मा. एडवोकेट श्री. संजय दत्तात्रय आर्वीकर,संस्थेचे  कार्याध्यक्ष श्री. सुरेश शेठ गजानन शेठ काळे, संस्थेचे मानद सचिव माननीय श्री विश्वासराव अरविंद काळे, सहसचिव श्री प्रशांत बाळासाहेब काळे, वसतिगृह कमिटीचे चेअरमन माननीय श्री. सूर्यकांत फुलचंद गांधी,संस्थेचे खजिनदार माननीय श्री सोमनाथ भाऊ वसंतराव काळे, विद्यालयाचे चेअरमन  माननीय श्री बाळासाहेब काशिनाथ काळे, संस्थेच्या समन्वय समितीचे चेअरमन श्री राजेश कैलास शेठ काळे,संस्थेचे संचालक श्री अजित दत्तात्रय काळे श्री अक्षय रामशेठ काळे श्री वैभव बबनराव काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

शैक्षणिक

जागतिक युवा दिनानिमित्त घोडेगाव येथे  “उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम” संपन्न….

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी) पासून जवळच असलेल्या  गोणवडी (ता.आंबेगाव) येथे क्रांतिकारी होन्याजी केंगले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घोडेगाव (गोनवडी) आयोजित जागतिक युवा दिनानिमित्त “उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम” पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

जागतिक युवा दिनांनिमित्त घोडेगाव  येथील आय टी आय येथे  औद्योगिक प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रन्मात व्यवसाय उद्योगाच्या निर्मितीसाठी तसेच वाढीसंदर्भात विविध माहिती देण्यात आली.

दरम्यान यावेळी शिरुर लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिनभाऊ भोर, माजी उपसभापती संतोषशेठ भोर, बाजार समिती संचालक सोमनाथ काळे, हेमंत केंगले (अध्यक्ष, स्मारक प्रतिष्ठान),श्री विलास कडलग (मा.अध्यक्ष जुन्नर रोटरी क्लब), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले सुनिल गिरंगे विलास केंगले सुरेश केंगले मारुती केंगले भिमा केंगले किसन शेळके नामदेव भोकटे श्री निलेश पोखरकर (सहाय्यक शास्रज्ञ, आयुका केंद्र गिरवली), प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Continue Reading

शैक्षणिक

मंचरच्या महात्मा गांधी विद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी!!!  

Published

on

मंचरदि (प्रतिनिधी) आपल्या कृतीतून जण माणसाला स्वच्छतेचा संदेश देणारे व कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवरती परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या आसूडाचे जोरदार फटके मारणारे थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मंचर येथे श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या  प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुरेखा भांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक यादव चासकर, डॉ.मनाली बाणखेले,अशरफ पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

दरम्यान यावेळी आपले मत व्यक्त करताना प्राचार्य सुरेखा भांबरे यांनी सांगितले कि संत गाडगे महाराज यांचे विचार आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये अमलात आणले  पाहिजेत असे मत व्यक्त करीत सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, आपला परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे; आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे,असे केले तरच गाडगे महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणले जातील असे मत विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका भांगरे यांनी मांडले.

दरम्यान संत गाडगे बाबांचा आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचा खूप जवळचा स्नेह होता याची आठवणही भांबरे यांनी करून दिली यावेळी आदिबा आतार, माईजा तिरंदाज, गौरी जगताप, अपेक्षा लोंढे, हर्षदा निघोट,आर्या कंधारे, साक्षी देवकर,हिना खान आदी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून संत गाडगे महाराज यांचे विचार मांडले.

यावेळी .कार्यक्रमाचे नियोजन प्रियंका गवळी,प्रलय गावंड, दत्तात्रेय चासकर,संतोष मुंढे,किसन थोरात,मारुती बोराडे यांनी केले.दिलीप चौधरी यांनी फलक लेखन केले.सूत्रसंचालन महिमा रोडे हिने केले तर प्रांजल बढे या विद्यार्थिनीने आभार मानले.

Continue Reading

शैक्षणिक

ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेत “देविकाने” द्वितीय तर “पृथ्वीराजने ” तिसरा क्रमांक पटकावीत मिळविले नेत्रदीपक यश…

Published

on

घोडेगाव दि. (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश मेडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांनी ऑलम्पिक ॲथेटीक्स स्पर्धेत विविध खेळात भाग घेऊन या उपक्रमात नेत्रदीपक यश मिळविले.

सकाळ समूहामार्फत सनस ग्राउंड पुणे येथे घेण्यात आलेल्या स्कूल ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेत घोडेगाव(ता. आंबेगाव ) येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यालयातील विद्यार्थिनी देविका संदीप काळे हिने थाळीफेक खेळात  द्वितीय क्रमांक मिळवला तर येथील विद्यार्थी  पृथ्वीराज जितेंद्र खोसे इयत्ता 10 वी याने भलाफेक खेळात  तृतीय क्रमांक मिळवला.

दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध खेळात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल  आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळचे अध्यक्ष उपाध्यक्ष व  सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थांनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending