सामाजिक
आंबेगावचा फुललेला “वसंत”…काळाच्या पडद्याआड…..! -जेष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव यांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे दि -(प्रतिनिधी)जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा प्रशासक काळ संपून मार्च 1992 मध्ये निवडणुका झाल्या. वसंतराव भागुजी भालेराव, बीएससी ऍग्री झालेला हा युवक आंबेगाव पंचायत समितीचा सभापती झाला. या दरम्यान मी ‘लोकसत्ता’ चा बातमीदार होतो. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य अशी एकत्र मिळून पंचायत समिती होती. आज आमदारांना विकास कामांचे अधिकार एकवटले आहे. त्यावेळी पंचायत राज व्यवस्थेमध्ये आमदारांपेक्षाही किंबहुना थोडे जादा अधिकार पंचायत समिती सभापतींना होते. वसंतराव सभापती असले तरी त्यांच्यापुढे तगडे विरोधक त्यावेळी होते. सभापती हे जिल्हा परिषदेचे देखील पदसिद्ध सदस्य असल्याने त्याकाळी वसंतराव हे उच्चशिक्षित आणि मुद्देसूद मांडणी यामुळे सभागृहात ते लक्षवेधी ठरवायचे.
आंबेगाव पंचायत समितीचे सभापती असताना वसंतराव यांनी अनेक चांगले बदल आणि धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले. विशेषता त्याकाळी आदिवासी भागामध्ये रस्ते, उन्हाळ्यात वाड्यावर त्यांवर सुरू करावे लागणारे टँकर, प्राथमिक शाळांच्या खोल्या, गुणवत्ता वाढीचे प्रकल्प.अंगणवाड्या इमारती, शेती विषयक योजना आणि विशेषता खरीप हंगामा आढावा बैठकीमध्ये सभापती भालेराव यांचे असणारे अभ्यासपूर्ण विवेचन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील चकित पाडणारे असायचे. पाणीटंचाई, खरीप हंगाम आढावा बैठकांना जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व सभापती उपस्थित असायचे. अशावेळी भालेराव यांनी मांडलेले मुद्दे हेच बैठकीचे दिशादर्शक ठरायचे. अशा बैठकांमध्ये आंबेगाव चा हा’ वसंत ‘नेहमी फुललेला असायचा. त्यामुळे त्यांची छाप सगळ्यांवर पडायची.
लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय वाहन असलेले सभापती हे तालुक्यामध्ये एकमेव पदाधिकारी असायचे. सदस्यांकडे स्वतःची चार चाकी सोडा, दुचाकी देखील नव्हती. सभेला उशीर झाला. आणि मुक्कामी एसटी घोडेगाव किंवा मंचर वरून निघून गेली तर अनेकदा भालेराव हे शासकीय वाहन इतर सहकारी सदस्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी पाठवून द्यायचे आणि स्वतः मात्र इतर व्यवस्था करून कळंबला जायचे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची सभा असेल तर हातात कागदपत्रांची फाईल, डायरी घेऊन ते सभेला जायचे.
अभ्यासू, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि कामाचे वेगळेपण यामुळे अल्पावधीतच त्यांची आंबेगाव तालुक्याला आणि जिल्ह्याला देखील ओळख झाली. सभापती होण्यासाठी अनेक जण इच्छुक असायचे, परंतु भालेराव यांना हटवणे तालुक्यातील नेतृत्वाला त्यावेळी अशक्य झाले.
मी पुण्यात सामना मध्ये दाखल झालो. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये भेट व्हायची. पत्रकार विठ्ठल जाधव ही माझी ओळख असली तरी मला ते आवर्जून विठ्ठलराव म्हणायचे. पुण्यातील पत्रकारितेमध्ये आपले कुणीतरी आहे. याचे त्यांना विशेष वाटायचे. आंबेगाव मध्ये सभापती भालेराव हे भविष्यातील स्पर्धक आहेत. हे ओळखून त्यांना राजकीय दृष्ट्या दाबण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. अनेक राजकीय चढउतारा आणि नेते बघितले.मात्र त्यांनी स्वतःचे कर्तुत्व आणि अधिष्ठानाच्या जोरावर सभापती पदाची कारकीर्द यशस्वी आणि गौरवास्पद केली.
1997 नंतरची त्यांची राजकीय वाटचाल ही नेहमीच कुणाला तरी फायदा करून देणारी ठरली. प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली. काही कालखंड ते स्थानिक राजकारणात व्यस्त राहिले. नंतरच्या टप्प्यात सहकार आणि बाजार समितीच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊन ते आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती झाले. मंचर बाजार आवाराला नवा आयाम देण्यामध्ये सर्वात मोठा वाटा राहिला. शेतकरी केंद्रस्थानी म्हणून त्यांनी नव्याने गाळे आणि बाजार उभारणी केली. बाजार समितीच्या कामासाठी अनेकदा ते पुण्यात जिल्हा सहकार उपनिबंधक आणि पणन संचालक कार्यालयामध्ये वारंवार भेटवायचे. नवीन काय करतोय ते सांगायचे. जनहिताची त्यांची ही धडपड अखेरपर्यंत कायम होती. वसंतराव हा झेप घेणारा माणूस. स्पष्ट आणि परखड बोलणारा.पॉवर पॉलिटिक्स मध्ये अशा माणसांना नेहमीच अंडरस्टमेंट केले जाते. वसंतरावांना त्याही गोष्टीला सामोरे जावे लागले. परंतु तरीदेखील वसंतराव यांची राजकीय कार्तिक दही संस्मरणीय आणि दिशादर्शक ठरली. एक-दीड वर्षापूर्वी त्यांची अशीच भेट झाली. आजारपणाच्या मर्यादा स्पष्टपणे दिसत होत्या. तरी देखील मोठ्या उत्साहाने आणि दमदारपणे बोलताना त्यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला. वसंतराव यांचे अकाली जाणे मनाला वेदना देणारे, जनमानसात वसंतराव यांनी आपल्या कार्यकर्तुत्वामधून उमटवलेला ठसा प्रत्येकाच्या स्मरणात राहील.
सामाजिक
घोडेगावच्या न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची “कु.दुर्गा आवटे” वक्तृत्व स्पर्धेत उत्तर पुणे जिल्ह्यात प्रथम…
घोडेगाव दि. (प्रतिनिधी) रा. प. सबनीस मेमोरियल नारायणगाव ता जुन्नर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल ची दुर्गा आवटे हिने प्रथम क्रमांक पटकविला
उत्तर पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील इंग्लिश मीडियम शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नारायणगाव येथील अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात येणाऱ्या आलेल्या इंग्लिश भाषा वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयातील कु. दूर्वा सुहास आवटे(इ.७वी) या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून 5000 रुपये रोख प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह असे बक्षीस पटकावले.
दरम्यान याच गटातून इयत्ता कु. समृद्धी दत्तात्रय डुकरे तिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. या विद्यार्थिनीला प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह व २००० रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता आठवी ते दहावी या गटात कुमारी अनुष्का वसंत लांगी या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. ही विद्यार्थिनी प्रशस्तीपत्रक मानचिन्ह व ३०००हजार रुपये रोख अशा बक्षिसाची मानकरी ठरली.
या स्पर्धेत खेड,आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील एकूण ४० इंग्लिश मिडीयम शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . पाचवी ते सातवी या गटात दोन व इयत्ता आठवी ते दहावी या गटात दोन विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये या विद्यालयातील विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला. त्यांना इंग्रजी विषय शिक्षिका सौ .सोनीका नायकोडी , सौ. स्मिता पवळे व सौ. मोनिका भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान विद्यार्थिनींच्या या उत्तुंग यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश काळे, संस्थेचे सचिव विश्वास काळे, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे, संस्थेचे खजिनदार सोमनाथ काळे, विद्यालयाचे चेअरमन बाळासाहेब काळे, वस्तीगृह कमिटीचे चेअरमन सूर्यकांत गांधी समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, संस्थेचे संचालक अजित काळे, वैभव काळे व अक्षय काळे तसेच जगदीश चंद्र महिंद्रा हायस्कूल विद्यालयाचे अध्यक्ष रामदास घोलप, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसूजा, उपप्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका सौ वंदना वायकर यांनी अभिनंदन केले .
सामाजिक
गोवर्धन” च्या उत्कर्षांसाठी अहोरात्र झगडाणारा सक्षम तारा… “प्रीतमभाई शाह”
मंचर दि. (संजय कोकणे )कोणतीही संस्था अथवा संघटन उत्कृष्टपणे चालण्यासाठी एका सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. संघटनाच्या अंतर्गत असणाऱ्या बारीक सारीक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून कंपनीचे उत्कर्षांचा ध्यास उरी बाळगून रात्रौदिवस देह भान विसरून काम करणारा गोवर्धन च्या कोंदनातील तारा…. गोवर्धन चे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम शाह…

“प्रीतम शाह आपले थोरले बंधू देवेंद्र शाह सोबत”
शासनाकडून सुरु असलेल्या खाडा पद्धतीमुळे शेतकरी राजाच्या रस्त्यावर टाकले जाणाऱ्या दूधाला योग्य भाव मिळावा व त्याची आर्थिक स्थिती संपन्न व्हावी या् उद्देशाने पुणे जिल्ह्यातील मंचर सारख्या छोट्याशा गावातून कंपनीचे चेअरमन देवेंद्र शाह यांच्या संकल्पनेतून यांच्या सुमारे १९९२ सुमारास सुरु करण्यात आलेल्या “पराग मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट” या कंपनीने गगन भरारी घेत एका मोठ्या जागतिक दर्जाच्या कार्पोरेट कंपनीमध्ये रूपांतर झाले आहे. पराग मिल्क फूड्स हि देशातच नव्हे तर जगाच्या बाजारपेठेत एक लोकप्रिय ब्रँड झाला आहे. आज भारतासह जगातील विविध देशामध्ये ” गोवर्धन घी, गो चीझ, प्राईड ऑफ काउ,आवतार प्रोटीन पावडर आदी नावाने अनेक उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली असून गोवर्धन ब्रँड जगभरातील ग्राहकांचा विश्वासाला पात्र ठरला आहे.

दरम्यान आज हजारे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करत कसलेली पराग मिल्क फूड्स म्हणजेच गोवर्धन डेअरी प्रगतीच्या शिखरावर पोहचण्याचे कारण म्हणजे आपले थोरले बंधू देवेंद्र शाह यांच्या खांद्याला खांदा लावून एकदिलाने एकविचारणे व संपूर्ण समर्पण भावनेने कंपनीच्या उत्कर्षांसाठी व विकासासाठी दिवस रात्र एक करून काम करणारे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक, ज्यांनी डोळ्यांत तेल घालून कंपनीच्या उत्कर्षांसाठी एकाग्रतेने व प्रमाणिक पणे काम केले त्यामुळेच आज गोवर्धन कंपनी जगाच्या बाजार पेठेत खंबीरपणे पाय रोवून आकाशी पुन्हा गरुड झेप घेण्यासाठी उभी आहे.
पराग मिल्क फूड्स या कंपनीच्या स्थापनेपासून आज पर्यंत अनेक स्थित्यंतरे आली अनेक आव्हाने उभी राहिली परंतू अशा वेळी प्रीतम यांनी कंपनीचे चेअरमन यांच्या सोबतीला खंबीर पणे उभे राहून येणाऱ्या सर्व आव्हाणांना सक्षमपणे तोंड दिले वर कंपनीच्या यशासाठी सदोदित प्रयत्न केले म्हणूनच मागील पस्तीस वर्षापूर्वी सुरु असलेल्या खडा पद्धतीचे दूध घेऊन कारभार करणारी पराग डेअरी आज मोठा वटवृक्ष झाली असून या कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी या कंपनीच्या यशाच्या राज मुकूटातील दैदिप्यमान रत्न म्हणजेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम शाह होत हे नाकरता येणार नाही त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना मंगलमय लक्ष लक्ष शुभेच्छा…..
सामाजिक
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५o व्या जयंती निमित्त मंचर येथे “रण फॉर युनिटी” स्पर्धेचे आयोजन
मंचर दि.31 (प्रतिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५० वी जयंती निमित्त देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आपल्या समर्पणाला प्रोत्साहन व बळकटी देण्यासाठी मंचर पोलीस स्टेशनच्यावतीने रन फॉर युनिटी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
देशाचे लोहपुरुष व स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्रीसरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मंचर येथे आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर युनिटी या कार्यक्रमांतर्गत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मंचर पोलीस स्टेशनचे 05 पोलीस अधिकारी, 40 पोलीस अंमलदार, आळेफाटा महामार्ग सुरक्षा पथकाचे 10 अंमलदार मंचर शहरातील तीन पोलीस भरती अकॅडमी यांचे 150 विद्यार्थी तसेच मंचर शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर लोकांनी सहभाग घेतला होता.

दरम्यान सदर मॅरेथाॅन स्पर्धा महिला गट व पुरुष गट असे दोन गटात आयोजीत करण्यात आली होती. महिलांसाठी तीन किलोमीटर तर पुरुषांसाठी पाच किलोमीटर असे अंतर निर्धारित करण्यात आले होते सदर स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथून सुरु होऊन ते भिमाशंकर आयुर्वेदीक महाविद्यालय वडगाव काशिंबेग ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर अशी घेण्यात आली
त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक – कु.सचिन भारद्धाज ,द्वितीय क्रमांक – कु. तुषार योगराज कोनरे , तृतीय क्रमांक – कु ऋषभ कैलास निसाळ यांनी पटकवला. तसेच सदर स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये प्रथम क्रमांक – कु.आर्या मनोज डोक, द्वितीय क्रमांक – कु.स्वरा संजय गाडे, तृतीय क्रमांक – कु शर्वरी प्रकाश थोरात यांनी पटकविला विजयी स्पर्धकांना मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान चिन्ह, मेडल तसेच प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे रन वे स्पर्धेत सहभाग घेतलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा पैकी प्रथम क्रमांक – श्री.यशवंत यादव, (पोलीस उपनिरीक्षक मंचर पोलीस स्टेशन,), द्वितीय क्रमांक -श्री.विनोद जांभळे, पोहवा (मंचर पोलीस स्टेशन) तृतीय क्रमांक,- रूपाली मिंढे (महिला पोलीस अंमलदार मंचर पोलीस स्टेशन) यांना देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. असल्याची माहिती मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी बोभाटा न्यूज शी बोलताना सांगितले.
-
राजकीय2 years agoवीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय2 years ago“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय1 year agoवळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years agoआयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय1 year agoआंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय2 years agoअढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year agoभोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक2 years ago“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….

मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 20, 2024 at 11:41 am
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !