सामाजिक
“समाजसेवेचा आव आणत, परिस्थितीनुसार स्वहितासाठी, रंग बदलणाऱ्या… “नटसम्राट व वगसम्राटांचा” आंबेगावांत झालाय का? सुळसुळाट…

मंचर दि (प्रतिनिधी) राजकारण… सद्या जो उठतो तो राजकारण करायला निघतो समाज कारणाच्या “गोंडस” नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचा व्यवसायच काही कथाकथित जनसेवक करत आहेत. कार्यसम्राट, जनसेवक समाज सेवक आशा स्वतःला स्वतःचं उपाध्या देत जाहिरात बाजी करणाऱ्या या नटसम्राट व वगसम्राटांची संख्या वाढत असल्याची चर्चा आंबेगावात सुरु आहे.

“कथाकथित जनसेवक कि वगसम्राट”
पावसाळ्यांत जशा छत्र्या उगवतात त्या कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे सद्या आंबेगावाच्या राजकारणात अनेक जनसेवक समाज सेवक निर्माण झाले आहेत. वडिलोपार्जित किंवा कुणाकडून मिळालेल्या मालमत्तेवर श्रीमंतीचे सोंग करीत व आम्हीच खरे जनसेवक अथवा समाजसेवक म्हणतं स्वतःची पाठ स्वतः च थोपटून, समाज सेवेचा आव आणत फिरणाऱ्या जनसेवकांचे सद्या आंबेगाव तालुक्यात पेव फुटले असल्याचे दिसत आहे.
दरम्यान हे कथाकथित जनसेवक, समाजसेवेचा अविर्भाव आणत काही टूकारांना बरोबर घेत जाहिरात बाजी करीत फिरत असल्याचे चित्र सध्या आंबेगाव तालुक्यात पहावायास मिळत आहे. तर आपण च खरे समाजसेवक जनसेवक म्हणवणाऱ्या या कथाकथित स्वयं घोषित पुढऱ्यांना जनतेचे काहीच देणे घेणे नसावे यांना जनतेची सेवा नाही तर समाजसेवेच्या गोंडस नावाखाली राजकारण करून नफेखोरीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सध्या आंबेगावांत झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान सवंग लोकप्रियतेसाठी तालुक्यातील काही सहकारी संस्थांच्या कारभारावर बेछुट आरोप करण्यात यांना धन्यता वाटते अशा कथाकथित जनसेवकांचे तालुक्यातील संस्थांच्या उभारणीत शून्य योगदान असणाना हे स्वयंधोषित जनसेवक (पप्पू पहिलवान) फक्त आरोप करत असल्याचे दिसत आहे. अशा जनसेवाकांचे काही बोलाविते धनी असण्याची शक्यता नकारता येत नाही कारण दुसऱ्याबद्द्ल आकस धरून केसाने गळा कापणाऱ्या पासूनही सावध असावे. त्याचप्रमाणे या तालुक्यात अनेक कायदेतज्ञ, अर्थतज्ञ् वास्तव्यास असताना जेवणासाठी येणारे म्हणत सर्वसामान्य शेतकऱ्यांस हिनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कथाकथित जनसेवकांना “सहकारातून सहकार्य” करण्याची सहकाराची खरी भूमिका यांच्या अंगवळनीच पडलेली नसावी असे दिसते. यासाठी आरोप करणाऱ्या जनसेवकांनी एखादी संस्था उभारून तीला प्रगती पथावर नेऊन काही युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला तर हे काम एखाद्या कार्यक्रमात जनसेवक असल्याचे पोस्टर लावून उगाचच दुधाच्या बाटल्या वाटण्यापेक्षा श्रेष्ठ ठरेल तसेच गरजवंतांना प्रमाणिक मदत करून जनतेचे शुभआशीर्वाद नक्की मिळतील अशी चर्चा नागरिकांनातून सुरु आहे.
दरम्यान आम्ही खरे दानवीर व समाज सेवक आहोत.असे म्हणणाऱ्यांना हे माहित असायला हवे कि, सनातन धर्मात आपण एखादे दान प्रामानिक पणे करत असू तर त्याची वाच्चता गुप्त ठेवावी म्हणजेच म्हणतात दान इतक्या गुप्तपणे असावे कि, उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला हि कळू नये परंतु आजकाल या जनसेवकांची, समाजसेवा अथवा मदत हा राजकीय व्यवसायाचा भाग बनला आहे.सवंग लोकप्रियतेसाठी एखाद्या छोट्या रकमेची मदत करायची व त्यावेळी जाहिरात एव्हडी करायची कि लाखोचो खैरात वाटली असा आव आणणारे व मला कोणावर आरोप करायचा नाही असे म्हणत पत्रकार परिषदा घेत बेछुट आरोप करून संस्थाना लक्ष करणाऱ्या व स्वतः च्या स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्या जनसेवकांना खरचचं, समाज सेवक म्हणावे कि, नटसम्राट अथवा वगसम्राट…. अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
सामाजिक
काळाच्या ओघात सध्याच्या पत्रकारितेचा दर्जा घसरतोय का?

मंचर दि (प्रतिनिधी ) भारतामध्ये पत्रकारिता हा घटनेचा चौथा स्तंभ समजला जातो. निपक्षपाती निर्भीड पत्रकारीतेतून अनेक समाजसेवाकांनी या देशात असलेली जाती पातीची अंधश्रद्धा घातक रुडी परंपरा वर आपल्या लेखणीतून वार करत समज जागृती केली. समजातील विघातक गोष्टीना आळा घालण्याचे काम वृत्तपत्रानी केले
दरम्यान बाळशास्त्री जांभेकर यांनी ६जानेवारी१८३२ यांनी मराठी वृतपत्र दर्पणची स्थापना केली त्यांनतर १८८१मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी वृत्त पत्र सुरु केले तर त्यानंतर मराठा वृत्तपत्र हि त्यांनी सुरु केले या वृत्तपत्रातून समाज्याला नवी दिशा देण्याचे कार्य या समाज सेवाकांनी केले. काळाच्या ओघामध्ये पत्रकारिता क्षेत्रात मोठे अमुलाग्र बदल झाले पुढे या वृतपत्राची जागा इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतली आतातर यूट्यूब वर विविध चॅनेल निर्माण होऊन पत्रकारिता क्षेत्रात मोठी उत्क्रांती झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दरम्यान काळाच्या ओघात प्रचंड प्रमाणावर बदललेली पत्रकारिता,आज खरचंच निपक्षपाती, निर्भीड व सक्षम राहिली आहे का? हा प्रश्न पडतो. आजच्या काळात युट्युब व पोर्टल च्या माध्यमातून सुरु झालेले लाखो चॅनेल खरचं सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देतात का? या फ्रीलान्स पत्रकारांकडून समाज हिताची व समाज्याला योग्य दिशा देण्याचे काम होते का? याचा विचार होणे आवश्यक आहे.
आजच्या काळात युट्युब व पोर्टल च्या माध्यमातून आलेले विविध तथाकथित पत्रकार ज्यांना पत्रकारीतेचा काही गंध नसताना अथवा आपण जे लिहितो त्याबाबतचे योग्य ज्ञान देखील नसताना कोणतीही पत्रकारितेची पदवी नसताना. केवळ जाहिराती साठी पत्रकारिता करीत असल्याचे दिसून येते.तसेच निर्भड व निपक्षपाती पत्रकारिता विसरून कुणाचे तरी लांगुल चांलण करणारी पित्तपत्रकारीतेने जन्म घेतला आहे असे दिसते.
आज समाज्यामध्ये कोणतेही प्रशिक्षण अथवा शिक्षण नसलेले युट्युबर व पोर्टल पत्रकार दिसत आहेत.आजही महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पण याकडे लक्ष न देता हे पत्रकार एखाद्या साखर कारखान्यात अथवा संस्थेच्या कार्यक्रमामध्ये पारितोषक वितरण करीत पुढार्यांची मर्जी सांभाळत असल्याचे दिसते तर काही पत्रकार जाहिरातीच्या नावाखाली उत्पन्न मिळविण्यासाठी तर अनेक जण राजकीय क्षेत्रातील कथाकथित पुढारी अथवा स्वघोषित समाजसेवक व जनसेवकांनी जाहिरात करण्याच्या दूषित हेतूने आयोजित पत्रकार परिषदांमध्ये केवळ रुचकर जेवण मिळेल यासाठी पत्रकारिता करीत असल्याचे दिसते यामुळे पत्रकारिते सारख्या पवित्र क्षेत्राचा लिलाव होतो आहे कि काय? असा प्रश्न अनेकांना मुखातून ऐकावयास मिळतो
खरंतर पत्रकारितेच्या नावाखाली सुरु असलेल्या या भेसूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्याची खरंच गरज असल्याचे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच युट्युब चॅनेल पोर्टल तसेच कोणतेही इलेक्ट्रिनिक मीडिया अथवा वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या व्यक्तीकडे शिक्षण तसेच पत्रकारितेची पदवी असणे आवश्यक आहे. जसे शेतामध्ये पिकासोबत अनावश्यक तन उगवते व त्याला थोपविण्यासाठी तणनाशक शेतात फवारले जाते त्याच प्रमाणे पत्रकारिता करणाऱ्या इसमाकडे योग्य शिक्षण व पत्रकारीतेची पदवी बंधन कारक केल्यास या वरही चांगल्यापैकी बंधने येऊन पत्रकारिता क्षेत्र सक्षम होईल यात शंका नाही अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेकडून ऐकावयास मिळते.
सामाजिक
ग्राहक पंचायतीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी “नितीन मिंढे”

रांजणी दि(प्रतिनिधी ) ) आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील नितीन मारुती मिंडे यांची ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यातआली
नुकत्याच झालेल्या वडगाव मावळ येथील ग्राहक पंचायत या संस्थेच्या विशेष बैठकीत महाराष्ट्राचे संघटन मंत्री सर्जेराव जाधव यांनी मिंढे यांच्या निवडीची घोषणा केली यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ विजय लाड,सहसंघटिका मेधा कुलकर्णी, सचिव अरुण वाघमारे, सहसचिव एस एन पाटील कोषअध्यक्ष सुनीता राजे घाटगे, कार्यकारणी सदस्य हेमंत मराठे, पुणे विभाग अध्यक्ष अशोक अग्रवाल आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते..
दरम्यान या वेळी बोलताना राज्य कार्यकारणी अध्यक्ष सर्जेराव जाधव म्हणाले की, भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांचे मंचर ता. आंबेगाव येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सन 2000 सालच्या दरम्यान ग्राहक पंचायत आयोजित विद्यार्थी ग्राहक प्रशिक्षण अभ्यासक्रमा दरम्यान बिंदू माधव जोशी यांचे विचार ऐकून त्यातून प्रेरणा घेत मिंढे यांनी सुमारे 12 वर्ष बिंदू माधव जोशी यांचे सोबत ग्राहक पंचायत मध्ये गाव संघटक पदापासून कामाला सुरुवात केली होती,
त्याचप्रमाणे मिंढे यांनी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ग्राहक चळवळीची व्याख्याने देऊन मार्गदर्शन केले आहे,तसेच अनेक गावांमध्ये ग्राहक मार्गदर्शन मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले असून त्यांचा विज या विषयांमध्ये गाढा अभ्यास आहे, ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून त्यांना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरही कामाचा अनुभव आहे, त्यांच्या या निवडीबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ विजय लाड यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
सामाजिक
घोडेगाव येथे “गणेशोत्सव व ईद काळात कायदा व सुव्यवस्थेसाठी” पोलिसांकडून रूट मार्च चे आयोजन

घोडेगाव दि. (प्रतिनिधी):-गणेशोत्सव व ईद ए मिलाद येत असल्याने या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी घोडेगावयेथील पोलिसांनी संपूर्ण शहरातून रूट मार्च काढला.

सध्या सणासूदीचे दिवस सुरु असून सर्वत्र आनंदाला उधान आले आहे. या काळात मुस्लिम धार्मियांचा पवित्र सण ईद तर हिंदू धर्मातील सर्व गणांची देवता श्री गणेश देवता यांचा गणेशोत्सव हे दोन्ही सण एकत्रित आले आहेत त्यामळे आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी व पश्चिम पाट्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोडेगाव शहरातून सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी रूट मार्चसंपूर्ण शहरातून काढण्यात आला.
दरम्यान तालुक्याचे पश्चिम भागात शेकडो सार्वजनिक,तर घरोघरी श्री गणेश स्थापना होते काही घरात दीड दिवस, काही ठिकाणी सात दिवस, ते दहा दिवसांपर्यंत देखील श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते.त्यामुळे येणाऱ्या सणात कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. याकरिता घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या आदेशाने घोडेगाव शहरातील मार्गावर रूटमार्च काढण्यात आला होता.
दरम्यान या रूट मार्च मध्ये शस्त्रधारी पोलिस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.पोलिस वाहनांचाही यामध्ये समावेश होता.सणासुदीच्या काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी. व सर्वसामान्य दृष्टीने नागरिकांमध्ये असणारे भीतीचे वातावरण दूर व्हावे, यासाठी या रूट मार्च चे आयोजन केले जाते.यावेळी प्रत्येक चौकात थांबून ईद ए मिलाद व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांचे वतीने करण्यात आले.
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय11 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….