singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

राजकीय

अजित पवार यांच्या विरोधात पुतण्या युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्या, बारामतीकारांची शरद पवारांकडे एकमुखी मागणी

Published

on

पुणे- (ज्ञानेश्वर नेहे पाटील यांजकडून )- बारामती लोकसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाल्यानंतर , येथील नागरिकांनी “आम्हाला दादा बदलायचा आहे” आता युगेंद्र पवार यांना बारामती विधान सभेसाठी  उमेदवारी देण्याची मागणी केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार   यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून थोरल्या पवार साहेबांचा विश्वासघात केल्याची भावना बारामतीकरांच्या जिव्हारी लागली असून, “मुलाने बापाचा हात धरून मोठे व्हायचे” व नंतर “बापालाच घराबाहेर काढायचे”, ही संस्कृती बारामतीकरांच्या मनात तीव्र संताप निर्माण करणारी असल्याची चर्चा या मतदार संघात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्व काही देऊनही, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडाली व भा. ज. पा. सोबत हात मिळवणी केली व  आपले काका म्हणजेच देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्यावर नको त्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले. मोठ्या प्रमाणावर टीकाही केली. परंतु  मोठ्या पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रती उत्तर दिले  नाही. हा कौटुंबिक वाद वाढत असताना , त्यात भा ज पा चे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केले की, आम्हाला फक्त शरदचंद्र पवार यांना हरवायचे आहे. म्हणुन बारामती मधुन अजित पवार यांच्या पत्नीस उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीचे मतदारांचा अधिकच तीव्र संताप झाला.

बारामती च्या मतदारांनी शरद पवार यांना शह देण्यासाठी,  आलेल्या भाजपा ला जागा दाखविण्यासाठी मतदारांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती  लोकसभा मतदारसंघात आपली बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले. परंतु यात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत बारामती लोकसभेतील जनतेने शरद पवारांना साथ दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले कृत्य बारामतीकर जनतेला रुचलेले नाही त्यामुळे नुकत्याच झालेल्या बारामती येथे पक्ष कार्यालयात अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा जनता दरबार सुरू असताना, यावेळी अचानकपणे  या जनता दरबार साठी दस्तुरखुद्द शरदचंद्र पवार उपस्थित राहिले. यावेळीं पवार साहेबांसमोर उपस्थित कार्यकर्त्यांनी, “आम्हाला “दादा” बदलायचा आहे. असे म्हणत,  योगेंद्र पवार यांना बारामती विधान सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधात उमेदवारी द्या अशी एकमुखी मागणी शरदचंद्र पवार यांच्या कडे केली आहे.

दरम्यान शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची मागणी मान्य केली. तर अजित पवार यांना ही निवडणूक अतिशय जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे मागील लोकसभेत मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांचा पराभव यानंतर बारामती मधून पत्नी सुनेत्रा यांचा पराभव तर या वेळी विधानसभेत अजित पवार यांना हि   पराभव पत्करावा लागेल अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

राजकीय

हे कार्यकर्ते… “खरंच जनहितार्थी कि लाभार्थी”?

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी)राज्याच्या राजकारणात वळसे पाटलांना स्थान मिळाले नाही म्हणून वळसे पाटलांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी  पक्ष नेतृत्वाकडे कोणतीही दाद मागण्या ऐवजी .आपल्या नेत्यावर अन्याय होऊनही निमूटपणे मूग गिळून गप्प बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे सत्तेचा लाडू चाखत असूनही जेव्हा नेत्यावर अन्याय अन्याय होतो. तरीही गप्प असतील तर ते खरंच  जनहितार्थी लाभार्थी  कि, स्वार्थी ?

 राज्याच्या राजकारणात गेली पस्तीस वर्षे असणारे एकेकाळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना यावर्षी मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही खऱ्या अर्थाने राज्याच्या उत्कर्षांसाठी नियोजनबद्ध काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकाला असे म्हणावायास हरकत नाही कारण वळसे पाटलांनी ज्या खात्याचे काम पाहिले त्या खात्याचा कारभार उत्तम पप्रकारे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

या वेळी मात्र महायुतीच्या काळात त्यांना मंत्री मंडळातून डावळण्यात आले यामागे कोणतीही व काहीहि कारणे असतील. परंतु महाराष्ट राज्य  एका चांगल्या व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमहत्वाला मुकला हेही खरेच. वळसे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या खात्याचे काम पाहिलं त्या खात्याची प्रगती झाली आहे इतिहास आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तीला बाजूला ठेवणे हे पक्ष नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला ओ बि सी वर अन्याय झाला. असे सांगत पक्ष नेतृत्वावर आगपाखाड केली व आपण काहीही करू शकतो हे दाखवत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध केला व जोडे मारो आंदोलन करून धिक्कार हि अनेक कार्यकर्त्यांनी केला.परंतु आंबेगाव तालुक्यात मात्र वळसे पाठलांच्या कार्यकर्त्यांकडून साधा निषेधही नोंदवीला गेला नाही.

आंबेगाव,जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात वळसे पाटलांचे शेकडो कार्यकर्ते आहेत.परंतु वळसे पाटलांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. यावर कार्यकर्त्याकडून मंत्रिपदच्या मागणीसाठी प्रचंड हल्लाबोल होणं गरजेचं होत. परंतु  यावर बोलण्याचे धारिष्टय कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. याचाच अर्थ वळसे पाटलांनी जे कार्यकर्ते जपले त्या कार्यकर्त्यांची भूमिका  फक्त “टी फॉर टॅट” अशीच होती कि काय? असा प्रश्न विचाराला जातं आहे. 

गेली अनेक वर्ष ते वळसेपाटलांच्या सोबत राहून समोर आल्यावर फक्त ” देखल्या देवाला दंडवत” घालत फक्त  सत्तेचा मलिदा चाखणारे लाभार्थी कार्यकर्ते वळसे पाटलांजवळ होते हि सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची आवश्यकता नसावी. कारण वळसे पाटलांना डावलले जातं असताना त्यांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत रस्त्यावर येण्याचे धाडस एकाही कार्यकर्त्यांने दाखविले नाही किंवा या  लाभार्थी  कार्यकर्त्यांना  वळसे पाटलांना मंत्री पदापासुन डावळून त्याच्यावर अन्याय केला जातं आहे.  असेही वाटले नाही. किंवा त्यांची बाजू पक्ष नेर्तृत्वासमोर मांडण्याची हिंम्मतहि कोण्या कार्यकर्त्यांची झाली नाही हि मोठी शोकांतिका आहे.

दरम्यान काल झालेल्या आभार मेळाव्यात एकमेकांची उणी दुनी काढून आपण किती समर्थक हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. परंतु त्यात साहेबांवर पक्ष नेतृत्वाने अन्याय केला असून त्यावर पक्ष नेतृत्वाला जाब विचारावा असा साधा मुद्दाही कोणी मांडला नाही. खरंतर वळसे पाटलांना याची खंत नक्कीच असेल पण काय करणार? एकही कार्यकर्ता काहीच बोलला नाही यावरून असेच दिसते कि,  साहेबांना मिळालेले बहुतांशी कार्यकर्ते फक्त जनहितार्थी नसून लाभार्थी आहेत का? अशा आशयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Continue Reading

राजकीय

माजी खासदार शिवाजीराव आढळराव ठरताहेत? “किंगमेकर”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत, खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूरलोकसभा मतदार संघावर आपली एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या संकल्पचा “अश्व” रोखून धरत,माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे किंग मेकर ठरले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

 विधानसभेची रणधुमाळी संपली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुतीत आनंदी आनंद साजरा होत असताना मात्र विधानसभा काळात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी फोडलेल्या गगनभेदी डरकाळ्या पराभवाच्या गर्तेत शांत झाल्या या लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकविणारे शिरूर लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पश्चिम महाराष्ट्राचा ओ बी सी चा नेता होण्याचे स्वप्न मात्र धुळीलाच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराजयाची धूळ चारणारे तसेच प्रती संभाजी म्हणून आपली प्रतिमा मालिकांच्या माध्यमातून तयार करून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले, खासदार  अमोल कोल्हे यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विधानसभेच्या रणांगणात मात देली व विधान सभेत आपल्याच  विचाराचे लोकप्रतिनिधी विजयी करून शिरूर लोकसभेवर आपला वरचष्मा असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखवून दिले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार आढळराव थोडे बॅक फूट वर गेले होते. त्यांचे राजकारण मर्यादीत झाले. अशा अशयाच्या चर्चा देखील सर्वत्र झाल्या.परंतु नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रचंड कष्ट घेत आंबेगाव,शिरूर, भोसरी,जुन्नर व हडपसर येथे आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणून खासदार कोल्हे यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते.

दरम्यान जुन्नर, हडपसर, आंबेगाव भोसरी हे मतदार संघ विधानसभेत विरोधात जाणे म्हणजे कोल्हे यांच्या पुढील राजकीय  वाटचालीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कोल्हे यांना मतदारांनी लोकसभा मतदार संघात निवडून येताना जेव्हढी मते पडली त्या पेक्षा सुमारे दोन लाख कमी मते विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवारांना  मतदान झालेले आहे.

दरम्यान  राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सार्थ करीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले आहेत तर पुढील काळात खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करणे करणे गरजेचे आहे. त्यात इंद्रायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, भोसरी ते खेड रस्ता या दोन गोष्टी उत्तर पुणे जिल्यातील मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा आहेत. या घोषणा बाबत खासदार कोल्हे यांनी जागरूक राहून हि कामे युद्ध पातळीवर करणे त्यांच्या राजकीय सौख्याचे दृष्टीने गरजेचे आहे. परंतु केंद्रात व राज्यात विरोधी विचार सरणीचे सरकार असताना खासदार कोल्हे हे महत्व कांक्षी प्रकल्प कसे पूर्ण करणार? व  शिरूरच्या जनतेला कसा? न्याय मिळवून देणार हे पहाणे कुतूहलचे ठरणार आहे.

Continue Reading

राजकीय

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावावेत”:जेष्ठ नेते अशोक काळे यांची प्रशासनाकडे मागणी 

Published

on

मंचर दि(प्रतिनिधी) सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी यांनी दिले आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो सध्या तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय  निमशासकीय  कार्यालयात दिसत नाहीत गेले काही काळापासुन सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसापासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहे असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 दरम्यान सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधीजींचे फोटो व संदेश लावावे जावेत असे आवाहन केले असून या प्रसंगी पाटणचे उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोरडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 यासंदर्भातल्या निवेदनाच्या प्रती  राष्ट्रपती द्रोपदी मुर्दौ  राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही संबंधित निवेदनामध्ये केलेले आहे.

दरम्यान याबाबत तालुका पातळीवर डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्यघटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार  राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पो स्टेशन घोडेगाव ग्रामीणरुग्णालया घोडेगाव रजिस्टर आँफीस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in